ETV Bharat / sports

IPL 2022 Mega Auction: शिखर धवन 2 कोटी, श्रीशांत 50 लाख तर लिलावात कोणत्या खेळाडूची आधारभूत किंमत किती? घ्या जाणून

author img

By

Published : Jan 23, 2022, 9:47 AM IST

आयपीएल 2022 (Indian Premier League 2022) च्या मेगा ऑक्शनची तयारी सुरु झाली आहे. ऑक्शनसाठी जवळपास 50 प्लेयर्सनी आपली बेस प्राइस 2 कोटी निश्चित केली आहे, तर काहींनी आपली बेस प्राइस 1 कोटी आणि 1.5कोटी निश्चित केली आहे.

IPL 2022 Mega Auction
IPL 2022 Mega Auction

नवी दिल्ली : आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनची तयारी सुरु झाली (Preparations for mega auction have begun) आहे. त्यासाठी खेळाडूंनी आपली नावे सुद्धा दिली आहेत. यामध्ये जवळपास 50 खेळाडूंनी आपली बेस प्राइस 2 कोटी निश्चित केली आहे. त्याचबरोबर काही खेळाडूंनी आपली बेस प्राइस दीड कोटी निश्चित केली आहे.

रिपोर्टच्या माहितीनुसार यंदा होणाऱ्या आयपीएल स्पर्धेसाठी तब्बल 1200 खेळाडूंनी आपली नावे नोंदवली (1200 players registered for the IPL) आहेत. ज्यामध्ये देशी, विदेशी, कैप्ड आणि अन-कैप्ड खेळाडूंचा समावेश आहे. परंतु ऑक्शन मध्ये जवळपास 250 खेळाडूंचा समावेश होईल (The auction will feature 250 players), बीसीसीआयची आयपीएल संघांसोबत बैठक होईल, ज्यामध्ये ऑक्शनसाठी खेळाडूंची यादी आणि मेगा ऑक्शनची तारीख निश्चित केली जाईल.

क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, अमित मिश्रा आणि ईशांत शर्मा सारख्या खेळाडूंची बेस प्राइस (Players base price) दीड कोटी आहे. तसेच पीयूष चावला, केदार जाधव आणि टी नटराजन सारख्या खेळाडूंची बेस प्राइस एक कोटी आहे. एस. श्रीसंतने सुध्दा आयपीएल ऑक्शनमध्ये आपले नाव नोंदवले आहे आणि त्याची बेस प्राइस 50 लाख रुपये आहे.

1 कोटी बेस प्राइस असलेले खेळाडू : पीयूष चावला, केदार जाधव, प्रसिद्ध कृष्णा, टी. नटराजन, मनीष पांडे, अजिंक्य रहाणे, नीतीश राणा, ऋद्धिमान साहा, कुलदीप यादव, जयंत यादव, मोहम्मद नबी, जेम्स फॉल्कनर, मार्नस लैबुशेन, रिले मेरेइडिथ, जोश फिलिप्स, एंड्रू टाइ, डेन लॉरेंस, लियाम लिविंगस्टोन, टाइमल माइल्स, ओलि पॉप, डेविन कॉन्वे, कॉलिन डे ग्रैंडहोम, मिचेल सैंटनर, एडन मार्करम, तबरीज शम्सी, वानिंदु हसारंगा आणि रस्सी डुसेन.

1.5 कोटी बेस प्राइस असलेले खेळाडू : अमित मिश्रा, ईशांत शर्मा, वाशिंगटन सुंदर, एरोन इंच, क्रिस लिन, नाथन लॉयन, केन रिचर्डसन, जॉनी बेयरस्टॉ, एलेक्स हेल्स, इयॉन मोर्गन, डेविड मलान, एडम मिल्ने, कॉलिन मुनरो, जिमी नीशाम, ग्लेन फिलिप्स, टिम साउदी, कॉलिन इंग्राम, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर आणि निकोलस पूरन.

2 कोटी बेस प्राइस असलेले खेळाडू : रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, दीपक चाहर, शिखर धवन, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ईशान किशन, भुवनेश्वर कुमार, देवदत्त पडिक्कल, क्रुणाल पंड्या, हर्षल पटेल, सुरेश रैना, अंबति रायडू, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकुर, रॉबिन उथप्पा, उमेश यादव, मुजीब जादरान, एस्टन एगर, नाथन कुल्टर नाइल, पैट कमिंस, जोश हेज़लवुड, मिचेल मार्श, स्टीव स्मिथ, मैथ्यू वेड, डेविड वॉर्नर, एडम जैम्पा, शाकिब अल हसन, मुस्तफिजुर रहमान, सैम बिलिंग्स, साकिब महमूद, क्रिस जॉर्डन, क्रेग ओवर्टन, आदिर राशिद, जेसन रॉय, लॉकी फर्ग्युसन, क्विंटन डी कॉक, मर्चेंट डे लैंगे, फाफ डु प्लेसिस, कगिसो रबाडा, इमरान ताहिर, फैबिएन एलेन, ड्वेन ब्रावो आणि इविन लुइस.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.