ETV Bharat / sports

Women world cup 2022 : शनिवारी भारताला हरवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू - ऑस्ट्रेलियन खेळाडू ताहलिया मॅकग्राथ

author img

By

Published : Mar 17, 2022, 6:03 PM IST

महिला विश्वचषक 2022 ( Women's World Cup 2022 ) मध्ये शनिवारी (19 मार्च) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. ऑस्ट्रेलिया संघाने आतापर्यंत चार सामने खेळले असून चारही सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर भारताने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत, ज्यात दोन जिंकले आहेत तर दोन सामने हरले आहेत.

Tahalia McGrath
Tahalia McGrath

ऑकलंड : आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेतील आठरावा सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ( India vs Australia ) संघात होणार आहे. हा सामना शनिवारी ऑकलंड येथील ईडन पार्क येथे खेळला जाणारा आहे. या सामन्याच्या अगोदर ऑस्ट्रेलियाची खेळाडू ताहलिया मॅकग्राथने भारताबाबत मोठे विधान केले आहे. मॅकग्राथ गुरुवारी म्हणाली, आम्ही या स्पर्धेत भारताला पराभूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. सध्या ऑस्ट्रेलिया चार सामन्यांतून चार विजयांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. दुसरीकडे, भारताने या स्पर्धेत दोन सामने जिंकले आहेत आणि दोन सामने गमावले आहेत.

ताहलिया मॅकग्राथ ( Tahalia McGrath on Indian Team ) म्हणाली, नुकत्याच झालेल्या भारताविरुद्धच्या मालिकेत आम्हाला खूप यश मिळाले होते. पण, हे एक नवीन ठिकाणं आहे आणि नवीन स्पर्धा आहे. त्यामुळे या स्पर्धेत काहीही होऊ शकते. त्याचबरोबर तो जागतिक दर्जाचा संघ आहे. आम्ही त्यांच्यावर आमचा होमवर्क करु. उद्या खुप सराव करु आणि शनिवारी त्यांना हरवण्याची प्रत्येक प्रत्येक मार्गाचा अवलंब करु. भारतला बुधवारी इंग्लंडकडून चार गडी राखून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध जोरदार पुनरागमन करण्याचा विचार करेल याची मॅक्ग्राथला जाणीव आहे.

ताहलिया म्हणाली, आम्हाला अपेक्षा आहे की, प्रत्येक संघानी आमच्यासाठी प्रचंड मेहनत करावी. ही खुपच आक्रमक स्वभावाची टीम आहे, जी आमच्या विरुद्ध खेळते आणि यासाठी आम्ही या संघाला पसंद करतो. आम्ही एका मोठ्या आव्हानाची अपेक्षा करत आहोत. हे स्पष्ट आहे की गोलंदाजीमध्ये झुलन गोस्वामी उत्कृष्ठ प्रदर्शन ( Jhulan Goswami will do well ) करेल. दुखापतीमुळे आराम मिळावा म्हणून, मॅकग्राथ पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळू शकली नाही. स्पर्धेतील चारही सामन्यांमध्ये ऑसीजच्या विविध खेळाडूंनी उचललेल्या पावलांमुळे आनंदी आहे.

मॅकग्राथ ऑस्ट्रेलियन संघाच्या संस्कृतीचे कौतुक करताना म्हणाले की, खेळाडू निरोगी, स्पर्धात्मक वातावरणात एकमेकांना प्रोत्साहन देतात. ही निरोगी स्पर्धा आहे. आम्ही खूप स्पर्धात्मक गट आहोत. तसेच ज्यांना संधी मिळते त्यांना आम्ही खूप प्रोत्साहन देतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.