ETV Bharat / sports

Ind Vs Pak Asia Cup २०२३ : राहुल की इशान, कोणाला मिळणार संधी; जाणून घ्या आकडे काय सांगतात

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 10, 2023, 9:21 AM IST

Ind Vs Pak
Ind Vs Pak

Ind Vs Pak : भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या आजचा सामन्यात भारतासमोर प्लेइंग ११ निवडण्याचं मोठं आव्हान असेल. विकेटकीपर इशान किशन आणि केएल राहुल या दोघांपैकी एकाचा संघात समावेश करण्यासाठी संघ व्यवस्थापनाला कठोर निर्णय घ्यावा लागेल.

कोलंबो Ind Vs Pak : आशिया चषक २०२३ मध्ये आज (१० सप्टेंबर) भारत आणि पाकिस्तान यांच्यात मुकाबला रंगणार आहे. कोलंबोमध्ये दुपारी ३ वाजता हा सामना खेळला जाईल. मात्र या सामन्यापूर्वी, विकेटकीपर केएल राहुल आणि इशान किशन यांच्यातील निवडीची कोंडी सोडवणं भारतीय संघ व्यवस्थापनासाठी महत्त्वाचं ठरणार आहे.

इशानची दावेदारी मजबूत : राहुलच्या संघातील पुनरागमनामुळे संघ व्यवस्थापनाला अनेक पर्याय मिळाले आहेत. मात्र त्यामुळे वेगळीच डोकेदुखी वाढली आहे. युवा इशान किशननं गेल्या एक महिन्यातील आपल्या कामगिरीनं सर्वांनाच प्रभावित केलंय. त्यानं चार सामन्यांमध्ये चार अर्धशतकं झळकावत संघातील आपली दावेदारी मजबूत केली आहे. या दरम्यान किशननं डावाची सुरुवात करण्यापासून ते पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे.

  • #TeamIndia's🇮🇳 schedule in 'Super 4' - #AsiaCup2023

    🏏 India vs Pakistan 🗓️ September 10
    🏏 India vs Sri Lanka 🗓️ September 12
    🏏 India vs Bangladesh 🗓️ September 15

    𝐋𝐢𝐯𝐞 𝐓𝐡𝐞 𝐆𝐚𝐦𝐞 𝐨𝐧 𝐃𝐃 𝐒𝐩𝐨𝐫𝐭𝐬 𝐇𝐃 📺 (𝐃𝐃 𝐅𝐫𝐞𝐞 𝐃𝐢𝐬𝐡) pic.twitter.com/ORvlVQ1oDe

    — Doordarshan Sports (@ddsportschannel) September 6, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

केएल राहुलला दुर्लक्षित करून चालणार नाही : किशन हा डावखुरा फलंदाज आहे. त्याच्यामुळे भारतीय फलंदाजीत वैविध्य येते. त्यामुळे सध्या तरी प्लेइंग ११ मध्ये त्याचा दावा मजबूत आहे. मात्र पाचव्या क्रमांकावर अनुभवी केएल राहुलला दुर्लक्षित करून चालणार नाही. जरी त्यानं मांडीच्या दुखापतीमुळं मार्चपासून एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही, तरी त्यानं पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना अनेक मॅचविनिंग खेळी खेळल्या आहेत.

राहुलची कामगिरी : २०१९ पासून राहुल भारताच्या सर्वात भरवशाच्या फलंदाजांपैकी एक आहे. २०१९ मध्ये त्यानं १३ सामन्यात ४७.६७ च्या सरासरीनं ५७२ धावा केल्या. २०२० मध्ये त्यानं ९ सामन्यात ५५.३८ च्या सरासरीनं ४४३ धावा केल्या. तर २०२१ मध्ये त्यानं तीन सामन्यात ८८.५० च्या सरासरीनं १०८ धावा केल्या. २०२२ मध्ये त्याच्या बॅटमधून १० सामन्यात २७.८९ च्या सरासरीनं २५१ धावा निघाल्या. आणि २०२३ मध्ये त्यानं सहा सामन्यात ५६.५० च्या सरासरीनं २२६ धावा केल्या आहेत.

राहुलच्या पुनरागमनाचे संकेत : या आकडेवारीवर बारकाईनं नजर टाकल्यास संघातील राहुलचं योगदान लक्षात येतं. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना राहुलनं १८ सामन्यांत ५३ च्या सरासरीनं ७४२ धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि सात अर्धशतकांचाही समावेश आहे. हे आकडे खूप चांगले आहेत. तसेच राहुल विकेटकिपिंगही करत असल्यानं तो एक प्लस पॉइंट आहे. शुक्रवारी तो यष्टीरक्षणाचा कठोर सराव करताना दिसला. यावरून त्याच्या पुनरागमनाचे संकेत मिळत आहेत.

पाकिस्तानशी दुसऱ्यांदा भिडणार : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ रविवारी आशिया कपमध्ये दुसऱ्यांदा पाकिस्तानशी भिडणार आहे. पहिला सामना पावसामुळे धुतल्या गेला होता. आजच्या सामन्यातही पावसाची शक्यता असल्यानं, सोमवारचा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. मात्र यावरून नवा वाद सुरू झाला आहे. केवळ भारत-पाकिस्तान सामन्यासाठीच राखीव दिवसाचं प्रयोजन आहे, अन्य सामन्यांसाठी नाही. यावरून हा वाद निर्माण झालाय.

पाकिस्ताननं प्लेइंग ११ जाहीर केली : रविवारी भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या महामुकाबल्यासाठी पाकिस्ताननं एक दिवस अगोदरच प्लेइंग ११ जाहीर केली.

पाकिस्तानची प्लेइंग ११ : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), इमाम-उल-हक, फखर जमान, सलमान आगा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फहीम अश्रफ, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ.

भारताची संभाव्य प्लेइंग ११ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन/केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर/अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सी.

हेही वाचा :

  1. Shubhman Gill on Pakistan Pace Attack : पाकिस्तानी गोलंदाजीवर आपण का अडखळतो? शुभमन गिलनं सांगितलं धक्कादायक कारण
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.