ETV Bharat / sports

SA vs ENG 1st ODI : स्टोक्सच्या शेवटच्या वनडेत दक्षिण आफ्रिकेकडून इंग्लंडचा 62 धावांनी पराभव

author img

By

Published : Jul 20, 2022, 4:22 PM IST

बेन स्टोक्सच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने रॅसी व्हॅन डर ड्युसेनच्या 134 धावा आणि अॅनरिक नॉर्केच्या चार विकेट्सच्या जोरावर इंग्लंडचा 62 धावांनी पराभव ( SA beat England in stokes last odi ) केला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या 334 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इंग्लंडचा संघ 271 धावांवर आटोपला.

Stokes
स्टोक्स

चेस्टर ली स्ट्रीट: रॅसी व्हॅन डर ड्युसेनच्या 134 धावा आणि अॅनरिक नॉर्टजेच्या चार विकेट्सच्या जोरावर, दक्षिण आफ्रिकेने बेन स्टोक्सच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा 62 धावांनी पराभव ( SA beat England in stokes last odi ) केला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने पाच गड्यांच्या मोबदल्यात 333 धावा केल्या होत्या. वॅन डर ड्युसेनने जानेमन मलान (57) आणि एडन मार्कराम (77) यांच्यासोबत शतकी भागीदारी केली. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 271 धावांवर आटोपला.

वनडे क्रिकेटमधील रॅसी व्हॅन डर ड्युसेनची यापूर्वीची सर्वोच्च धावसंख्या ( Rassie van der Deusens highest score ) जानेवारीमध्ये भारताविरुद्धची नाबाद 129 होती. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 46.5 षटकांत 271 धावांवर आटोपला. जो रूटने 77 चेंडूंत 5 चौकार आणि 2 षटकारांसह 86 धावा केल्या. नोर्कियाने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. दुसरा एकदिवसीय सामना शुक्रवारी होणार आहे. स्टोक्सची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कारकीर्द स्मरणात राहील, कारण त्याने 2019 च्या विश्वचषक फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध लॉर्ड्स येथे झालेल्या सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी केली होती.

बेन स्टोक्सच्या नाबाद 84 धावांच्या जोरावर इंग्लंडचा संघ 50 षटकांचे पहिले विश्वविजेतेपद ( England first ODI World Cup title ) पटकावण्यात यशस्वी ठरला. इंग्लंडचा कसोटी कर्णधार स्टोक्सने 105 एकदिवसीय सामन्यांमध्ये 2924 धावा करण्याव्यतिरिक्त 74 बळी घेतले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इंग्लंडकडून जो रूटने 77 चेंडूत 86 धावा केल्या. त्याच्या खेळीत पाच चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता.

रूटच्या वनडेमध्ये 50.45 च्या सरासरीने 6,206 धावा आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये धावांच्या बाबतीत त्याने केन विल्यमसनला (6173) मागे टाकले आहे. जॉनी बेअरस्टोने 71 चेंडूत 63 धावा केल्या. त्याच्या आता 46.83 च्या सरासरीने 3606 धावा झाल्या आहेत. त्याने आपले 15 वे अर्धशतक ( Jonny Bairstow 15th half-century ) झळकावले.

हेही वाचा - Dope Test : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपूर्वी भारताला मोठा धक्का; धावपटू धनलक्ष्मीसह दोन खेळाडू डोप चाचणीत नापास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.