ETV Bharat / sports

NZ Players Corona Positive : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी न्यूझीलंडच्या तीन खेळाडूंना कोरोनाची लागण

author img

By

Published : May 20, 2022, 7:16 PM IST

ससेक्सविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्याच्या सकाळी कोविड-19 ची लागण झाल्याचे आढळून आल्यानंतर वरिष्ठ फलंदाज हेन्री निकोल्ससह न्यूझीलंड संघातील तीन सदस्यांना आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आले आहे.

NZ Players
NZ Players

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी न्यूझीलंड संघातील तीन सदस्यांना कोरोनाची लागण ( NZ 3 Players Corona Positive ) झाल्याचे समोर आले आहे. पहिली कसोटी 2 जूनपासून लॉर्ड्सवर खेळवली जाणार आहे. ज्या खेळाडूंना संसर्ग झाला आहे त्यामध्ये अव्वल फळीतील फलंदाज हेन्री निकोल्स, उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज ब्लेअर टिकनर आणि गोलंदाजी प्रशिक्षक शेन जर्गेसन ( Bowling coach Shane Jurgeson ) यांचा समावेश आहे. आता त्यांना हॉटेलमध्येच पाच दिवस आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

न्यूझीलंड क्रिकेट ( New Zealand Cricket ) ने शुक्रवारी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, ब्राइटनमध्ये ससेक्सविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्याच्या सकाळी, संघाचे तीन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, ज्यांना वेगळे ठेवण्यात आले आहे. ससेक्सविरुद्धचा चार दिवसांचा सराव सामना नियोजित वेळेनुसार होईल, असेही त्यात म्हटले आहे. त्याचबरोबर न्यूझीलंड संघातील उर्वरित सदस्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.

  • NEWS | Henry Nicholls, Blair Tickner and Shane Jurgensen have begun 5 days of hotel room isolation after testing positive for Covid-19.

    The remainder of the tour party have returned negative results and today's 4-day Tour match will go ahead as planned.https://t.co/rj2YwSuLsA

    — BLACKCAPS (@BLACKCAPS) May 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

लॉर्ड्स कसोटीपूर्वी न्यूझीलंड 26 ते 29 मे दरम्यान काउंटी सिलेक्ट इलेव्हन विरुद्ध दुसरा सराव खेळेल. त्यानंतर ट्रेंट ब्रिज येथे (10 ते 14 जून) दुसऱ्या कसोटीत संघ आमनेसामने येतील. त्यानंतर हेडिंग्ले येथे (23 ते 27 जून) अंतिम सामना होणार आहे. दरम्यान, वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांचा संघात समावेश केला आहे. तसेच अष्टपैलू बेन स्टोक्सची कसोटी संघाच्या कर्णधारपदी वर्णी लागल्याने इंग्लंड संघ उत्साहीत असेल. त्याचबरोबर इंग्लंडने न्यूझीलंडच्या ब्रेंडन मॅक्युलमची त्यांच्या नवीन कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे

हेही वाचा - Nikhat Zareen Statement : करिअरमधील अडथळ्यांनी मला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवले निखत झरीन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.