ETV Bharat / sports

IPL suspended : आयपीएलमध्ये कोणत्या संघातील किती खेळाडूंना झाला कोरोना, जाणून घ्या

author img

By

Published : May 4, 2021, 7:36 PM IST

दिल्ली कॅपिटल्सचा अमित मिश्रा आणि सनरायजर्स हैदराबादचा रिद्धिमान साहा यांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत आयपीएलच्या दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि कोलकाता संघ कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. खेळाडू, प्रशिक्षक, स्टाफ अशा एकूण १२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

ipl 2021 : corona virus positive players full list
IPL suspended : आयपीएलमध्ये कोणत्या संघातील किती खेळाडूंना झाला कोरोना, जाणून घ्या

मुंबई - देशातील कोरोनाचा वाढता संसर्ग आणि आयपीएलमध्ये खेळाडूंसह सपोर्ट स्टाफमधील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने, बीसीसीआयने आयपीएलचे उर्वरित सामने स्थगित करण्याचा मोठा निर्णय घेतला. आज आयपीएलमध्ये खेळणाऱ्या आणखी दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा अमित मिश्रा आणि सनरायजर्स हैदराबादचा रिद्धिमान साहा यांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि हैदराबाद संघ कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. आयपीएलमध्ये आतापर्यंत खेळाडू, प्रशिक्षक, स्टाफ अशा एकूण १२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा अमित मिश्रा आणि सनरायजर्स हैदराबादचा रिद्धिमान साहा यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यात दोघेही पॉझिटिव्ह आढळले आहेत. यासह आयपीएलमधील कोरोनाबाधित खेळाडूंची संख्या ४ वर पोहोचली आहे. याआधी कोलकाताचे खेळाडू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांना कोरोनाची लागण झाली आहे.

आयपीएलमध्ये कोरोनाग्रस्ताचा आकडा पोहोचला १२ वर -

अमित मिश्रा, रिद्धिमान साहा, वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर या चार खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाचे सीईओ काशी विश्वनाथन, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि एका बस क्लीनरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तसेच दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमच्या ग्राऊंड स्टाफमधील पाच कर्मचाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अशाप्रकारे आतापर्यंत आयपीएलशी संबधित १२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

हेही वाचा - IPL तात्काळ का स्थगित करण्यात आलं?, गव्हर्निंग काउंसिलचे स्पष्टीकरण

हेही वाचा - IPL पुन्हा कधी सुरू होणार?, बीसीसीआयने दिली 'ही' माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.