ETV Bharat / sports

BCCI Updates : बीसीसीआयच्या बैठकीत पाच महत्वाचे निर्णय; आयपीएलच्या प्लेऑफ सामन्याबरोबर 'हे' घेतले निर्णय

author img

By

Published : Apr 24, 2022, 4:52 PM IST

आयपीएल 2022 ( IPL 2022 ) च्या प्लेऑफ सामन्यात 100% प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याला दुजोरा दिला आहे. त्याचबरोबर इतर ही चार महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

BCCI
BCCI

मुंबई :आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला ( IPL 15th season ) 26 मार्च पासून सुरुवात झाली आहे. आतापर्यंत पंधराव्या हंगामात 36 सामने पार पडले आहेत. हे सर्व सामने महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबई शहरात पार पडले आहेत. त्याचबरोबर उर्वरित लीग सामने सुद्धा या दोन शहरात होणार आहेत. स्पर्धेला जेव्हा सुरुवात झाली, तेव्हाच लीग सामने कुठे होतील याबद्दल सांगण्यात आले होते. परंतु प्लेऑफचे सामने कुठे होतील याबाबत बीसीसीआयने सांगितले नव्हते. पंरतु आता याबद्दल देखील माहिती समोर आली आहे.

आयपीएल 2022 ( IPL 2022 ) च्या प्लेऑफ सामन्यात आता 100% प्रेक्षकांच्या उपस्थितीला स्टेडियममध्ये जाण्याची परवानगी ( 100% audience attendance allowed ) देण्यात आली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याला दुजोरा दिला आहे. याशिवाय आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे की, 24 ते 28 मे दरम्यान महिला चॅलेंजर्सचे सामने खेळले जाणार आहेत.

प्लेऑफचे सामने ( IPL 2022 playoff matches ) कोलकाता आणि अहमदाबादमध्ये येथे खेळवले जातील. इंडियन प्रीमियर लीग (IPL) चा समावेश असलेल्या एका मोठ्या घडामोडीत, प्ले-ऑफ आणि एलिमिनेटर सामने 24 आणि 26 मे रोजी कोलकात्यात खेळवले जातील, तर दुसरा प्ले-ऑफ आणि अंतिम सामना 27 मे रोजी खेळला जाईल. तसेच अंतिम सामना 29 मे रोजी अहमदाबादमध्ये खेळवला जाईल. या सामन्यांमध्ये स्टेडियममध्ये प्रेक्षकांची पूर्ण उपस्थिती असेल.

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली ( BCCI President Sourav Ganguly ) म्हणाले, पुरुषांच्या आयपीएल बाद फेरीतील सामने कोलकाता आणि अहमदाबाद येथे आयोजित केले जातील. यामध्ये, 22 मे रोजी लीग टप्पा संपल्यानंतर खेळल्या जाणार्‍या सामन्यांसाठी प्रेक्षकांच्या शतप्रतिशत उपस्थितीची परवानगी असेल.

24 ते 28 मे दरम्यान महिला चॅलेंजर्स : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी शनिवारी बोर्डाच्या सर्वोच्च परिषदेच्या बैठकीनंतर पुष्टी केली की, 24 ते 28 मे दरम्यान लखनौमध्ये तीन संघांची महिला चॅलेंजर स्पर्धा ( Women's Challenger Competition ) होणार आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष गांगुली यांनी पत्रकारांना सांगितले की, लखनौच्या एकना स्टेडियमवर 24 ते 28 मे दरम्यान महिला चॅलेंजर मालिका होणार आहे.

भारत-दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेची घोषणा : यासह, BCCI ने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणार्‍या पाच सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेच्या तारखा आणि ठिकाण देखील ( India-South Africa T20 Series ) जाहीर केले. हे सामने 9, 12, 14, 17 आणि 19 जून रोजी होणार आहेत. त्याचे होस्टिंग दिल्ली, कटक, विझाग (विशाखापट्टणम), राजकोट आणि बंगळुरूला देण्यात आले आहे.

हेही वाचा - IPL 2022 MI vs LSG : मुंबईच्या पलटन समोर आज लखनौच्या नवाबांचे आव्हान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.