ETV Bharat / sports

IND vs SA 2nd T20 :  दक्षिण आफ्रिकेचा सलग दुसऱ्या सामन्यात भारतावर विजय ; मालिकेवर पाहुण्या संघाचे 2-0 ने वर्चस्व

author img

By

Published : Jun 12, 2022, 10:59 PM IST

Henrik Klaassen
Henrik Klaassen

बाराबत्ती स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतावर 4 विकेट्सने विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 6 गड्यांच्या मोबदल्यात 148 धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिका संघापुढे 149 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे आव्हान दक्षिण आफ्रिकेने 18.2 षटकांत 6 गडी गमावून पूर्ण केले.

कटक: भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील आज दुसरा सामना ( IND vs SA 2nd T20 ) खेळला गेला. बाराबत्ती स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतावर 4 विकेट्सने विजय ( South Africa won by 4 wickets ) मिळवला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 6 गड्यांच्या मोबदल्यात 148 धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिका संघापुढे 149 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे आव्हान दक्षिण आफ्रिकेने 18.2 षटकांत 6 गडी गमावून पूर्ण केले. त्यामुळे पाहुण्या संघाने मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली.

149 धावांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन उतरलेल्या दक्षिण आफ्रिका संघाकडून फलंदाज हेनरिक क्लासेनने ( Batsman Henrik Klaassen ) सर्वाधिक धावा केल्या. त्याने 46 चेंडून दमदार 81 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 5 षटकार खेचले. त्याचबरोबर कर्णधार टेम्बा बावुमाने 35 (30) धावांचे योगदान दिले. तसेच मागील सामन्यातील हिरो डेव्हिड मिलरने 20 धावांचे योगदान दिले. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना भुवनेश्वर कुमारने ( Bowler Bhuvneshwar Kumar ) सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. त्याने 13 धावा देताना 4गडी बाद केले. तसेच युझवेंद्र चहल आणि हर्षल पटेलने प्रत्येकी एक विकेट घेतली.

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम खेळणाऱ्या भारतीय संघाने ऋतुराज गायकवाडची ( Batsman Rituraj Gaikwad ) विकेट गमावली. तो 1 धावा करून बाद झाला. येथून इशान किशन आणि श्रेयस अय्यरने मिळून दुसऱ्या विकेट्ससाठी 48 धावा जोडल्या. दरम्यान, इशान किशन 21 चेंडूत 34 धावा करून बाद झाला. ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्याची बॅटही चालली नाही. दोघांनी अनुक्रमे 5 आणि 9 धावा केल्या.

श्रेयस अय्यरने चांगली फलंदाजी केली ( Shreyas Iyer batted well ), मात्र तो 35 चेंडूत 40 धावा करून बाद झाला. दिनेश कार्तिक आणि हर्षल पटेल यांनी शेवटच्या काही षटकांमध्ये चांगली फलंदाजी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवले. त्यामुळे भारताची धावसंख्या 6 बाद 148 झाली. कार्तिकने 21 चेंडूत नाबाद 30 धावा केल्या. हर्षल पटेलने 9 चेंडूत नाबाद 12 धावा केल्या. दक्षिण आफ्रिका संघाकडून गोलंदाजी करताना नॉर्टजेने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. त्याचबरोबर पारनेल, रबाडा, प्रिटोरिस आणि महाराज यांनी प्रत्येकी 1 विकेट्स घेतली.

हेही वाचा - IPL Media Rights E-Auction : प्रति सामन्याचा आकडा पोहचला 100 कोटी रुपयाच्या पार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.