ETV Bharat / sports

IPL 2022 DC vs PBKS : पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज लढत, दोघांसाठीही करो या मरोची स्थिती

author img

By

Published : May 16, 2022, 4:30 PM IST

आयपीएल 2022 ( IPL 2022 ) मधील 64 वा सामना सोमवारी पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. हा सामना डॉ. डी. व्हाय पाटील स्पोर्ट्स अकादमी, मुंबई येथे संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल.

DC vs PBKS
DC vs PBKS

मुंबईः इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामातील 64 वा सामना पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ( Punjab Kings vs Delhi Capitals ) संघात खेळला जाणार आहे. या सामन्याला सोमवारी (16 मे) डी. व्हाय पाटील स्टेडियमवर संध्याकाळी साडेसातला सुरुवात होणार आहे. हा सामना दोन्ही संघाच्या प्लेऑफच्या दृष्टीने महत्वाचे आहे. त्यामुळे आजचा सामना रोमांचक होणार यामध्ये काही शंका नाही.

पंजाबचा संघ ( Punjab Kings Team ) 12 गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर असून त्यांचा निव्वळ त्यांचा नेट रन रेट दिल्ली पेक्षा कमी आहे. त्यांचा नेट रन रेट 0.023 आहे. दिल्लीच्या संघाचे देखील 12 गुण आहेत, परंतु त्यांचा नेट रन रेट 0.210 चांगला असल्याने पाचव्या स्थानी आहे. ज्यामुळे दोन किंवा अधिक संघांचे समान गुण असल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. मागील सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध आठ गडी राखून विजय मिळवल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघ अधिक आत्मविश्वासाने सामन्यात प्रवेश करेल. तर पंजाब किंग्जनेही शेवटच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला आहे.

आयपीएल स्पर्धेच्या आतापर्यंतच्या इतिहासात या दोन संघात 29 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये पंजाबचा धबधबा पाहायला मिळाला आहे. पंजाबने यापैकी 15 सामन्यात विजय मिळवला आहे. त्याचबरोबर 14 सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने ( Delhi Capitals Team ) विजय मिळवले आहेत.

दिल्ली कॅपिटल्स: ऋषभ पंत (कर्णधार), अश्विन हेब्बर, डेव्हिड वॉर्नर, मनदीप सिंग, पृथ्वी शॉ, रोवमन पॉवेल, एनरिक नोर्किया, चेतन साकारिया, खलील अहमद, कुलदीप यादव, लुंगी एनगिडी, मुस्तफिझूर रहमान, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कमलेश नागरटी , ललित यादव, मिचेल मार्श, प्रवीण दुबे, रिपल पटेल, सरफराज खान, विकी ओस्तवाल, यश धुल, केएस भरत आणि टिम सेफर्ट.

पंजाब किंग्स: शिखर धवन, मयंक अग्रवाल (कर्णधार), अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, जॉनी बेअरस्टो, राहुल चहर, हरप्रीत ब्रार, शाहरुख खान, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, इशान पोरेल, लियाम लिव्हिंगस्टोन, ओडियन स्मिथ, संदीप शर्मा, राज अंगद बावा, ऋषी धवन, प्रेरक मंकड, वैभव अरोरा, हृतिक चॅटर्जी, बलतेज धांडा, अंश पटेल, नॅथन एलिस, अथर्व तायडे, भानुका राजपक्षे आणि बेनी हॉवेल.

हेही वाचा - Lucknow super giants vs Rajasthan : राजस्थान रॉयल्सने लखनऊ सुपर जायंट्सचा 24 धावांनी केला पराभव, बोल्ट 'मॅन ऑफ द मॅच'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.