ETV Bharat / sports

Women World Cup 2022 : 4 मार्चपासून महिला विश्वचषकला सुरुवात ; जाणून घ्या कुठे आणि कसे बघायचे सामने

author img

By

Published : Mar 3, 2022, 8:24 PM IST

महिला क्रिकेट विश्वचषक 2022 ( Women Cricket World Cup 2022 ) स्पर्धेला 4 मार्चपासून सुरू होत आहे. जिथे पहिल्या सामन्यात न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजचे संघ आमनेसामने येतील. ही स्पर्धा यापूर्वी 2021 मध्ये होणार होती, परंतु कोरोना महामारीमुळे ती एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली होती. आयसीसीने 15 डिसेंबर 2020 रोजी घोषित केले की, महिला क्रिकेट विश्वचषक 4 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान खेळवला जाईल.

Women World Cup
Women World Cup

हैदराबाद : आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2022 ( ICC Women ODI World Cup 2022 ) या स्पर्धेला शुक्रवार (4 मार्च) पासून सुरुवात होत आहे. ही स्पर्धा यंदा न्यूझीलंड या देशात खेळवली जाणार आहे. या स्पर्धेचा पहिला सामना न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणार आहे. पहिला सामना जिंकून दोन्ही संघ विश्वचषकात विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्नात असतील. न्यूझीलंडसमोर वेस्ट इंडिजचे आव्हान सोपे असणार नाही. नसले तरी, असे जरी असले तरी घरच्या स्थितीचा फायदा या संघाला मिळू शकतो.

हे दोन्ही संघ आतापर्यंत आयसीसीच्या या स्पर्धेत सहा वेळा एकमेकांसमोर आले आहेत. ज्यामध्ये न्यूझीलंडचा संघ चारवेळा विजय ( New Zealand won four times ) मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. त्याचबरोबर या स्पर्धेत वेस्ट इंडिज संघाने फक्त दोन सामन्यात विजय मिळवला आहे. याशिवाय एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन्ही महिला संघांमध्ये एकूण 19 सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान न्यूझीलंड संघाने 11 सामने जिंकले, तर वेस्ट इंडिज संघाने केवळ 7 सामने जिंकले आहेत. तसेच एका सामन्याचा निकाल लागला नाही.

महिला एकदिवसीय विश्वचषकाशी संबंधित काही महत्त्वाची माहिती -

  • न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ICC महिला विश्वचषकातील पहिला सामना बे ओव्हल, माउंट माउंगानुई येथे खेळवला जाईल.
  • न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील विश्वचषकातील हा पहिला सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 6.30 वाजता सुरू होईल.
  • न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील महिला विश्वचषक सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल, तर थेट प्रसारण हॉटस्टारवर केले जाईल.

महिला विश्वचषकासाठी भारतीय संघ -

मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उप-कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया, रिचा घोष, तानिया भाटिया, स्नेह राणा, झुलन गोस्वामी, पूजा वस्त्राकार, मेघना सिंग, रेणुका सिंग ठाकूर, राजेशवासी. आणि पूनम यादव.

भारतीय महिला संघाच्या विश्वचषकाचे वेळापत्रक -

  • भारत विरुद्ध पाकिस्तान - 6 मार्च - सकाळी 6:30 वा.
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड - 10 मार्च - सकाळी 6:30 वा.
  • भारत विरुद्ध वेस्ट इंडिज - 12 मार्च - सकाळी 6:30 वा.
  • भारत विरुद्ध इंग्लंड - 16 मार्च - सकाळी 6:30 वा.
  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - 19 मार्च - सकाळी 6:30 वा.
  • भारत विरुद्ध बांगलादेश - 22 मार्च - सकाळी 6:30 वा.
  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - 27 मार्च - सकाळी 6:30 वा.

आयसीसी महिला विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक -

  • न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडीज - 4 मार्च - माउंट मौनगानुई
  • बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका - 5 मार्च - ड्युनेडिन
  • ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड - 5 मार्च - हॅमिल्टन
  • भारत विरुद्ध पाकिस्तान - 6 मार्च - माउंट मौनगानुई
  • न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश - 7 मार्च - ड्युनेडिन
  • ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान - 8 मार्च - माउंट मौनगानुई
  • इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज - 9 मार्च - ड्युनेडिन
  • न्यूझीलंड विरुद्ध भारत - 10 मार्च - हॅमिल्टन
  • दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान - 11 मार्च - माउंट मौनगानुई
  • भारत विरुद्ध वेस्ट इंडिज - 12 मार्च - हॅमिल्टन
  • न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया - 13 मार्च - वेलिंग्टन
  • बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान - 14 मार्च - हॅमिल्टन
  • इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका - 14 मार्च - माउंट मौनगानुई
  • ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज - 15 मार्च - वेलिंग्टन
  • इंग्लंड विरुद्ध भारत - 16 मार्च - माउंट मौनगानुई
  • न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका - 17 मार्च - हॅमिल्टन
  • बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज - 18 मार्च - माउंट मौनगानुई
  • ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत - 19 मार्च - ऑकलंड
  • न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड - 20 मार्च - ऑकलंड
  • पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज - 21 मार्च - हॅमिल्टन
  • ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका - 22 मार्च - वेलिंग्टन
  • बांगलादेश विरुद्ध भारत - 22 मार्च - हॅमिल्टन
  • दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज - 24 मार्च - वेलिंग्टन
  • इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान - 24 मार्च - क्राइस्टचर्च
  • ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश - 25 मार्च - वेलिंग्टन
  • न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान - 26 मार्च - क्राइस्टचर्च
  • बांगलादेश विरुद्ध इंग्लंड - 27 मार्च - वेलिंग्टन
  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - 28 मार्च - क्राइस्टचर्च
  • उपांत्य फेरी 1 - 30 मार्च - वेलिंग्टन
  • उपांत्य फेरी 2 - 31 मार्च - क्राइस्टचर्च
  • अंतिम सामना - 3 एप्रिल - क्राइस्टचर्च

हेही वाचा - IND v SL Test Series : 100 व्या कसोटी निमित्त विराट कोहलीवर आजी-माजी खेळाडूंकडून शुभेच्छांचा वर्षाव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.