ETV Bharat / sports

WTC Final : न्यूझीलंडला फायदा पण आम्हीही तयार - रहाणे

author img

By

Published : Jun 16, 2021, 10:00 PM IST

न्यूझीलंडचा संघ चांगला संघ आहे. आम्ही त्यांना कमी लेखू शकत नाही. न्यूझीलंडने अंतिम सामन्याआधी इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामने खेळली आहेत. याचा त्यांना फायदा होईल. पण अंतिम सामन्यात जो संघ पाच दिवस चांगली कामगिरी करेल, त्याची विजयाची शक्यता जास्त राहिलं, असे अजिंक्य रहाणेने सांगितलं.

nz-have-advantage-but-we-are-mentally-prepared-rahane
WTC Final : न्यूझीलंडला फायदा पण आम्हीही तयार - रहाणे

साउथम्पटन - भारत आणि न्यूझीलंड यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला १८ जूनपासून सुरूवात होणार आहे. या सामन्याआधी न्यूझीलंड संघाने इंग्लंडविरोधात दोन सामन्याची कसोटी मालिका खेळली. याचा त्यांना नक्कीच फायदा होईल. परंतु, भारतीय संघ मानसिकरित्या अंतिम सामन्यासाठी सज्ज असल्याचे उपकर्णधार अजिंक्य रहाणेने सांगितलं.

रहाणे म्हणाला की, न्यूझीलंडचा संघ चांगला संघ आहे. आम्ही त्यांना कमी लेखू शकत नाही. न्यूझीलंडने अंतिम सामन्याआधी इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामने खेळली आहेत. याचा त्यांना फायदा होईल. पण अंतिम सामन्यात जो संघ पाच दिवस चांगली कामगिरी करेल, त्याची विजयाची शक्यता जास्त राहिलं.

भारतीय संघाला अंतिम सामन्याआधी सरावासाठी कमी वेळ मिळाला. याविषयी रहाणे म्हणाला, माझ्या मते, ही बाब मानसिक असून तुम्ही जर मानसिक रुपाने स्विच कराल तर परिस्थितीला जुळवून घ्याल. हा एक फक्त सामना असून याला अन्य सामन्याप्रमाणे खेळलं पाहिजे. हा अंतिम सामना आहे याचा विचार देखील करु नये. आम्ही स्वत:वर जास्त दबाव निर्माण करू इच्छित नाही. चांगली सुरूवात करणे, हे आमच्यासाठी महत्वपूर्ण असल्याचे देखील रहाणे म्हणाला.

हेही वाचा - WTC Final: भारताने ICC कडे केली न्यूझीलंडच्या खेळाडूंची तक्रार; जाणून घ्या कारण

हेही वाचा - WTC Final : फायनलपूर्वीच न्यूझीलंड खेळाडूंची जंगी पार्टी, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.