ETV Bharat / sports

IND vs NZ Second Test : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय; भारताची सावध सुरूवात

author img

By

Published : Dec 3, 2021, 12:47 PM IST

Updated : Dec 3, 2021, 2:02 PM IST

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ( Wankhede Stadium Mumbai ) शुक्रवारी न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटी ( India Vs New Zealand Second Test Match) सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा ( India Won the Toss and Elected to Bat ) निर्णय घेतला.

IND vs NZ Second Test
IND vs NZ Second Test

मुंबई - मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ( Wankhede Stadium Mumbai ) शुक्रवारी न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटी ( India Vs New Zealand Second Test Match) सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा ( India Won the Toss and Elected to Bat ) निर्णय घेतला. सलामीवीर फलंदाज शुबमन गिल 44 धावा काढून झेलबाद झाला. सध्या मयंक अग्रवाल आणि चेतेश्वर पूजारा खेळपट्टीवर खेळत आहेत.

भारतीय संघात फेरबदल -

दुसऱ्या कसोटीत विराट कोहली ( Captain Virat Kohli ) प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन करेल आणि यजमानांचे नेतृत्व करेल. कर्णधाराने फलंदाज अजिंक्य रहाणेची जागा घेतली आहे. तर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने इशांत शर्माच्या जागी संघात स्थान मिळवले आहे. पहिल्या कसोटीत दुखापतीमुळे इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जडेजा यांना संघात स्थान देण्यात आले आहे. इशांत शर्मा, रवींद्र जडेजा आणि अजिंक्य रहाणे यांना दुसऱ्या कसोटीतून वगळण्यात आले आहे. या तिघांनाही दुखापतीच्या समस्या असल्याची माहिती मिळाली आहे. इशांत शर्माच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. पहिल्या कसोटीत जडेजाच्या उजव्या हाताला दुखापत झाली होती आणि स्कॅनमध्ये सूज असल्याचे दिसून आले. त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. कानपूरमध्ये शेवटच्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना रहाणेला हाताला किरकोळ दुखापत झाली. तो अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

भारत – मयंक अग्रवाल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कप्तान), श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, उमेश यादव, मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड – विल यंग, ​​टॉम लॅथम (कप्तान), डॅरिल मिशेल, रॉस टेलर, हेन्री निकोल्स, टॉम ब्लंडल (विकेटकीपर), रचिन रवींद्र, काइल जेमीसन, टिम साऊदी, विल सोमरविले, एजाज पटेल.

Last Updated : Dec 3, 2021, 2:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.