india Vs New Zealand 3rd ODI : इंदूरचे नितीन होणार तिसऱ्या वनडे मॅचचे पंच; वडिलांनी दिला महत्त्वाचा सल्ला

india Vs New Zealand 3rd ODI : इंदूरचे नितीन होणार तिसऱ्या वनडे मॅचचे पंच; वडिलांनी दिला महत्त्वाचा सल्ला
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील शेवटचा एकदिवसीय सामना उद्या इंदूर, मध्य प्रदेश येथे खेळवला जाणार आहे. होळकर स्टेडियमवर होणार्या या सामन्यात इंदूरच्या सुपुत्राला पंच होण्याची संधी मिळाली आहे.
इंदूर : भारतीय क्रिकेट संघ मध्य प्रदेशातील इंदूरला पोहोचला आहे. मंगळवारी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर भारत तीन वनडे मालिकेतील तिसरा सामना खेळणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध दोन एकदिवसीय सामने जिंकून भारत मालिकेत आघाडीवर आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडला 2-0 ने पराभूत केल्यानंतर टीम इंडियाची नजर आता क्लीन स्वीपकडे आहे. शेवटच्या वन-डेनंतर दोन्ही संघ तीन टी-२० सामने खेळणार आहे. 27 जानेवारीला रांचीमध्ये पहिला टी-20 सामना होणार आहे.
नितीन मेनन होणार पंच : बीसीसीआयने इंदूरच्या नितीन मेनन यांची मंगळवारी इंदूर येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय सामन्यासाठी मैदानी पंच म्हणून नियुक्ती केली. 40 वर्षांनंतर प्रथमच इंदूरी अंपायर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात मैदानावर निर्णय देणार आहे. इंदूरमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना 1 डिसेंबर 1983 रोजी नेहरू स्टेडियमवर झाला.
नितीन यांचे वडीलसुद्धा राहिले आहेत पंच : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) एलिट पॅनलमध्ये समाविष्ट असलेले देशातील एकमेव पंच नितीन मेनन यांनी याआधी शहरात झालेल्या तीन आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तिसरे पंच म्हणून काम पाहिले आहे. यामध्ये न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्धचे कसोटी सामने तसेच श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सामन्यांचा समावेश आहे. त्याचे वडील नरेंद्र मेनन हेदेखील इंदूरमधील दोन आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तिसरे पंच राहिले आहेत. इंदूरचा सुधीर अस्नानी एकदिवसीय सामन्यात टीव्ही अंपायर होता. या सामन्यात वीरेंद्र सेहवागने द्विशतक झळकावले.
वडिलांनी दिला हा सल्ला नितीनचे वडील नरेंद्र मेनन यांनी म्हटले आहे की, 'अंपायरिंग करताना चुका होतात. कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नसते किंवा तो जाणूनबुजून चुका करीत नाही. ज्युनियर मॅच असो की रणजी ट्रॉफी, अंपायरिंग म्हणजे अंपायरिंग. नितीनला मी नेहमीच एक सल्ला दिला आहे की, जर तुम्हाला चांगले अंपायरिंग करायचे असेल तर मग तो कोणताही गोलंदाज असो, कोणताही फलंदाज असो, तुमचा चेहरा पाहून अंपायरिंग केले तर तुम्ही चांगले अंपायर बनू शकणार नाही.
