ETV Bharat / sports

India vs West Indies : भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघात हेटमायरचे पुनरागमन

author img

By

Published : Jul 29, 2022, 6:43 PM IST

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात टी-20 ( India vs West Indies T20 Series ) मालिकेतील पहिला सामना आज म्हणजेच 29 जुलै रोजी खेळला जाणार आहे. अलीकडेच एकदिवसीय मालिकेत 3-0 असा क्लीन स्वीप केल्यानंतर भारतीय संघाची नजर आता पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेवर आहे.

Shimron Hetmyer
शिमरॉन हेटमायर

पोर्ट ऑफ स्पेन (त्रिनिदाद): क्रिकेट वेस्ट इंडिजने (CWI) डावखुरा फलंदाज शिमरॉन हेटमायरचा 16 जणांच्या संघात समावेश ( Shimron Hetmyer back in WI squad ) केला आहे. तो भारताविरुद्ध पाच सामन्यांची T20I आणि न्यूझीलंडविरुद्ध तीन T20I मालिका खेळणार आहेत. दुसरीकडे, शेल्डन कॉट्रेल आणि अष्टपैलू फॅबिन अॅलन यांचा संघात समावेश नाही. कॉटरेल दुखापतीतून सावरत आहे. त्याचबरोबर, अॅलन त्याच्या वैयक्तिक कारणांमुळे संघात सामील झाला नाही.

भारताविरुद्ध शुक्रवारी म्हणजेच आज पाच टी-20 सामन्यांच्या ( India vs West Indies T20 Series ) मालिकेतील पहिला सामना होणार आहे. पहिला सामना ब्रायन लारा स्टेडियमवर होणार आहे. भारताविरुद्धची मालिका संपल्यानंतर 16 जणांच्या संघात समाविष्ट असलेला हेटमायर न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. क्रिकेट वेस्ट इंडिज निवडकर्ते डेसमंड हेन्स म्हणाले, "आम्ही हेटमायरचे संघात स्वागत करतो आणि त्याला पुन्हा वेस्ट इंडिजकडून खेळताना पाहून खूप आनंद झाला." आमच्या संघात एक चांगला फिनिशर आहे, जो सामना पूर्ण करण्यास सक्षम आहे.

वेस्ट इंडिज संघ: निकोलस पूरन (कर्णधार), रोव्हमन पॉवेल (उपकर्णधार), शामर ब्रूक्स, डॉमिनिक ड्रेक्स, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, अकिल होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, काइल मेयर्स, ओबेद मॅककॉय, कीमो पॉल, रोमॅरियो शेफर , ओडियन स्मिथ, डेव्हॉन थॉमस आणि हेडन वॉल्श.

हेही वाचा - IND vs WI T20 Series : दुखापतीमुळे केएल राहुल टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' धडाकेबाज फलंदाजाला मिळाली संधी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.