ETV Bharat / sports

IPL Auction 2022 : पहिल्या दिवशी 162 खेळाडूंसाठी लागणार बोली, मुंबईकर श्रेयससाठी १२.२५ कोटींचा लिलाव

author img

By

Published : Feb 12, 2022, 12:13 PM IST

Updated : Feb 12, 2022, 1:07 PM IST

आयपीएलच्या मेगा लिलावाची प्रक्रिया आज बंगळुरुत पार पडत ( Indian Premier League Mega Auction ) आहे. यंदा आयपीएलमध्ये आठ ऐवजी दहा संघ असून एकूण 590 खेळाडूंवर बोली लागणार आहे.

Ipl Auction 2022
Ipl Auction 2022

बंगळुरु : आयपीएलच्या मेगा लिलावाची प्रक्रिया आज बंगळुरुत पार पडत ( Indian Premier League Mega Auction ) आहे. यंदा आयपीएल मध्ये आठ ऐवजी दहा संघ असून एकूण 590 खेळाडूंवर बोली लागणार आहे. त्यामध्ये 370 भारतीय आणि 220 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.

12 आणि 13 फेब्रुवारी असे दोन दिवस आहे मेगा लिलाव पार पडणार आहे. आज पहिल्या दिवशी 162 खेळाडूंवर बोली लागेल. तसेच, आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन नवीन संघ दाखल झाले आहेत. त्यामुळे स्टार्स खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेण्यासाठी 10 संघामध्ये चांगलीच चढाओढ पाहायला मिळू शकते.

या खेळाडूंचा झाला लिलाव

शिखर धवनसाठी पंजाब आणि दिल्लीत तगडी फाईट, पंजाबनं 8.25 कोटीची बोली लावून धवनला आपल्या ताफ्यात घेतलं.

अश्विनला संघात घेण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्सने रस दाखवला. राजस्थानने ५ कोटींमध्ये अश्विनला आपल्या संघात घेतले आहे.

गुजरात टायटन्सने कमिन्ससाठी वेगवान गोलंदाज बोली लावली. केकेआरने ७.२५ कोटींमध्ये कमिन्सला संघात घेतले.

मुंबईकर श्रेयस अय्यरसाठी बंगळुरूने बोली लावली. नंतर दिल्ली कॅपिटल्सनेही रस दाखवला. शेवटी केकेआरने १२.२५ कोटींमध्ये अय्यरला घेतले.

Last Updated : Feb 12, 2022, 1:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.