ETV Bharat / sports

टीम इंडियाला पराभवासोबत जबर धक्का!

author img

By

Published : Dec 9, 2020, 3:42 PM IST

षटकांची गती कायम न राखल्याप्रकरणी सामनाधिकारी डेव्हिड बून यांनी भारतीय संघाच्या मानधनातून २० टक्के रक्कम कापून घेतली आहे. त्यामुळे विराटसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. भारतीय संघाने आयसीसीच्या नियम क्रमांक २.२२चे उल्लंघन केले आहे.

india fined for minimum over rate in third t20i
टीम इंडियाला पराभवासोबत जबर धक्का!

सिडनी - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यां संघांत झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा १२ धावांनी पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने १८६ धावा केल्या होत्या. भारतीय संघ प्रत्युत्तरात १७४ धावाच बनवू शकला. या सामन्यात भारताला पराभवासोबत आणखी एका संकटाला तोंड द्यावे लागले.

हेही वाचा - मी भारतात परततोय - हार्दिक पांड्या

षटकांची गती कायम न राखल्याप्रकरणी सामनाधिकारी डेव्हिड बून यांनी भारतीय संघाच्या मानधनातून २० टक्के रक्कम कापून घेतली आहे. त्यामुळे विराटसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. भारतीय संघाने आयसीसीच्या नियम क्रमांक २.२२चे उल्लंघन केले आहे. पंच रॉड टकर, जेराड अबूड, तिसरे पंच पॉल विल्सन यांनी भारतीय संघाविरोधात तक्रार केली होती.

तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सरशी -

या सामन्यात प्रथम फलंदाजी करकताना ऑस्ट्रेलियाने भारताला २० षटकांत १८६ धावांचे आव्हान दिले होते. या बदल्यात भारतीय संघाला १७४ धावांपर्यंतच मजल मारता आली. या धावांचा पाठलाग करताना भारताने सात फलंदाज गमावले. भारताकडून कर्णधार कोहलीने ६१ चेंडूत ३ षटकार आणि ४ चौकारांसह ८५ धावांची दमदार खेळी केली. मात्र, ऐन मोक्याच्या क्षणी तो बाद झाला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.