ETV Bharat / sports

Ind Vs Aus Match : नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाची फलंदाजी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 27, 2023, 12:31 PM IST

Updated : Sep 27, 2023, 1:09 PM IST

Ind vs Aus Match Preview
भारत आणि ऑस्ट्रेलिया

India VS Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय क्रिकेट सामना आज दुपारी 1.30 वाजता सुरू होणार आहे. हा सामना राजकोटच्या खांदेरी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात भारताचे चार खेळाडू पुनरागमन करणार आहेत. भारतीय संघ या सामन्यात विजय मिळवून क्लीन स्वीप करण्याच्या उद्देशानेच उतरणार आहे.

हैदराबाद : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय क्रिकेट सामना खेळला जाणार आहे. भारतीय संघानं पहिले दोन सामने जिंकून मालिका जिंकली असली, तरी भारतीय संघातील सर्व स्टार खेळाडू तिसर्‍या वनडे सामन्यात खेळणार आहेत. आता मालिकेतील शेवटचा सामना जिंकून मालिकेत 3-0 नं 'क्लीन स्वीप' करण्याचं भारतीय संघाचं लक्ष्य असेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाच्या प्रत्येक खेळाडूनं चांगली कामगिरी केली आहे. तिसरा आणि शेवटचा सामना गुरुवारी दुपारी 1.30 वाजता सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, राजकोट, गुजरात येथे होणार आहे.

हे स्टार खेळाडू परतणार आहेत : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार हार्दिक पांड्या, विराट कोहली खेळताना दिसणार आहेत. या तिन्ही खेळाडूंना पहिल्या दोन सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली होती. जसप्रीत बुमराह दुसऱ्या सामन्यात वैयक्तिक कारणांमुळे खेळू शकला नाही. बुमराहसुद्धा शेवटच्या सामन्यासाठी राजकोटला पोहोचला आहे. यासोबतच पहिल्या दोन वनडेत चमकदार कामगिरी करणाऱ्या शुभमन गिलला तिसऱ्या वनडेतून विश्रांती देण्यात आली आहे. गिलसोबतच वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकुरला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून विश्रांती मिळाली आहे.

मॅक्सवेल आणि स्टार्क परतले : भारताविरुद्धच्या सामन्यात मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेलही खेळताना दिसणार आहेत. ऑस्ट्रेलियाचे दोन्ही स्टार खेळाडू पहिल्या दोन सामन्यात खेळू शकले नाहीत. या दोन खेळाडूंच्या संघात आगमन झाल्यानं ऑस्ट्रेलियन संघाला नक्कीच बळ मिळेल.

हवामान कसं असेल? आज बुधवार 27 सप्टेंबर रोजी राजकोटमध्ये हलकं ढगाळ हवामान अपेक्षित आहे. हवामान खात्यानुसार पावसाची शक्यता केवळ 6 टक्के आहे. हलका मध्यम पाऊस पडू शकतो, सामन्यात जास्त पाऊस पडणार नाही आणि प्रेक्षक संपूर्ण सामन्याचा आनंद घेऊ शकतील. तापमानाबाबत बोलायचं झालं तर कमाल तापमान 34 अंश तर किमान तापमान 25 अंश राहण्याचा अंदाज आहे.

खेळपट्टीचा अहवाल : खांदेरी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी उपयुक्त मानली जात आहे. या खेळपट्टीवर गोलंदाजांना संपूर्ण सामन्यात फारशी मदत मिळत नाही. सुरुवातीला नवीन चेंडूची थोडीफार मदत नक्कीच होते. जुन्या चेंडूनं फिरकीपटूंचा चेंडू वळू लागतो. खांदेरी स्टेडियमच्या या खेळपट्टीवर पहिल्या डावाची सरासरी 310 ते 320 अशी आहे.

दोन्ही संघातील खेळाडू :

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.

ऑस्ट्रेलिया : 1 मिचेल मार्श, 2 डेव्हिड वॉर्नर, 3 स्टीव्ह स्मिथ, 4 मार्नस लॅबुशॅग्ने, 5 अॅलेक्स केरी (विकेटकीपर), 6 ग्लेन मॅक्सवेल, 7 मार्कस स्टॉइनिस, 8 मिचेल स्टार्क, 9 पॅट कमिन्स (क), 10 अॅडम झाम्पा, 11 जोश हेझेलवुड

हेही वाचा :

  1. Kapil Dev Viral video : कपिल देवचं कथित अपहरण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल, काय आहे सत्य?
  2. Indian 10m air rifle team gold: भारताच्या रायफल संघानं देशाला मिळवून दिलं पहिल सुवर्णपदक, संघात ठाण्याच्या रुद्रांक्ष पाटील समावेश
  3. Asian Games : भारतीय पुरुष हॉकी संघाचा सिंगापूरवर १६ १ ने दणदणीत विजय
Last Updated :Sep 27, 2023, 1:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.