ETV Bharat / sports

IPL 2022 GT vs LSG : गुजरात टायटन्सचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय; 'अशी' आहे दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

author img

By

Published : May 10, 2022, 7:16 PM IST

GT vs LSG
GT vs LSG

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 57 वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स ( GT vs LSG ) संघात खेळला जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी साडेसातला सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी गुजरात टायटन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय ( Gujarat Titans opt to bat ) घेतला आहे.

पुणे: गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स ( Gujarat Titans vs Lucknow Super Giants ) संघात आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 57 वा सामना खेळला जाणार आहे. हा सामना मंगळवारी (10 मे) पुण्यातील एमसीए क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी साडेसातला सुरु होणार आहे. तत्पुर्वी दोन्ही संघाचे कर्णधार हार्दिक पांड्या आणि केएल राहुल ( Hardik Pandya and KL Rahul ) यांच्यात नाणेफेक पार पडली आहे. गुजरात टायटन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय ( Gujarat Titans opt to bat ) घेतला आहे.

गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपरजायंट्स संघातील हा दुसरा सामना ( GT vs LSG Second Match ) आहे. या अगोदर झालेल्या पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने पाच विकेट्सने लखनौ सुपरजायंट्स संघावर मात केली होती. त्यामुळे आज होणार सामना रोमांचक होणार यात काही शंका नाही. दोन्ही संघ आयपीएल 2022 च्या गुणतालिकेत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी विराजमान आहेत.

लखनौ सुपरजायंट्स संघाने ( Lucknow Super Giants Team ) आतापर्यंत आयपीएलच्या पंधराव्या हंगामात अकरा सामने खेळले आहेत. त्यापैकी आठ सामन्यात विजय तर तीन सामन्यात पराभव स्वीकारला आहे. त्यामुळे हा संघ 16 गुणांसह आयपीएल 2022 च्या गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. त्याचबरोबर गुजरात टायटन्स संघ ( Gujarat Titans Team ) देखील तितक्याच सामन्यात तेवढेच विजय आणि पराभव स्विकारुन गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. कारण गुजरात संघाचे नेट रनरेट लखनौ संघापेक्षा कमी आहे.

लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), केएल राहुल (कर्णधार), दीपक हुडा, कृणाल पंड्या, आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस, जेसन होल्डर, करण शर्मा, दुष्मंथा चमीरा, आवेश खान आणि मोहसिन खान.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल, मॅथ्यू वेड, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, अल्झारी जोसेफ, यश दयाल आणि मोहम्मद शमी.

हेही वाचा - Ipl 2022 Mi Vs Kkr : केकेआरविरुद्ध सामना गमावल्यानंतर, जसप्रीत बुमराहने दिली ही प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.