ETV Bharat / sports

लाजिरवाणं! 147 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 'असं' पहिल्यांदाच घडलं

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 4, 2024, 11:40 AM IST

IND vs SA Test match
IND vs SA Test match

IND vs SA 2nd Test : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या नावावर एक अत्यंत लाजिरवाणा विक्रम झालाय. संघाच्या नावावर हा विक्रम नोंदवण्यात सहा फलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावलीय.

केपटाऊन IND vs SA 2nd Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना बुधवारपासून केपटाऊनमध्ये खेळवला जात आहे. या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघाच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम झालाय. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात अवघ्या 55 धावांत गडगडला. यानंतर भारताचाही पहिला डाव 153 धावांत संपुष्टात आला.

शेवटचे 6 बळी 11 चेंडूत : भारतीय संघानं शेवटचे 6 गडी केवळ 11 चेंडूत गमावले. यासह भारताचे 6 फलंदाज शून्यावर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले. पहिल्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेनं 62 धावांत 3 विकेट गमावल्या आहेत. सध्या भारत दक्षिण आफ्रिकेपेक्षा 36 धावांनी मागं आहे.

  • Jaiswal 0
    Shreyas 0
    Jadeja 0
    Bumrah 0
    Siraj 0
    Prasidh 0
    Mukesh 0*

    In History of 147yrs and 2522 Tests

    Today is 1st ever time, 7 Players With 0 runs in a Test Inning#INDvsSA

    — 𝑺𝒉𝒆𝒃𝒂𝒔 (@Shebas_10dulkar) January 3, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भारताच्या नावावर लाजिरवाणा विक्रम : या सामन्यात भारतीय संघाच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेलाय. 147 वर्षांच्या आणि 2522 कसोटी सामन्यांच्या इतिहासात अशी पहिलीच वेळ आहे की, एका संघाचे 6 फलंदाज शून्यावर बाद झाले तर एक फलंदाज शून्यावर नाबाद राहून पॅव्हेलियनमध्ये परतला. भारताकडून यशस्वी जैस्वाल (0), श्रेयस अय्यर (0), रवींद्र जडेजा (0), जसप्रीत बुमराह (0), मोहम्मद सिराज (0), प्रसिध कृष्ण (0) आणि मुकेश कुमार (0) पॅव्हेलियनमध्ये परतले. यासोबतच भारतीय कसोटी संघाच्या इतिहासात प्रथमच संघाचे 7 फलंदाज शून्यावर डगआऊटमध्ये परतले आहेत.

  • कसोटी क्रिकेटमध्ये संघाचे 6 फलंदाज 0 धावांवर बाद होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

भारतीय संघाची अवस्था 153/4 वरुन 153/10 : के एल राहुल (8) आणि विराट कोहली (46) 33 व्या षटकात भारताकडून खेळत असताना एकही धाव न जोडता 6 गडी गमावले. त्यावेळी संघाची धावसंख्या 4 बाद 153 धावा होती. यानंतर लुंगी एनगिडी यानं एकही धाव भारतीय फलंदाजांना काढू दिली नाही. तीन फलंदाजांना बाद केलं. पुढच्याच षटकात कागिसो रबाडानं मेडन ओव्हर टाकून तीन फलंदाज बाद केले. भारतीय संघ 153 च्या पुढं एकही धाव जोडू शकली नाही. एकही धाव न जोडता 6 विकेट गमावल्या.

हेही वाचा :

  1. आफ्रिकेचा कर्णधार एल्गार शेवटच्या सामन्यात बाद होताच कोहलीनं केली अशी कृती, पाहून म्हणाल व्वा!
  2. भारत विरुद्ध द. आफ्रिका, एका दिवसात 23 विकेट पडल्या, भारत अजूनही आघाडीवर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.