ETV Bharat / sports

IPL 2022 Updates : आरसीबीच्या ऍथलेटिक क्षेत्ररक्षणाने केले सर्वांना प्रभावित

author img

By

Published : Apr 21, 2022, 3:54 PM IST

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ( RCB ) त्यांचा कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि मधल्या फळीतील फलंदाज ग्लेन मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिक यांच्यावर भरवसा ठेवला आहे. त्याचवेळी अनुज रावत आणि सुयश प्रभुदेसाई यांच्या ऍथलेटिक क्षेत्ररक्षणाने ( Athletic fielding ) सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

RCB
RCB

मुंबई: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ( Royal Challengers Bangalore ) संघाची कामगिरी शानदार राहिली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ सध्या गुणतालिकेत दहा गुणांसह दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. तरी देखील आता आरसीबीचा संघ एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. कारण आरसीबीचा संघ मैदानावर मोठ्या प्रमाणात जीव तोडून खेलताना दिसतोय. कारण मागील सामन्यात या संघाने उत्तम क्षेत्ररक्षण केले आहे.

आरसीबीच्या खेळाडूंनी खेळपट्टीवर काही चमकदार क्षेत्ररक्षण करताना 16 एप्रिल रोजी दिल्लीचा 16 धावांनी पराभव केला. दिनेश कार्तिकने सामन्यात नाबाद 66 धावांची खेळी केली, माजी कर्णधार विराट कोहली ( Former captain Virat Kohli ) मैदानावर फार काही दाखवू शकला नाही, तर रावत, प्रभुदेसाई आणि डु प्लेसिस मैदानावर डीसीचे अनेक चौकार वाचवण्यात यशस्वी ठरले.

19 एप्रिल रोजी, लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात, आरसीबीने 18 धावांनी विजय मिळवून गुणतालिकेत क्रमांक 2 वर पोहोचले. या सामन्यात प्रभुदेसाई यांनी चांगला झेल घेतला, तर कोहली, डु प्लेसिस आणि रावत यांनी मैदानावर अप्रतिम क्षेत्ररक्षण केले. आपल्या संघाला मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करताना पाहून फाफ डू प्लेसिसला ( Faf du Plessis ) देखील खूप आनंद झाला आहे. तो म्हणाला, आमच्या संघात चांगले खेळाडू आहेत. आम्ही प्रत्येक वेळी मैदानावर आमचे 100 टक्के देतो याची आम्हाला खात्री आहे.

आपल्या संघाच्या गोलंदाजीबद्दलही तो म्हणाला, “आमचे गोलंदाज त्यांचे काम करत आहेत. पण असे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करण्यानेही मदत होते. आम्हाला फक्त हे सुनिश्चित करायचे आहे की, आमच्याकडे सर्व संघांपैकी सर्वोत्तम खेळाडू मैदानावर आहेत. डू प्लेसिसने स्वतःला दुखापत होण्याची भीती असताना दोन महत्त्वपूर्ण धावा वाचवण्याचा चांगला प्रयत्न केला, पण शेवटी त्यांनी एकत्रितपणे चांगली कामगिरी केली.

खरेतर, 16 एप्रिल रोजी वानखेडे येथे डीसी विरुद्ध संघाच्या विजयानंतर आरसीबीचा मधल्या फळीतील विश्वासू फलंदाज मॅक्सवेलने रावत आणि प्रभुदेसाई यांचे कौतुक केले होते. तो म्हणाला की, "मला येथे अनुज रावत ( Anuj Rawat ) आणि सुयश प्रभुदेसाई या दोन खेळाडूंचा खरोखर अभिमान आहे. त्याने या सामन्यात चांगलाच सकारात्मक प्रभाव पाडला आहे. मला वाटतं जेव्हा असे खेळाडू संघात येतात तेव्हा संघाची पातळी खरोखरच उंचावते.''

हेही वाचा - Ipl 2022 Mi Vs Csk : आयपीएल स्पर्धेतील कट्टर प्रतिस्पर्धी, मुंबई आणि चेन्नई आज आमने सामने

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.