ETV Bharat / sports

IPL 2022 LSG v RCB : लखनौच्या सुपर जायंट्सला आज बंगळुरूचे रॉयल चॅलेंज

author img

By

Published : Apr 19, 2022, 4:28 PM IST

डीवाय पाटील स्टेडियमवर मंगळवारी लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे ( LSG vs RCB ) संघ आमनेसामने येतील. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल. लखनऊचा कर्णधार केएल राहुल सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे, तर दिनेश कार्तिक ( Dinesh Karthik ) आरसीबीकडून नव्या भूमिकेत दिसत आहे.

LSG v RCB
LSG v RCB

नवी मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या ( Indian Premier League ) पंधराव्या हंगामातील 31 वा सामना लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ( LSG vs RCB ) संघात होणार आहे. हा सामना नवी मुंबईतील डीवीय पाटील स्टेडियमवर मंगळवारी (19 एप्रिल) संध्याकाळी साडेसातला सुरु होणार आहे. तत्पुर्वी दोन्ही संघात सातला नाणेफेक पार पडेल. दोन्ही संघांनी आपल्या मागील सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच दोन्ही संघ सुपर फॉर्ममध्ये आहे. दोन्ही संघ आयपीएलच्या इतिहासात प्रथमच एकमेकांच्या सामने येत आहेत.

लखनौ सुपरजायंट्स संघाने ( Lucknow Super Giants ) आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत, त्यापैकी चार सामने जिंकले आहेत. या संघाला दोन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला, ज्यामुळे हा संघ आठ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ( Royal Challengers Bangalore ) संघाने देखील सहा सामने खेळलेत, ज्यापैकी चार सामन्यात विजय तर दोन सामन्यात पराभव पत्करला आहे. त्यामुळे या संघाचे आठ गुण आहेच आणि हा संघ चौथ्या क्रमांकावर आहे.

या मोसमात यष्टीरक्षक फलंदाज कार्तिकचा ( Wicketkeeper-batsman Dinesh Karthik ) नवा फॉर्म पाहायला मिळत आहे. भारतीय संघात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या कार्तिकने दमदार प्रदर्शन करताना धावा केल्या असून, या जोरावर आरसीबी ( लीग टेबलमध्ये पहिल्या चारमध्ये आहे. शाहबाज अहमदनेही आपल्या फलंदाजीने प्रभावित केले आहे. गोलंदाजीत, जोश हेझलवूडने दिल्लीविरुद्ध शानदार स्पेल करत सामन्याचा मार्ग बदलला आणि ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज हा फॉर्म कायम ठेवू इच्छितो. सर्वांचे लक्ष श्रीलंकेचा लेग-स्पिनर वानिंदू हसरंगावर असेल, तर डेथ ओव्हर स्पेशालिस्ट हर्षल पटेललाही आपल्या कामगिरीची छाप पाडायला आवडेल.

दुसरीकडे, लखनौचा कर्णधार राहुलने ( KL Rahul ) 235 धावा केल्या असून तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने मुंबईविरुद्ध शतक ठोकले आणि सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलर (375) च्या मागे आहे. डी कॉक देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहे, तर युवा खेळाडू आयुष बदोनी, दीपक हुडा आणि कृणाल पंड्या मोठी खेळी खेळू शकतात. जेसन होल्डर आणि मार्कस स्टॉइनिस यांनी संघाला बळ दिले आहे. सर्वांच्या नजरा वेगवान गोलंदाज आवेश खान आणि फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई यांच्यावर असतील.

लखनौ सुपर जायंट्स : लोकेश राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, मनीष पांडे, दीपक हुडा, कृणाल पांड्या, एविन लुईस, मार्कस स्टॉइनिस, जेसन होल्डर, अँड्र्यू टाय, काइल मायर्स, आवेश खान, दुष्मंता चमीरा, रवी बिश्नोई, आयुष बडोनी, मनन वोहरा, कृष्णप्पा गौतम, शाहबाज नदीम, अंकित राजपूत, मयंक यादव, मोहसीन खान आणि करण शर्मा.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, फाफ डू प्लेसिस, हर्षल पटेल, वानिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक, जोश हेझलवूड, शाहबाज अहमद, अनुज रावत, आकाश दीप, महिपाल लोमरोर, फिन ऍलन, शेरफेन रदरफोर्ड, जॅफेन बेंगलोर, जे. सुयश प्रभुदेसाई, छमा मिलिंद, अनिश्वर गौतम, कर्ण शर्मा, डेव्हिड विली, रजत पाटीदार आणि सिद्धार्थ कौल.

हेही वाचा - Rr Vs Kkr : चहलची हॅटट्रिक! राजस्थान रॉयल्सकडून कोलकाताचा ७ धावांनी पराभव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.