ETV Bharat / sports

T२० World Cup : भारतात नव्हे तर 'या' देशात रंगणार क्रिकेटचा महासंग्राम

author img

By

Published : Jun 26, 2021, 3:37 PM IST

आगामी टी-२० विश्वकरंडक स्पर्धेला १७ ऑक्टोबरपासून यूएईमध्ये सुरूवात होण्याची शक्यता आहे. स्पर्धेचा अंतिम सामना १४ नोव्हेंबरला होईल.

uae-to-host-t20-world-cup-from-oct-17-to-nov-14
uae-to-host-t20-world-cup-from-oct-17-to-nov-14

मुंबई - आगामी टी-२० विश्वकरंडक स्पर्धेला १७ ऑक्टोबरपासून यूएईमध्ये सुरूवात होण्याची शक्यता आहे. स्पर्धेचा अंतिम सामना १४ नोव्हेंबरला होईल. बीसीसीआय या बद्दलची माहिती पुढील बैठकीत आयसीसीला देणार आहे. यूएईमध्ये अबुधाबी, शारजाह आणि दुबई या तीन मैदानावर या स्पर्धेतील सामना होतील. तर ओमानमध्ये पात्रतेसाठी खेळवण्यात येणारे सामने होणार आहेत.

हेही वाचा - WTC Final :'आक्रमकता आणि मूर्खपणा यात फरक', दिग्गजाने पंतला फटकारलं

भारतामध्ये आयपीपीएलचा चौदावा हंगाम कोरोनामुळे मध्यातून पुढे ढकलण्यात आला. आता उर्वरित ही स्पर्धा १७ सप्टेंबरत ते १५ ऑक्टोबर या दरम्यान खेळली जाणार आहे. यानंतर दोन दिवसातच टी-२० विश्वकरंडक स्पर्धेला सुरूवात होणार आहे. बीसीसीआय टी-२० विश्वकरंडक स्पर्धेचे आयोजन भारतात करण्यास इच्छुक होती. परंतु देशातील कोरोना स्थितीमुळे आयपीएल स्पर्धा पुढे ढकलावी लागली. यामुळे आंतरराष्ट्रीय खेळाडू भारतात खेळण्यास उत्सुक होतील की नाही, याचा विचार करून बीसीसीआय ही स्पर्धा यूएईमध्ये खेळवण्याच्या विचारात आहे.

हेही वाचा - WTC स्पर्धेत कोणी घेतल्या सर्वाधिक विकेट्स अन् कोणाच्या नावावर सर्वाधिक धावा

दरम्यान, बीसीसीय यूएईला दुसरा पर्याय म्हणून विचार करत होती. ज्यात ओमानमध्ये पात्रता सामना खेळवण्यात येणार आहेत. बोर्डाने मागील महिन्यात खेळाडूंसाठी हॉटेलदेखील बूक केलं आहे आणि आयसीसीसोबत मिळून ओमान क्रिकेट बोर्डाशी संवाद साधला आहे. यूएईमध्ये आयपीएल संपल्यानंतर तात्काळ विश्वकरंडक घेतल्यास खेळाडूंना संघासोबत जोडणं जाणं सोप्प होईल, असे बीसीसीआयला वाटतं.

दरम्यान, बीसीसीआयने टी-२० विश्वकरंडकाचे ठिकाण बदलल्याने, भारतीय क्रिकेट चाहत्यांची निराशा झाली आहे.

हेही वाचा - शरद पवारांकडून क्रीडा विद्यापीठाच्या जागेची पाहणी; म्हणाले, या विद्यापीठामुळे..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.