ETV Bharat / sports

Sunny Deol Ind Vs Pak : भारत-पाक सामन्यासाठी 'तारा सिंग' सज्ज, सनी देओलने केली 'ही' मोठी घोषणा

author img

By

Published : Aug 19, 2023, 6:19 PM IST

2 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात ब्लॉकबस्टर सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी अभिनेता सनी देओलने मोठी घोषणा केलीय.

Sunny Deol Ind Vs Pak
Sunny Deol Ind Vs Pak

नवी दिल्ली : आशिया चषक 2023 चे आयोजन 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर दरम्यान केले आहे. या स्पर्धेतील भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानशी होणार आहे. 2 सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील कँडी येथे हा सामना होईल. जगभरातील क्रिकेट चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सामन्याचा फिव्हर तमाम क्रिकेट चाहत्यांवर चढलाय. अशा परिस्थितीत बॉलीवूडही यापासून कसं दूर राहील? बॉलीवूडचा 'तारा सिंग' उर्फ ​​सनी देओलही या महासंग्रामात उतरण्यास सज्ज झालाय. या सामन्यापूर्वी सनीने एक मोठी घोषणा केलीय.

स्टार स्पोर्ट्सने जारी केला प्रोमो : स्टार स्पोर्ट्सने भारत-पाकिस्तान सामन्यासाठी एक नवीन प्रोमो जारी केलाय. या प्रोमोमध्ये बॉलीवूड अभिनेता सनी देओल 'हा सामना सुरू होताच मी तारा सिंग बनेल', असे सांगताना दिसतोय. या सामन्यादरम्यान सनी देओल स्टार स्पोर्ट्सवर दिसणार आहे. सनीने त्याच्या 'गदर' आणि 'गदर-2' या चित्रपटात तारा सिंगची भूमिका साकारली आहे. सामन्याचा हा प्रोमो उत्साहाने भरलेला असून तो भारतीय क्रिकेट चाहत्यांना उत्तेजित करण्यासाठी पुरेसा आहे.

सनी देओलचे आवाहन : व्हिडिओद्वारे सनी देओलने भारत-पाकिस्तान सामन्यासाठी भारतीय क्रिकेट चाहत्यांना खास आवाहन केलंय. व्हिडिओमध्ये सनी देओल, चाहत्यांना टीम इंडियाला समर्थन करण्याचे आवाहन करतोय. तसेच मेन इन ब्लू चा उत्साह वाढवा, असे तो म्हणतोय. या व्हिडिओमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांची जुनी क्लिप दिसत आहे. यामध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहलीही आहेत. व्हिडिओमध्ये अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा पाकिस्तानच्या खेळाडूंशी वाद घालताना दिसत आहेत.

भारत पाकिस्तान सामन्याची माहिती : आशिया चषक 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना शनिवार, 2 सप्टेंबर रोजी होणार आहे. हा सामना पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, पल्लेकेले कॅंडी येथे आयोजित केला जाईल. दुपारी ३ वाजता सामना सुरू होईल. तुम्हाला हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट पाहता येईल.

हेही वाचा :

  1. Rishabh Pant : अखेर पंत मैदानात परतला! कार अपघातानंतर प्रथमच खेळला क्रिकेट; Watch Video
  2. Virat Kohli On Babar Azam : बाबर आझमबाबत विराट कोहलीचे मोठे वक्तव्य, म्हणाला..
  3. ICC Cricket World Cup : ताजमहालात पोहोचली वर्ल्डकप ट्रॉफी; सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांची गर्दी, Watch Video
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.