ETV Bharat / sports

KXIP vs RR : राजस्थानचा पंजाबवर हल्लाबोल...सात गडी राखून विजयी पताका!

author img

By

Published : Oct 30, 2020, 6:32 PM IST

Updated : Oct 31, 2020, 5:40 AM IST

आज शेख झायेद स्टेडियमवर किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स दरम्यान सामना रंगला. दोन्ही संघांसाठी हा सामना करो या मरो अशा अवस्थेतील होता. नाणेफेक गमावलेल्या पंजाबने प्रथम फलंदाजी करताना राजस्थानला १८६ धावांचे आव्हान दिले. त्याचा पाठलाग करत राजस्थानने सात गडी राखून विजय मिळवला. या विजयासह ते गुणतक्त्यात ५व्या स्थानावर आले आहेत.

ipl 2020 kxip vs rr match live
KXIP vs RR LIVE

अबुधाबी - आज शेख झायेद स्टेडियमवर किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स दरम्यान सामना रंगला. दोन्ही संघांसाठी हा सामना करो या मरो अशा अवस्थेतील होता. नाणेफेक गमावलेल्या पंजाबने प्रथम फलंदाजी करताना राजस्थानला १८६ धावांचे आव्हान दिले. त्याचा पाठलाग करत राजस्थानने सात गडी राखून विजय मिळवला. या विजयासह ते गुणतक्त्यात ५व्या स्थानावर आले आहेत.

'युनिव्हर्स बॉस'च्या तडाखेबंद ९९ धावांच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने राजस्थान रॉयल्ससमोर २० षटकात ४ बाद १८५ धावा केल्या. २०व्या षटकात राजस्थानचा तेजतर्रार गोलंदाज जोफ्रा आर्चरने गेलच्या शतकी स्वप्नांना सुरूंग लावत पंजाबच्या चाहत्यांना धक्का दिला. गेलने ६३ चेंडू खेळताना ८ षटकार आणि ६ चौकार ठोकत राजस्थानच्या गोलंदाजांना नामोहरम केले.

नाणेफेक जिंकून राजस्थानने पंजाबला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. सलामीवीर मनदीप सिंह शून्यावर माघारी परतला. जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर बेन स्टोक्सने मनदीपचा अप्रतिम झेल टिपला. त्यानंतर पंजाबचा कर्णधार केएल राहुल आणि ख्रिस गेल यांनी पंजाबच्या डावाला आकार दिला. राहुलने संयमी तर गेलने नैसर्गिक पवित्रा धारण करत १२० धावांची भागिदारी रचली. स्टोक्सच्या गोलंदाजीवर राहुल ४६ धावा करत तंबूत परतला. त्यानंतर गेल आणि पूरन या विंडीजच्या फलंदाजांनी पंजाबची धावसंख्या वाढवली. दोन जीवदानांचा फायदा उचलत गेलने आपली खेळी सजवली. निकोलस पूरनने १० चेंडूत ३ षटकारांसह २२ धावा चोपल्या. तर, मॅक्सवेल आणि दीहक हुडा नाबाद राहिले. राजस्थानकडून आर्चर आणि स्टोक्स यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

राजस्थानच्या आजच्या विजयाने पंजाब आणि त्यांचे गुण समान म्हणजे १४ गुण झाले. पण नेटरनरेटच्या जोरावर पंजाब चौथ्या स्थानावर आहे. आयपीएल २०२० मध्ये साखळी फेरीतील ५० सामने झाल्यानंतर देखील अद्याप फक्त एकच संघ प्ले-ऑफमध्ये गेला आहे. मुंबई इंडियन्स १६ गुणांसह पहिल्या स्थानावर आहेत. तर रॉयल चॅलेंजर्स १४ गुण आणि + ०.०४८ रनरेटसह दुसऱ्या तर दिल्ली कॅपिटल्स १४ गुण आणि +०.०३० रनरेटसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

LIVE UPDATE :

  • राजस्थानची विजयाच्या दिशेने वाटचाल...
  • संजू सॅमसन ४८ धावांवर
  • राजस्थानला ४२ चेंडूत ५३ धावांची गरज.
  • १२ षटकानंतर राजस्थानच्या २ बाद ११९ धावा.
  • स्टिव्ह स्मिथ मैदानात.
  • उथप्पा ३० धावांवर बाद, अश्विनला मिळाला बळी.
  • सॅमसन २८ तर उथप्पा २३ धावांवर नाबाद.
  • ९ षटकात राजस्थानच्या १ बाद ९३ धावा.
  • संजू सॅमसन मैदानात.
  • स्टोक्स ५० धावांवर बाद, जॉर्डनला मिळाला बळी.
  • स्टोक्सचे २४ चेंडूत अर्धशतक, खेळीत ६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश.
  • राजस्थानला ९० चेंडूत १३२ धावांची गरज.
  • पाच षटकात राजस्थानच्या बिनबाद ५४ धावा.
  • चार षटकात राजस्थानच्या बिनबाद ४८ धावा.
  • राजस्थानची आक्रमक सुरुवात.
  • पहिल्या षटकात राजस्थानच्या बिनबाद ५ धावा.
  • अर्शदीपकडून पंजाबसाठी सलामीचे षटक.
  • राजस्थानचे सलामीवीर मैदानात.
  • २० षटकात पंजाबच्या ४ बाद १८५ धावा.
  • गेल ९९वर बाद.
  • पूरन २२ धावांवर बाद.
  • १५ षटकात पंजाबच्या २ बाद १२३ धावा.
  • निकोलस पूरन मैदानात.
  • गेल आणि राहुलमध्ये १२० धावांची भागिदारी.
  • राहुल ४६ धावांवर बाद, खेळीत ३ चौकार.
  • स्टोक्सने तोडली गेल-राहुलची भागिदारी.
  • ख्रिस गेलचे दमदार अर्धशतक, खेळीत ४ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश.
  • दहा षटकानंतर पंजाबच्या १ बाद ४१ धावा.
  • आठ षटकानंतर गेल ४१ तर, राहुल २५ धावांवर नाबाद.
  • पाच षटकानंतर पंजाबच्या १ बाद ३९ धावा.
  • गेलची आक्रमक सुरुवात.
  • ख्रिस गेल मैदानात.
  • पहिल्या षटकात पंजाबच्या १ बाद १ धावा.
  • मनदीप सिंह शून्यावर बाद.
  • जोफ्रा आर्चर टाकतोय सलामीचे षटक.
  • पंजाबचे सलामीवीर मैदानात.
  • नाणेफेक जिंकून राजस्थानचा गोलंदाजीचा निर्णय.
  • थोड्याच वेळात होणार नाणेफेक.

राजस्थान रॉयल्स संघ -

स्टिव्ह स्मिथ (कर्णधार), बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, राहुल तेवतिया, रियान पराग, संजू सॅमसन, श्रेयस गोपाल, रॉबिन उथप्पा, कार्तिक त्यागी, वरुण आरोन.

किंग्ज इलेव्हन पंजाब संघ -

के. एल. राहुल (कर्णधार), मनदीप सिंह, दीपक हुडा, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस जॉर्डन, मोहम्मद शमी, निकोलस पूरन, ख्रिस गेल, मुरुगन अश्विन.

Last Updated : Oct 31, 2020, 5:40 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.