ETV Bharat / sports

Virat Kohli Dance : क्विक स्टाइल गँगसोबत विराटचा डान्स, पाहा व्हिडिओ

author img

By

Published : Mar 15, 2023, 6:35 AM IST

राजस्थान रॉयल्सने त्यांच्या ट्विटर हँडलवरून विराट कोहलीचा एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये विराट हातात बॅट घेऊन 'क्विक स्टाइल गँग' या डान्स ग्रुपसोबत डान्स करत आहे. विराटचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Virat Kohli Dance
विराट कोहली डान्स

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग 31 मार्चपासून सुरू होत आहे. लीगपूर्वी सर्व फ्रँचायझी संघ क्रिकेटप्रेमींचा उत्साह वाढवण्यासाठी नवनवीन युक्त्या आखत आहेत. राजस्थान रॉयल्सच्या संघाने आपल्या ट्विटर हँडल वरून विराट कोहलीचा एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. या 6 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये विराट कोहली 'क्विक स्टाइल गँग' या डान्स ग्रुपसोबत डान्स करताना दिसत आहे. या आधीही विराट कोहली अनेकदा डान्स करताना दिसला आहे, पण हा व्हिडिओ वेगळा आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून या डान्स ग्रुपनेच त्याला व्हायरल केले आहे.

अमित त्रिवेदी यांचे संगीत : प्रसिद्ध संगीतकार अमित त्रिवेदी यांनी आयपीएल 2023 च्या पार्श्वभूमिवर राजस्थान रॉयल्सच्या टीम साठी लोक गायक मामे खान यांच्यासोबतीने एक गाणे बनवले आहे. हे गाणे पारंपारिक आणि आधुनिक संगीताचे परिपूर्ण मिश्रण आहे जे राजस्थानी लोकसंगीताची समृद्धता दर्शवते. अमित त्रिवेदी हे देव डी, क्वीन, लुटेरा, मनमर्जियां आणि इतर अनेक चित्रपटांमध्ये त्यांच्या संगीतासाठी ओळखले जातात. त्रिवेदी यांनी संगीतबद्ध केलेले 'हल्ला बोल' हे गाणे राजस्थान रॉयल्स संघाच्या अदम्य इच्छाशक्तीला आणि त्यांच्या विजयासाठीच्या मोहिमेला कॅप्चर करते. हे गाणे राजस्थानी, हिंदी आणि इंग्रजी गीतांचे मिश्रण आहे. या गाण्याला अमित त्रिवेदी, मामे खान आणि शर्वी यादव यांनी गायले आहे.

पारंपारिक आणि आधुनिक संगीताचे मिश्रण : नवीन गाण्याबद्दल बोलताना अमित त्रिवेदी म्हणाले की, संगीतकार म्हणून काहीतरी नवीन आणि वेगळे तयार करणे नेहमीच रोमांचक असते आणि राजस्थान रॉयल्सच्या नवीन गाण्याने मला तेच करण्याची परवानगी दिली. ते म्हणाले की, मला राजस्थानी, हिंदी आणि इंग्रजी गीतांचे तसेच पारंपारिक आणि आधुनिक संगीताचे मिश्रण असलेले गाणे सादर करायचे होते, जे सर्व रसिकांना आवडेल. मामे खानसोबत पुन्हा एकदा काम करणे खूप चांगले होते. मला आशा आहे की हे गाणे संघाची भावना आणि खेळाबद्दलची आवड पकडेल.

हेही वाचा : Harbhajan Singh on Ravindra Jadeja : माजी फिरकीपटू हरभजन सिंगने अष्टपैलू रवींद्र जडेजाबाबत केली भविष्यवाणी, म्हणाला - 'एक्स फॅक्टर...'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.