ETV Bharat / sports

Sri Lankan Cricketer Wanindu Hasaranga Marriage : आरसीबीचा खेळाडू वानिंदु हसरंगाने गर्लफ्रेंडसोबत केले लग्न, पाहा फोटो

author img

By

Published : Mar 9, 2023, 4:35 PM IST

श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वानिंदु हसरंगाने त्याची गर्लफ्रेंड विंध्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहते त्याचे अभिनंदन करत आहेत.

Sri Lankan Cricketer Wanindu Hasaranga Marriage
आरसीबीचा खेळाडू वानिंदु हसरंगाने गर्लफ्रेंडसोबत केले लग्न

नवी दिल्ली : श्रीलंकेचा क्रिकेटर आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फिरकीपटू वनिंदु हसरंगा विवाहबंधनात अडकला आहे. त्याने त्याची गर्लफ्रेंड विंध्यासोबत लग्न केले आहे. हसरंगा आणि विंध्याच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हसरंगा त्याची गर्लफ्रेंड विंध्या पद्मपेरुमासोबत बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होता. हसरंगाचे चाहते सतत त्याच्या फोटोवर कमेंट करून त्याचे अभिनंदन करत आहेत. या कपलचा फोटो इंटरनेटवर खूप ट्रेंड करत आहे. लोकांना हा फोटो खूप आवडला आहे. चाहते त्याला शुभेच्छा देत आहेत.

  • Our spin maestro is clean bowled! Many Congratulations @Wanindu49, on beginning a new innings in life! Send in your best wishes to the new couple, 12th Man Army. 🙌

    📸: Danushka Senadeera Photography pic.twitter.com/rkXaJTSwmf

    — Royal Challengers Bangalore (@RCBTweets) March 9, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

स्टार कपलने लग्न केले : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांच्या ट्विटर हँडलवरून स्टार फिरकीपटू वनिंदु हसरंगाचा आणि विंध्यासोबतची एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये हसरंगासोबत त्याची पत्नी विंध्या पद्मपेरुमा दिसत आहे. हसरंगा अनेक दिवसांपासून विंध्याला डेट करत होता. आता या स्टार कपलने लग्न केले आहे. या खास प्रसंगी, दिग्गज क्रिकेटपटू आणि त्यांचे चाहते वनिंदु हसरंगा-विंध्या पद्मपेरुमा यांच्या लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून त्यांचे अभिनंदन केले आहे. लग्नानंतर हसरंगाने पत्नीसोबत फोटोशूटही केले आहे. क्रिकेटर आणि आरसीबीनेही हेच फोटो शेअर केले आहेत. त्यांच्या या फोटोला भरपूर लाईक्स मिळाल्या आहे.

हसरंगाची कारकीर्द : हसरंगाने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत 55 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 46 डावांमध्ये त्याने 503 धावा केल्या आहेत. या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने 54 चौकार आणि 5 षटकारही मारले आहेत. वनडे फॉरमॅटमध्ये त्याने 37 सामन्यांच्या 34 डावांमध्ये 710 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमधली त्याची सर्वोच्च धावसंख्या 80 धावा आहे. त्याचबरोबर त्याने 136 टी-20 सामन्यांमध्ये 1418 धावा केल्या आहेत. त्‍याने टी-20मध्‍ये 5 अर्धशतकेही केली आहेत. हसरंगा आयपीएल संघ आरसीबीकडून खेळतो.

हेही वाचा : Fastest Fifty Of WPL 2023 : गुजरात जायंट्सची खेळाडू सोफियाने आरसीबीच्या गोलंदाजांची केली धुलाई, 18 चेंडूत ठोकले अर्धशतक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.