ETV Bharat / sports

KL Rahul Statement : गुजरात टायटन्सकडून झालेल्या पराभवाचा खेळाडूंवर कोणताही परिणाम होणार नाही - केएल राहुल

author img

By

Published : May 11, 2022, 6:42 PM IST

KL Rahul
KL Rahul

इंडियन प्रीमियर लीग 2022 चा 57 वा सामना पुण्यात लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. गुजरातने हा सामना 62 धावांनी जिंकला आणि आयपीएलच्या या हंगामातील प्लेऑफसाठी पात्र ठरले. अशा परिस्थितीत लखनौचा कर्णधार केएल राहुलने या सामन्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

पुणे: आयपीएल 2022 ( IPL 2022 ) च्या 58 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने लखनौ सुपरजायंट्सचा 62 धावांनी पराभव ( Gujarat Titans Beat Lucknow Super Giants ) केला. यासह गुजरात टायटन्स हा आयपीएलच्या पंधराव्या हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. त्यानंतर लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) कर्णधार केएल राहुलने सांगितले की, गुजरात टायटन्स (जीटी) कडून झालेल्या 62 धावांनी पराभवाचा खेळाडूंच्या मनोबलावर कोणताही परिणाम होणार नाही.

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने मंगळवारी एलएसजी विरुद्ध 62 धावांनी विजय मिळवून प्लेऑफमध्ये प्रवेश केला. पराभवानंतर एलएसजी ( LSG ) सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असून संघाचे 16 गुण आहेत. पण त्यांना अव्वल चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांच्या उर्वरित दोन सामन्यांपैकी एक जिंकणे आवश्यक आहे. याशिवाय राजस्थान रॉयल्स आणि आरसीबीचे 14-14 गुण आहेत, तर दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद 10-10 गुणांसह मधल्या फळीत कायम आहेत.

गुजरातच्या हातून पराभव स्वीकारल्यानंतर कर्णधार केएल राहुल ( Captain KL Rahul ) म्हणाला की, या पराभवाचा संघातील खेळाडूंवर परिणाम होणार नाही. कारण पुढचा सामना जिंकण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. आम्ही या पराभवाचे जास्त विश्लेषण करणार नाही. कारण प्रत्येक खेळाडूला फलंदाजीची संधी मिळते आणि त्यात आमच्याकडून चुकाही होऊ शकतात.

मात्र, 144 धावांची धावसंख्या जास्त नसल्याचे कर्णधाराने सांगितले. लक्ष्याचा पाठलाग करताना फलंदाजांनी चांगली कामगिरी करायला हवी होती. या पराभवामुळे खेळाडूंना आगामी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल. या पराभवासह आम्ही काही चांगले करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आगामी सामन्यांमध्ये आम्हाला यश मिळेल.

गुजरात टायटन्सने आयपीएल 2022 ( IPL 2022 ) च्‍या 57 व्‍या सामन्‍यात लखनौ सुपर जायंट्‍सचा 62 धावांनी पराभव केला आणि प्लेऑफचे तिकीट जिंकले. गुजरातचे 18 गुण असून तो प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 20 षटकांत 4 बाद 144 धावा केल्या. सलामीवीर शुबमन गिलने नाबाद 63 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लखनौ सुपर जायंट्सचा ( Lucknow Super Giants ) संघ 13.5 षटकांत 82 धावांत गारद झाला.

हेही वाचा - IPL 2022 Updates : प्लेऑफमध्ये पोहोचणार पहिला संघ ठरल्यानंतर, हार्दिक पांड्याचे मोठे वक्तव्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.