ETV Bharat / sports

IPL 2023 : राजस्थान रॉयल्सचा गुजरातवर ३ विकेट्स राखून विजय

author img

By

Published : Apr 16, 2023, 8:25 PM IST

Updated : Apr 17, 2023, 12:24 AM IST

गुजीआयपीएलच्या 16व्या हंगामातील 23वा सामना आज म्हणजेच रविवारी गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना झाला. गुजरातने या मैदानावर दोन सामने खेळले आहेत, त्यापैकी एक सामना जिंकला आहे आणि एक सामना गमावला आहे. आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सवर ३ गडी राखून विजय मिळवला.

GUJARAT TITANS VS RAJASTHAN ROYALS
गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स

अहमदाबाद : राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या. या सामन्यात राजस्थानने 4 चेंडू बाकी असताना गुजरातचा 3 गडी राखून पराभव केला. राजस्थानचा या स्पर्धेतील हा चौथा विजय आहे. आता राजस्थानचा संघ पॉइंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. राजस्थानच्या विजयाचा हिरो ठरलेल्या शिमरन हेटमायरला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्याचबरोबर गुजरात टायटन्सने आतापर्यंत 3 सामने जिंकले आहेत, त्यामुळे गुणतालिकेत गुजरात तिसऱ्या स्थानावर आहे.

राजस्थान ने असा जिंकला मॅच : मागील सामन्यात पंजाब किंग्जवर रोमहर्षक विजय नोंदवल्यानंतर गुजरात टायटन्सने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सचा सामना केला. आतापर्यंत, हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सने संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील रॉयल्सविरुद्धचे तिन्ही सामने जिंकले आहेत. गुजरात टायटन्सने 20 षटकांत 7 गडी गमावून 177 धावा केल्या. आणि राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 178 धावांचे लक्ष्य देण्यात आले. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सने 19.2 षटकांत 7 गडी गमावून 179 धावा केल्या. त्यामुळे राजस्थान रॉयल्सने ३ विकेट्सने विजय मिळवला.

संजू सॅमसनची तुफानी खेळी : कर्णधार संजू सॅमसनने 32 चेंडूत 60 धावांची तुफानी खेळी केली. शिमरान हेटमायरने 26 चेंडूत 56 धावांची नाबाद खेळी खेळली. राजस्थान रॉयल्सकडून गोलंदाजी करताना संदीप शर्माने 2, ट्रेंट बोल्टने 1, झाम्पाने 1, युझवेंद्र चहलने 1 बळी घेतला. गुजरात टायटन्सकडून फलंदाजी करताना शुभमन गिलने 34 चेंडूत 45 धावा, डेव्हिड मिलरने 30 चेंडूत 46 धावा, हार्दिक पांड्याने 19 चेंडूत 28 धावा, अभिनव मनोहरने 13 चेंडूत 27 धावा, साई सुदर्शनने 13 चेंडूत 20 धावा केल्या. . गुजरातच्या गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमीने 3, राशिद खानने 2, हार्दिक पांड्याने 1, नूर अहमदने 1 बळी घेतला.प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने 20 षटकात 7 गडी गमावून 177 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सने 19.2 षटकांत 4 चेंडू राखून 7 गडी गमावून 179 धावा करत सामना जिंकला.

11व्या षटकात चौथा धक्का : 11व्या षटकात गुजरात टायटन्सचा प्रमुख रशीद खानने रायन पॅरागनला 11व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर 5 धावांवर बाद केल्याने राजस्थान रॉयल्सला 11व्या षटकात चौथा धक्का बसला. राजस्थान रॉयल्स 11 षटकांनंतर धावसंख्या (62/4) इतकी होती. 10 षटकांनंतर राजस्थान रॉयल्सची धावसंख्या (53/3) या सामन्यात राजस्थान रॉयल्स गुजरात टायटन्सपेक्षा खूप मागे पडला. गुजरात टायटन्सचे गोलंदाज राजस्थानच्या फलंदाजांना धावा करण्याची संधी देत ​​नाहीत. 10 षटकांच्या शेवटी, संजू सॅमसन (20) आणि रायन पराग (4) धावा करून क्रीजवर उपस्थित होते. राजस्थान रॉयल्सला आता विजयासाठी 60 चेंडूत 125 धावांची गरज होती.

9व्या षटकात तिसरा धक्का : राजस्थान रॉयल्सला 9व्या षटकात तिसरा धक्का बसला गुजरात टायटन्सचा स्टार फिरकीपटू रशीद खानने 9व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर 26 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर देवदत्त पडिकलला बाद केले. राजस्थान रॉयल्स 9 षटकांनंतर धावसंख्या (50/3) राजस्थान रॉयल्सचा स्कोअर 5 षटकांनंतर (20/2) 178 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात खराब झाली. त्याने आपल्या दोन्ही सलामीच्या फलंदाजांच्या विकेट लवकर गमावल्या.

डेव्हिड मिलरच्या 30 चेंडूत 46 धावा : राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने गुजरात टायटन्स विरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. गुजरातकडून सलामीला आलेला वृद्धिमान साहा या सामन्यात अपयशी ठरला. तो 3 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने केवळ 4 धावा करू शकला. त्याला ट्रेंट बोल्टने स्वत:च्या गोलंदाजीत झेल घेऊन बाद केले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या साई सुदर्शनने 19 चेंडूत 20 धावांचे योगदान दिले. त्याला जोस बटलरने रन आउट केले. हार्दिक पंड्याला 28 च्या स्कोरवर चहलने जयस्वालच्या हाती झेलबाद केले. गुजरातकडून डेव्हिड मिलरने 30 चेंडूत सर्वाधिक 46 धावांचे योगदान दिले.

गुजरात टायटन्सची प्लेइंग 11 : वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (कर्णधार), अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी, मोहित शर्मा.पर्यायी खेळाडू : जोशुआ लिटल, जयंत यादव, नूर अहमद, श्रीकर भारत, दासून शनाका

राजस्थान रॉयल्सची प्लेइंग 11 : जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, अ‍ॅडम झम्पा, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल. पर्यायी खेळाडू : देवदत्त पडिक्कल, मुरुगन अश्विन, डोनाव्हॉन फरेरा, नवदीप सैनी, जो रूट

हे ही वाचा : Jasprit Bumrah Health Update : जसप्रीत बुमराहचे एकदिवसीय विश्वचषकापूर्वी पुनरागमन, बीसीसीआयने दिले अपडेट

Last Updated : Apr 17, 2023, 12:24 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.