ETV Bharat / sports

West Indies vs India : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजकडून भारताचा दारुण पराभव,साधली 1-1ची बरोबरी

author img

By

Published : Jul 30, 2023, 8:29 AM IST

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने भारताचा दारून पराभव केला. या विजयासह वेस्ट इंडिजने 3 एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजीच्या माऱ्यापुढे भारतीय संघाला 200 धावांचा पल्ला देखील गाठता आला नाही. भारतीय संघाने फक्त 181 धावांचे आव्हान वेस्ट इंडिजसमोर ठेवले होते.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा पराभव
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा पराभव

बारबाडोस: भारतीय संघाने दिलेले माफक आव्हान वेस्ट इंडिजने 4 विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजापुढे टीम इंडियाची फलंदाजी पूर्णपणे ढेपाळली. भारतीय संघ फक्त 181 धावा करु शकला. भारताने दिलेले आव्हान वेस्ट इंडिजने 6 विकेट राखून सहज पार केले. वेस्ट इंडिजचा कर्णधार शाय होप याने कर्णधारपदाला साजेशी 63 धावांची खेळी केली. या विजयासह वेस्ट इंडिजने 3 सामन्याच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली.

टीम इंडियाचे माफक आव्हान: टीम इंडियाने 40.5 षटकात 181 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून ईशान किशन याने 55 धावांची खेळी केली. तर शुभमन गिलने 34 धावा केल्या. या दोघांशिवाय एकाही फलंदाजाला 30 धावसंख्या ओलांडता आली नाही. या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना आराम देण्यात आला होता. त्यांच्या जागी संजू सॅमसन आणि अक्षर पटेल यांना संधी देण्यात आली. परंतु त्यांना या संधीचे सोने करता आले नाही. वेस्ट इंडिजचा कर्णधार शाय होप याने नाणेफेक जिंकली होती. नाणेफेक जिंकल्यानंतर टीम इंडियाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. शुभमन गिल आणि ईशान किशन यांनी डावाची सुरुवात दमदार केली. पहिल्या विकेटसाठी या जोडीने 90 धावांची भागिदारी केली. पण त्यानंतर भारतीय संघाचे फलंदाजी अपयशी ठरले. एकाही फलंदाजाला 30 धावांच्या वरती धावसंख्या करता आली नाही. वेस्ट इंडिजकडून गोलंदाजी करताना मोटी आणि शेफर्ट यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या.

वेस्ट इंडिजची फलंदाजी: टीम इंडियाने दिलेल्या 182 धावांचे माफक आव्हान वेस्ट इंडिजच्या संघाने 36.4 ओव्हरमध्ये पार केले. वेस्ट इंडिजकडून फलंदाजी करताना ब्रँडन किंग आणि कायल मायर्स यांनी पहिल्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी केली. भारताचा गोलंदाज शार्दूल ठाकूरने 15 धावांवर खेळणाऱ्या ब्रँडन किंगला बाद केले. भारतीय संघाने दिलेल्या 182 धावांचे आव्हान वेस्ट इंडिजने 36.4 षटकात चार विकेटच्या मोबदल्यात पार केले. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने दमदार सुरुवात केली. ब्रँडन किंग आणि कायल मायर्स यांनी संयमी आणि दमदार सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी 53 धावांची भागिदारी केली. ब्रँडन किंग याला शार्दूल ठाकूर याने 15 धावांवर बाद केले. एथनाजे यावेळी मोठी खेळी करता आली नाही. फक्त 6 धावांवर तो बाद झाला. कायल मायर्सने 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 36 धावा केल्या. शिमरोन हेटमायरला मोठी खेळी करता आली नाही आणि तो फक्त 9 धावा यावेळी करू शकला. काएसी कॅर्टी नाबाद राहत 48 धावांची खेळी केली. तर कर्णधार शाय होपने नाबाद 63 धावांचे दमदार खेळी केली. शाय होप आणि कॅर्टी यांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद राहत 91 धावांची भागिदारी केली.

हेही वाचा-

  1. Asian Games 2023 : टीम इंडियाला मिळाली थेट क्वार्टरफायनलमध्ये एंट्री! जाणून घ्या कशी
  2. India Vs Pakistan : भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख बदलणार, 'हे' आहे कारण
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.