ETV Bharat / sports

IPL 2023 : केकेआरने आरसीबीला 81 धावांनी नमवले आरसीबीची दमछाक

author img

By

Published : Apr 6, 2023, 12:57 PM IST

Updated : Apr 6, 2023, 11:35 PM IST

आयपीएल 2023 च्या 9व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये सामना रंगला. केकेआरने आरसीबीसमोर 205 धावांचे टार्गेट ठेवले होते. अखेर केकेआरने आरसीबीला 81 धावांनी नमवले 205 धावांचे आव्हानाचा सामना करताना आरसीबीची दमछाक झाली.

IPL 2023
केकेआर आणि आरसीबीमध्ये होणार रंगतदार सामना

नवी दिल्ली : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएलचा 9वा सामना ईडन गार्डन्सवर झाला. आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडले. नितीश राणाच्या नेतृत्वाखाली प्रथम फलंदाजी करताना केकेआरने आरसीबीला २०५ धावांचे लक्ष्य दिले. लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची दमछाक झाली. केकेआरकडून शार्दुल ठाकूर, रहमानउल्ला गुरबाज आणि रिंकू सिंग यांनी सर्वाधिक धावा केल्या.

शार्दुल, रिंकूची 102 धावांची भागीदारी : शार्दुलने 29 चेंडूत तुफानी खेळी खेळताना 9 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 68 धावा जोडल्या. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या गुरबाजने 44 चेंडूंत 6 चौकार आणि 3 षटकारांसह 57 धावा केल्या. त्याचवेळी तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या रिंकूने 33 चेंडूत 46 धावा केल्या. रिंकूच्या या खेळीत त्याच्या दोन चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे. शार्दुल आणि रिंकूने 102 धावांची शानदार भागीदारी केली. या भागीदारी खेळीमुळे केकेआरने 204 धावांची मजल मारली.

केकेआरसाठी तिघांनी रचला धावांचा डोंगर : या तिघांशिवाय केकेआरचा एकही फलंदाज क्रीजवर टिकू शकला नाही. आरसीबीच्या डेव्हिड विली आणि कर्ण शर्माने २-२ बळी घेतले. केकेआरकडून शार्दुल ठाकूर, रहमानउल्ला गुरबाज आणि रिंकू सिंग यांनी सर्वाधिक धावा केल्या. शार्दुलने 29 चेंडूत तुफानी खेळी खेळताना 9 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 68 धावा जोडल्या. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या गुरबाजने 44 चेंडूंत 6 चौकार आणि 3 षटकारांसह 57 धावा केल्या.

केकेआरची 204 धावांची मजल : त्याचवेळी तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या रिंकूने 33 चेंडूत 46 धावा केल्या. रिंकूच्या या खेळीत त्याच्या दोन चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे. शार्दुल आणि रिंकूने 102 धावांची शानदार भागीदारी केली. या भागीदारी खेळीमुळे केकेआरने 204 धावांची मजल मारली. या तिघांशिवाय केकेआरचा एकही फलंदाज क्रीजवर टिकू शकला नाही. आरसीबीच्या डेव्हिड विली आणि कर्ण शर्माने २-२ बळी घेतले.

आरसीबीची १०० धावांसाठी धावपळ : रहमानुल्लाह गुरबाजची दमदार सलामी आणि लॉर्ड शार्दुलच्या फिनिशिंगच्या जोरावर कोलकाताने 20 ओव्हरमध्ये 7 विकेटच्या मोबदल्यात 204 धावा केल्या. लॉर्ड शार्दुल ठाकूर याने 68, रहमानुल्लाह गुरबाज याने 57 तर रिंकू सिंह याने 46 धावांची खेळी केली. आरसीबीकडून डेविड विली आणि कर्ण शर्मा यांनी भेदक मारा केला. कोलकाताने आरसीबीला विजयासाठी 205 धावांचे टार्गेट दिले आहे. या टार्गेटचा पाठलाग करताना आरसीबीचा निम्मा संघ तंबूत परतला आहे. त्यांना 100 सुद्धा धावा करता आल्या नाहीत.

केकेआरला पराभवाचा सामना : या सामन्यात एमआयने 20 षटकात 7 विकेट गमावत 171 धावा केल्या. 172 धावांचे लक्ष्य रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 16.2 षटकांत पार केले. आरसीबीने आयपीएल सिजनची सुरुवात विजयाने केली, तर पहिल्याच सामन्यात केकेआरला पराभवाचा सामना करावा लागला. 1 एप्रिल रोजी, केकेआरचा मोहली येथे डकवर्थ-लुईस पद्धतीच्या आधारे पंजाब किंग्जने 7 धावांनी पराभव केला. पंजाबकडून भानुका राजपक्षेने 50 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. कर्णधार शिखर धवननेही 40 धावा केल्या.

विराट कोहली फॉर्ममध्ये : गेल्या पाच आमने-सामने झालेल्या सामन्यांमध्ये आरसीबीने केकेआरवर वर्चस्व राखले आहे. आरसीबीने तीन सामने जिंकले आहेत. केकेआरने दोन सामने जिंकले आहेत. आयपीएल 2023 मध्ये केकेआर आणि आरसीबी यांच्यातील हा पहिला सामना असेल. आरसीबीचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. कोहलीने मुंबईविरुद्ध 82 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. कर्णधार फाफ डु प्लेसिसही रंगात आहे. पहिल्या सामन्यात फॅफने 73 धावांची मोठी खेळी केली. राणाला सामना जिंकायचा असेल, तर त्याला फाफ आणि विराटची लवकर निपटारा करायला आवडेल.

आरसीबीची प्लेईंग 11 - विराट कोहली, फाफ डु प्लेसिस (कर्णधार), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मायकल ब्रेसवेल, शाहबाज अहमद, डेविड विली, कर्ण शर्मा, हर्षल पटेल, आकाश दीप, मोहम्मद सिराज

हेही वाचा : IPL 2023 : रोमांचक मॅच नंतर पंजाब किंग्जचा राजस्थान रॉयल्सवर ५ धावांनी विजय

Last Updated : Apr 6, 2023, 11:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.