ETV Bharat / sports

रोहित शर्माच्या कसोटी कर्णधारपदी नियुक्तीला पाँटिंगने दिला पाठिंबा

author img

By

Published : Jan 31, 2022, 5:37 PM IST

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या (Former Australia captain Ricky Ponting) मते, विराट कोहलीने कसोटी कर्णधार पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता कसोटीचे कर्णधारपद रिकामे आहे, ते रोहित शर्माकडे दिले जावे. आता बीसीसीआय काय निर्णय घेते याची उत्सुकता आहे.

ROHIT SHARMA
ROHIT SHARMA

मेलबर्न: काही दिवसापूर्वी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India v South Africa Series) संघात कसोटी मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाला 2-1 अशा फरकाने लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. तर भारतीय कसोटी संघाचा नवीन उपकर्णधार रोहित शर्मा मात्र या मालिकेत उपस्थित नव्हता. त्याला दुखापत झाल्याने त्याने माघार घेतली होती. तर त्यानंतर विराट कोहलीने कसोटी कर्णधार पदाचा राजीनामा (Virat Kohli resigns as Test captain) दिला आहे. त्यामुळे कसोटी कर्णधार पदासाठी रोहित शर्माचे नाव आघाडीवर आहे. रोहित शर्माकडे कसोटीचे नेतृत्व दिले जावे यासाठी रिकी पाँटिंगने देखील समर्थन दिले आहे.

रोहित शर्मा सध्या भारतीय मर्यादीत षटकांच्या संघाचा कर्णधार आहे. त्या अगोदर पासून तो आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व (Mumbai Indians captain Rohit Sharma) करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने पाचवेळा विजेतेपदक पटकावले आहे. तसेच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 22 टी-20 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 18 सामन्यात भारताचा विजय झाला आहे, तर चार सामन्यात पराभव झाला आहे. 10 वनडे सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करताना रोहित शर्माने आठ सामने जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत.

आयसीसीच्या रिव्हू शोमध्ये (ICC Review Show) रिकी पाँटिंग म्हणाला, मला वाटते की त्याने मुंबई इंडियन्ससाठी उत्कृष्ट कर्णधारपद भूषवले आहे. तो तेथील एक अतिशय यशस्वी कर्णधार आहे आणि त्यांनी काही प्रसंगी भारताचे नेतृत्वही केले आहे. दोन वेळा पुरुष क्रिकेट विश्वचषक विजेता कर्णधार पाँटिंग म्हणाला की, गेल्या २-३ वर्षांत त्याने आपल्या कसोटी क्रिकेटमध्ये जे काही केले आहे, त्यावर तर्क करणे फार कठीण आहे. त्या काळात त्याने जगभरात धावा केल्या आहेत आणि पांढर्‍या चेंडूचा खेळाडू म्हणून तो किती चांगला आहे, हे आपल्याला माहीत आहे.

अजिंक्य रहाणे हा कसोटी कर्णधारपदासाठी चांगला पर्याय ठरू शकतो, असा विश्वास पाँटिंगला आहे. रहाणेने सहा कसोटीत भारताचे नेतृत्व केले. ज्यापैकी चार जिंकले आणि दोन सामने अनिर्णित राहिले. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर कसोटी आणि एकदिवसीय कर्णधारपदावर पदार्पण करणारा केएल राहुल नेतृत्वाच्या भूमिकेत कशी कामगिरी करेल याची माजी कर्णधाराला खात्री नव्हती.

तो म्हणाला, मी केएल राहुलला चांगल्या प्रकारे ओळखत नाही. मी त्याच्याबद्दल रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेतले आहे, जो एक प्रतिभावान खेळाडू आहे आणि तो सध्या चांगल्या प्रकारे खेळत आहे. खरेतर तो एक चांगला कसोटी विक्रम बनवायाला सुरुवात करत आहे. विशेषता विदेशात आता काही नावे समोर येतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.