ETV Bharat / sports

Sri Lanka Cricket : आयसीसीची मोठी कारवाई, श्रीलंका क्रिकेट बोर्ड निलंबित

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 10, 2023, 9:32 PM IST

Updated : Nov 10, 2023, 9:42 PM IST

ICC
ICC

Sri Lanka Cricket : आयसीसीनं शुक्रवारी (१० नोव्हेंबर) श्रीलंका क्रिकेटला निलंबित केलं. काय आहे या मागचं कारण, जाणून घेण्यासाठी वाचा पूर्ण बातमी..

हैदराबाद : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) शुक्रवारी सरकारी हस्तक्षेपामुळे श्रीलंका क्रिकेटला (SLC) निलंबित केलं. भारतात सुरू असलेल्या विश्वचषकात संघाच्या निराशाजनक प्रदर्शनानंतर श्रीलंका सरकारनं श्रीलंका क्रिकेटला बरखास्त केलं होतं.

आयसीसीनं कारवाई का केली : श्रीलंकेच्या संसदेने गुरुवारी एकमताने ठराव मंजूर केल्यानंतर आयसीसीनं हा निर्णय घेतला आहे. या ठरावात श्रीलंका क्रिकेट बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली, ज्याला सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला. आयसीसीनं असा निष्कर्ष काढला की, श्रीलंका क्रिकेट एक सदस्य म्हणून आपल्या दायित्वांचं उल्लंघन करत आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डानं कारभार किंवा प्रशासनात सरकारी हस्तक्षेप होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे.

आयसीसीचं निवेदन : आयसीसीनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, 'निलंबनाच्या अटी आयसीसी बोर्ड योग्य वेळी ठरवेल. २१ नोव्हेंबर रोजी आयसीसी बोर्डाची बैठक होणार आहे. त्यानंतर पुढील पावले उचलली जातील. श्रीलंका पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये ICC अंडर १९ पुरुष क्रिकेट विश्वचषकाचं यजमानपद भूषवणार आहे.

श्रीलंकेला आयसीसी स्पर्धेत सहभागी होता येणार नाही : जोपर्यंत आयसीसी श्रीलंका क्रिकेट बोर्डावरील बंदी उठवत नाही, तोपर्यंत श्रीलंकेला आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. मात्र, चांगली बाब म्हणजे क्रिकेट विश्वचषकातील श्रीलंका संघाचे सर्व सामने आटोपल्यानंतर आयसीसीनं ही कारवाई केली आहे. त्यामुळे विश्वचषकाच्या वेळापत्रकावर याचा कोणताही परिणाम होणार नाही. मात्र, बंदीमुळे श्रीलंकेच्या फ्युचर टूर प्रोग्रामवर (एफटीपी) परिणाम होऊ शकतो.

विश्वचषकात खराब कामगिरी : २०२३ च्या विश्वचषकात श्रीलंकेच्या संघाची कामगिरी अत्यंत खराब राहिली. त्यांना नऊपैकी केवळ दोनच सामने जिंकता आले आहेत. श्रीलंका चार गुणांसह गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. त्यामुळे २०२५ मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील खेळणं श्रीलंकेसाठी खूप कठीण दिसतंय.

हेही वाचा :

  1. Rohit Sharma Captaincy : रोहित शर्माला जबरदस्तीनं कर्णधार बनवलं? 'या' माजी खेळाडूनं केला मोठा खुलासा
  2. Cricket World Cup 2023 : न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रनं जिंकला ऑक्टोबर 'प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्कार
Last Updated :Nov 10, 2023, 9:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.