ETV Bharat / sports

Royal Challengers Bangalore Updates : विराट जरी कर्णधार नसला, तरी आरसीबीला नेहमीच त्याच्या ऊर्जेची गरज - फाफ डू प्लेसिस

author img

By

Published : Mar 13, 2022, 5:26 PM IST

फाफ डू प्लेसिसने ( Captain Faf du Plessis ) शनिवारी सांगितले की, विराट कोहली कर्णधार पदावरून पायउतार झाला असला, तरी इंडियन प्रीमियर लीगमधील त्याच्या मोहिमेदरम्यान आरसीबी संघाला प्रत्येक टप्प्यावर त्याच्या उर्जेची आवश्यकता असणार आहे.

Faf Du Plessis
Faf Du Plessis

बंगळुरू : आयपीएल 2022 ( IPL 2022 ) या स्पर्धेला 26 मार्च पासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी रॉयल चॅलेजर्स बंगळुरु ( Royal Challengers Bangalore ) संघाने आयपीएलच्या पंधराव्या हंगामासाठी आपल्या संघाचा कर्णधार म्हणून फाफ डु प्लेसीची शनिवारी नियुक्ती केली आहे. त्यानंतर फाफ डु प्लेसीनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चे नवनियुक्त कर्णधार फाफ डू प्लेसिसने ( Captain Faf du Plessis ) शनिवारी सांगितले की, विराट कोहली कर्णधार पदावरून पायउतार झाला असला, तरी इंडियन प्रीमियर लीगमधील त्याच्या मोहिमेदरम्यान आरसीबी संघाला प्रत्येक टप्प्यावर त्याच्या उर्जेची आवश्यकता असणार आहे.

चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings ) सोबत चारवेळा आयपीएल किताब जिंकणारा फाफ डू प्लेसिस आयपीएलच्या पंधराव्या हंगामात आरसीबी संघाची कमान सांभाळणार आहे. या अगोदर म्हणजे 2021 च्या स्पर्धेपर्यंत या संघाची नेतृत्वाची धुरा विराट कोहली सांभाळत होता.

कर्णधाराच्या घोषणेसाठी आयोजित ऑनलाइन कार्यक्रमादरम्यान डु प्लेसिस म्हणाला ( Du Plessis said ), "तो (कोहली) कर्णधार नसतानाही संघात जी ऊर्जा आणतो. ती संघासाठी खूप महत्त्वाची आहे. आम्ही त्याच्या ऊर्जेचा सर्वोत्तम वापर करण्याचा प्रयत्न करू." तसेच डु प्लेसिस म्हणाला, कोहलीने आपल्या नेतृत्वाच्या जोरावर भारतीय क्रिकेट बदल घडवून आणला.

तो पुढे म्हणाला, "क्रिकेटपटू म्हणून त्याची कामगिरी कदाचित सर्वोत्कृष्ट आहे, त्यामुळे त्याने केवळ आपल्या बॅटनेच नाही तर कर्णधारासोबतही जे केले, त्याबद्दल त्याला प्रचंड आदर आहे, त्याने भारतीय क्रिकेट बदलले." फ्रेंचायझीकडे कोहलीच्या व्यतिरिक्त ग्लेन मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिकच्या ( Glenn Maxwell and Dinesh Karthik ) नावाचा पर्याय उपलब्ध होता. ज्यांच्याकडे नेतृत्व करण्याचा अनुभव आहे.

डु प्लेसिस एबी डिविलियर्स ( Du Plessis on AB de Villiers ) बद्दल बोलताना म्हणाला, ''त्याची जागा घेणे खुप अवघड आहे. जगात असा एकही खेळाडू नाही, जो एबीची जागा घेण्याचा प्रयत्न करु शकेल. त्याचा दर्जा खूप वरचा आहे. माझ्याकडे काही मोठे खेळाडू आहेत पण ते एबीच्या कामगिरीची बरोबरी कधीच करू शकत नाहीत.”

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.