ETV Bharat / sports

लसिथ मलिंगाचे टी-२० वर्ल्डकपसाठी होऊ शकते श्रीलंकन संघात पुनरागमन

author img

By

Published : May 10, 2021, 7:07 PM IST

एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेल्या मलिंगाला आयपीएलच्या फ्रेंचायझी मुंबई इंडियन्सने (एमआय) २०२१ च्या लिलावापूर्वी सोडले होते. तो १२२ सामन्यांत १७० बळी घेणारा लीगचा अग्रगण्य विकेट घेणारा गोलंदाज आहे. तो पुन्हा श्रीलंकन संघात पुनरागमन करु शकतो.

Lasith Malinga
लसिथ मलिंगा

कॅन्डी - श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी राष्ट्रीय संघात परत येऊ शकतो असे मत राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष प्रमोद्य विक्रमसिंघे यांनी सांगितले.

विक्रमसिंघे म्हणाले, “आम्ही लवकरच लसिथशी बोलू. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी -२० विश्वचषक स्पर्धेसह आगामी टी -२० दौऱयांसाठी आम्ही त्याचा विचार करीत आहेत,” असे विक्रमसिंघे म्हणाले.

"आम्ही २०२३ (५० ओव्हर) विश्वकरंडकच्या उद्देशाने दीर्घकालीन योजना आखत आहोत. आमचा मुख्य फोकस हा दोन मुख्य बाबींच्या बाबतीत अचूक सरासरी तयार करण्यावर अवलंबून आहे. ते म्हणजे वय आणि फिटनेस यावर,'' असे विक्रमसिंघे यांनी मॉर्निंग स्पोर्ट्सला सांगितले.

एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेल्या मलिंगाला आयपीएलच्या फ्रेंचायझी मुंबई इंडियन्सने (एमआय) २०२१ च्या लिलावापूर्वी सोडले होते. त्याने १२२ सामन्यांत १७० बळी घेतले आहेत.

आयपीएलच्या २००८ मध्ये उद्घाटन झाल्यापासून लसिथ मलिंगा मुंबई इंडियन्स संघाचा प्रमुख गोलंदाज आहे.

२०२१ आणि २०२२ मध्ये नियोजित एका पाठोपाठ एक टी -२० विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेला मलिंगासारख्या अनुभवी गोलंदाजची गरज आहे.

"लसिथ मलिंगादेखील आमच्या प्लॅनमध्ये आहे. तो सध्याच्या फॉर्ममध्येही स्रवोत्कृष्ट गोलंदाज आहे हे आम्ही विसरु शकत नाही. त्याचे रेकॉर्ड त्याबद्दल बोलतात. यावर्षी आणि पुढील वर्षी. एका पाठोपाठ एक असे दोन टी -20 वर्ल्डकप येत आहेत. काही दिवसात जेव्हा आपण त्याला भेटेन तेव्हा आम्ही त्याच्याशी आमच्या योजनांवर चर्चा करू'', असे श्रीलंकेचे माजी वेगवान गोलंदाज विक्रमसिंघे म्हणाले.

मलिंगाने सांगितले की, निवड समितीला भेटायला आपण उत्सुक आहोत.

"मी कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे पण टी -२० मधून नाही. निवड समिती माझ्यासारख्या ज्येष्ठ खेळाडूची सेवा राष्ट्रीय संघात कशी घेणार आहे हे जाणून घेण्यास मी उत्सुक आहे. माझ्या कारकीर्दीत मी दीर्घ विश्रांतीनंतर परत येऊन चांगली कामगिरी करुन मी हे सिध्दकेलं आहे.'', असे तो म्हणाला.

हेही वाचा - जगदंबा तलवार भारतात आणावी या मागणीसाठी कोल्हापूरचे शिवभक्त घुसले क्रिकेट मैदानात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.