ETV Bharat / sports

MI Vs RR : जॉस बटलरच्या वादळी खेळीने राजस्थानचा 'रॉयल' विजयी; मुंबईचा दारुण पराभव

author img

By

Published : Apr 2, 2022, 9:38 PM IST

Rajasthan Royals
Rajasthan Royals

आयपीएलमधील ( IPL 2022 ) नववा सामना डी.वाय.पाटील स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा 23 धावांनी पराभव केला ( Rajasthan Royals Beat Mumbai Indians ) आहे.

मुंबई - आयपीएलचा ( IPL 2022 ) नववा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्या पार पडला. हा सामना नवी मुंबईतील डी.वाय पाटील स्टेडियमवर खेळण्यात आला होता. या सामन्यात राजस्थानने मुंबईला 23 धावांनी पराभवाची धुळ ( Rajasthan Royals Beat Mumbai Indians ) चारली आहे. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या राजस्थानच्या संघाने मुंबईसमोर 194 धावांचे लक्ष ठेवले होते. या लक्षाचा पाठलाग करताना मुंबईने 20 षटकात आठ बाद 170 धावा ठोकल्या.

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या राजस्थानची सुरुवात चांगली झाली नाही. जसप्रित बुमराहने सलामीवीर यशस्वी जयस्वालला बाद करत राजस्थानला पहिला धक्का दिला. त्यानंतर जॉस बटलर आणि देवदत्त पडीकलने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, सहाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पडकीलच बाद झाला. त्यानंतर आलेल्या कर्णधार संजू सॅमसनेही आक्रमख खेळी उभारली होती. पण, पोलार्डच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. यादरम्यान बटरलचा आक्रमक खेळ सुरु होता. हेटमायरने 15 चेंडू 35 धावा केल्या. 9 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बुमराहने त्यांची विकेट घेतली. बटलरच्याही आक्रमक खेळीला रोखण्यात बुमहारला यश आले. तदनंतर, रियान पराग 5 धावा, आर. अश्विन 1, नवदीप सैनी 2 तर टेन्ट बोल्टने नाबाद एक धाव ठोकली आणि राजस्थानने मुंबईसमोर 195 धावांचे आव्हान ठेवले.

प्रत्युत्तरात उतरलेल्या मुंबईची सुरुवातही खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा 10, अनमोलप्रीत सिंग 5 धावांवर माघारी गेला. मुंबईची अवस्था 2 बाद 40 अशी झाली. त्यानंतर मैदानावर उतरलेल्या ईशान किशनने 43 चेंडूत 54 धाव्या केल्या. तर, दुसऱ्या बाजूला तिलक वर्माने 30 चेंडूत अर्धशतक केले. तिलकने 33 चेंडूत 5 षटकार 3 चौकारांसह 61 धाव्या केल्या. त्यानंतर मैदानात कायरन पोलार्ड आणि टीम डेव्हिड हे फलंदाज होते. मात्र, 16 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर चहलने डेव्हिडला बाद केले. पुढच्याच चेंडूवर डॅनियल सॅम्स भोपळा न फोडता माघारी परतला. आता मुंबईचा तारणाहार पोलार्डच मैदानात उरलेला होता. परंतु, पोलार्डने सुद्धा आक्रमक खेळी केली नाही. मुंबईला 20 षटकात 8 बाद 190 धावांपर्यत मजल मारता आली आणि दुसऱ्या पराभावचा सामना करावा लागला.

जॉस बटलरची वादळी खेळी - राजस्थानचा फलंदाज जॉस बटलरने शतकी खेळी केली आहे. 67 चेंडूत 11 चौकार आणि पाच षटकारासह त्याने शतक झळकावले आहे. अखेरच्या षटकात जसप्री बुमराहने बटलरला बाद केले. मात्र, बटलरने या हंगामातील आपले पहिले शतक झळकावले आहे. बटलरचे आयपीएलमधील हे दुसरे शतक आहे

हेही वाचा - IPL 2022: आयपीएलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; 6 एप्रिलपासून 50 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.