ETV Bharat / sports

IND VS WI : भारतीय गोलंदाजांसमोर विंडीजच्या फलंदाजांनी टाकली नांगी; वेस्ट इंडिजचा पहिला डाव 150 धावात गुंडाळला, भारतीय संघाची दमदार सुरुवात

author img

By

Published : Jul 13, 2023, 9:57 AM IST

भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा संघ 150 धावात गुंडाळल्यानंतर दमदार सुरुवात केली आहे. भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडिज संघाच्या फलंदाजांची पहिल्याच दिवशी 150 धावांच्या मोबदल्यात शिकार केली. त्यानंतर भारतीय फलंदाजांनी मैदानावर तळ ठोकला आहे.

IND VS WI
संपादित छायाचित्र

डोमिनिका : भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना डॉमिनिकातील विंडसर पार्कवर खेळवला जात आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघाची स्थिती मजबूत असून गोलंदाजांच्या दमदार कामगिरीने भारतीय संघाचे पारडे जड असल्याचे दिसत आहे. भारतीय संघाचा सुप्रसिद्ध फिरकीपटू रविचंद्रन अश्विनच्या 5 विकेट्समुळे भारताने वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ अवघ्या 150 धावांत गुंडाळला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने नाबाद 80 धावा केल्या आहेत.

वेस्ट इंडिजचा पहिला डाव 150 धावांवर संपुष्टात : भारत आणि वेस्ट इंडिज संघात खेळवल्या जात असलेल्या दोन कसोटी मालिकेतील पहिल्या डावात वेस्ट इंडिजचा संघ फलंदाजी करत आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजचा पहिला डाव 150 धावांवर संपुष्टात आला आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने टैगेनारिन चंद्रपॉलला (12) बोल्ड करून भारताला पहिले यश मिळवून दिले. पहिला बळी गमावल्यानंतर वेस्ट इंडिज संघाने 50 धावांवर आणखी दोन विकेट गमावल्या. भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडिज संघाला या धक्क्यातून सावरण्याची संधीच दिली नाही. त्यामुळे वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ अवघ्या 150 धावांवर ऑलआऊट झाला. वेस्ट इंडिजच्या पाच फलंदाजांना दुहेरी आकडाही पार करता आला नाही. डावखुरा फलंदाज अ‍ॅलिक अथानाजने सर्वाधिक ४७ धावा केल्यामुळे वेस्ट संघाला लाज राखता आली.

भारतीय गोलंदाजांची चमकदार कामगिरी : भारतीय गोलंदाजांनी पहिल्या डावात वेस्ट इंडिजच्या फलंदाजांवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. भारतीय गोलंदाजांनी आक्रमक गोलंदाजी करत वेस्ट इंडिजच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकून राहण्याची संधी दिली नाही. पुरकीपटू रविचंद्रन अश्विनने भारताकडून सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. या पाच विकेटसह अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या 700 विकेट्सही पूर्ण केल्या. क्रिकेटमध्ये 700 विकेट घेणारा अश्विन हा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला. त्याचवेळी रवींद्र जडेजाने 3, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूरने 1-1 विकेट घेत वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना तंबुचा रस्ता दाखवला.

भारतीय संघाची दमदार सुरुवात : भारतीय संघाने वेस्ट इंडिज संघाविरोधात खेळताना पहिल्याच दिवशी सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली आहे. वेस्ट इंडिजचा पहिला डाव 150 धावात गुंडाळल्यानंतर पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने नाबाद 80 धावा केल्या आहेत. डावखुरा प्रतिभावान फलंदाज यशस्वी जैस्वाल (40) आणि कर्णधार रोहित शर्मा (30), खेळपट्टीवर ठाण मांडून आहेत.

हेही वाचा -

  1. Ajit Agarkar New Chief Selector: अजित आगरकर यांची टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती, बीसीसीआयने केले जाहीर
  2. Team India Sponsor : टीम इंडियाच्या नवीन स्पॉन्सरची घोषणा, आता जर्सीवर दिसणार 'या' कंपनीचा लोगो
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.