ETV Bharat / sports

WPL 2023 auction : महिला वर्ल्ड कपमध्ये धमाका; या 5 खेळाडूंना मिळू शकते लिलावात मोठी रक्कम

author img

By

Published : Feb 2, 2023, 2:56 PM IST

डब्ल्यूपीएल 2023 चा पहिला हंगाम मार्चमध्ये सुरू होऊ शकतो. या दरम्यान 22 सामने खेळले जाण्याची शक्यता आहे. खेळाडूंचा लिलाव या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात 11 किंवा 13 फेब्रुवारीला होऊ शकतो.

WPL 2023 auction
या 5 खेळाडूंना मिळू शकते लिलावात मोठी रक्कम

नवी दिल्ली : भारतीय अंडर-19 महिला संघाने इंग्लंडला हरवून टी-20 विश्वचषक जिंकला आहे. १९ वर्षांखालील महिला विश्वचषक प्रथमच आयोजित करण्यात आला होता. शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिली आवृत्ती जिंकून इतिहास रचला आहे. टी-20 विश्वचषकातील नेत्रदीपक कामगिरीनंतर महिला खेळाडूंचे नशीब उजळले आहे. देश त्याच्यावर लक्ष ठेवून असताना, महिला प्रीमियर लीगच्या लिलावात त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर पैशांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

लिलावानंतर होणार अनेक खेळाडू श्रीमंत : महिला प्रीमियर लीग (WPL) चा लिलाव लवकरच होणार आहे. लिलावानंतर अनेक खेळाडू श्रीमंत होतील. अंडर-19 विश्वचषक विजेत्या संघातील अशा पाच खेळाडूंबद्दल जाणून घेऊया, ज्यांच्यासाठी फ्रँचायझी करोडो रुपये खर्च करू शकतात. संघाची उपकर्णधार श्वेता सेहरावत ही विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली आहे. त्यांना त्यांच्या संघात समाविष्ट करण्यासाठी फ्रँचायझी मोठी रक्कम खर्च करू शकतात.

टिटास साधू : गोलंदाज टिटासने अंतिम सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली होती. तिने चार षटकांत केवळ सहा धावा देत दोन विकेट घेतले. या कामगिरीसाठी तिला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. टिटास साधू चेंडू स्विंग आणि उसळी घेण्यात माहिर आहे. तिच्या या क्षमतेमुळे तिला महिला प्रीमियर लीगच्या लिलावात मोठी रक्कम मिळण्याची शक्यता आहे.

श्वेता सेहरावत : संघाची उपकर्णधार श्वेता सेहरावतने विश्वचषकात शानदार फलंदाजी केली. श्वेता विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली. श्वेताने सात सामन्यांत 99च्या सरासरीने 297 धावा केल्या, त्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे.

पार्श्वी चोपडा : पार्श्वीने वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाज होती. लेगस्पिनर पार्श्वीने 6 सामन्यात सातच्या सरासरीने 11 बळी घेतले. 16 वर्षीय पार्श्वीने आपल्या स्थिर गोलंदाजीने विरोधी फलंदाजांना धावा करण्यापासून रोखले. ग्रँड फायनलमध्ये पार्श्वीने चार षटकांच्या स्पेलमध्ये दोन विकेट घेतल्या आणि एकूण 13 धावा दिल्या.

अर्चना देवी : 18 वर्षांच्या अर्चना देवीनेही भारताला विश्वविजेता बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अर्चनाने सात सामन्यांत एकूण आठ विकेट घेतल्या. अर्चना उजव्या हाताची ऑफ स्पिनर आहे. अशा परिस्थितीत अर्चनाला आगामी लिलावात मोठी किंमतही मिळू शकते.

हृषिता बसू: हृषिता बसू एक यष्टिरक्षक फलंदाज आहे. खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता तिच्यात आहे. हृषिता बसू स्कूप शॉट खेळण्यासाठी ओळखली जाते. हा तिचा आवडता शॉट आहे. यष्टिरक्षक फलंदाज असल्याने हृषिताचा लिलावात संघात समावेश करण्यासाठी फ्रँचायझी कोणतीही किंमत मोजू शकतात.

हेही वाचा : ICC Womens T20 World Cup 2023 : महिला टी 20 विश्वचषक 10 फेब्रुवारीपासून होणार सुरू, जाणून घ्या स्पर्धेचे वेळापत्रक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.