ETV Bharat / sports

Ind Vs Pak Asia Cup 2023: आजच्या भारत-पाकिस्तान सामन्यावर भारतीय गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2023, 4:44 PM IST

Ind Vs Pak Asia Cup 2023
भारत-पाकिस्तान सामना

Ind Vs Pak Asia Cup 2023 : आशिया चषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामना आज होत आहे. या संदर्भात ईटीव्ही भारतने भारताचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांच्याशी चर्चा केलीय. याविषयी सविस्तर जाणून घेवू या.

कोलकाता Ind Vs Pak Asia Cup 2023 : आशिया चषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान ब्लॉकबस्टर सामना आज खेळला जात आहे. सामन्यासंदर्भात ईटीव्ही भारतने भारताचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांच्याशी चर्चा केलीय. त्यांनी सध्याच्या वेगवान खेळाडूंना क्रिकेटच्या जगात एक मजबूत युनिट बनण्यासाठी मार्गदर्शन केलेय.

भारतीय गोलंदाजी जागतिक दर्जाच्या संघाप्रमाणेच : यापूर्वी, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यातील लढत ही भारतीय फलंदाज आणि पाकिस्तानी गोलंदाजांभोवती केंद्रित असायची. पण आता तसं नाहीये. भारतीय गोलंदाजी (दोन्ही वेगवान आणि फिरकी विभाग) कोणत्याही जागतिक दर्जाच्या संघाप्रमाणेच उत्तम आहे. केवळ वेगवान गोलंदाजच नाही, तर रवी अश्विन, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल आणि रवींद्र जडेजाही जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत. मी नशीबवान आहे की, या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी मी तिथे उपस्थित होतो, असे भरत अरुण यांनी आज ईटीव्ही भारतला सांगितलं. (Asia Cup 2023)

मोहम्मद शमीचा अनुभव : भारतासाठी ट्रम्प कार्ड कोण असू शकते याबद्दल विचारले असता, अरुण यांनी कोणत्याही एका गोलंदाजावर किंवा फलंदाजावर लक्ष केंद्रित केलं नाही. एवढ्या गोंधळात कोणाचंही नाव घेणं योग्य ठरणार नाही, असं ते म्हणाले. पण मला वाटते जसप्रीत बुमराहचे येणे भारतासाठी चांगली बातमी आहे. त्याहूनही अधिक म्हणजे, आमच्याकडे मोहम्मद शमीचा अनुभव आहे आणि मोहम्मद सिराजही उत्कृष्ट आहे, असं ते म्हणाले.

भारत-पाकिस्तान सामना : सामन्याच्या संभाव्यतेबद्दल बोलताना, अरुण यांनी आज उच्च-ऑक्टेन गेममध्ये भारताला पुढे नेण्यासाठी पुरेसा स्पष्टवक्तेपणा दाखवला. ते म्हणाले की, हा सामना अतिशय रोमांचक सामना असेल. या सामन्याची संपूर्ण देश आतुरतेने वाट पाहत आहे. तथापि, भारत-पाकिस्तान सामन्यांमध्ये दडपण खूप असतं. प्रत्येकाला दबाव जाणवतो. जेव्हा भारत-पाकिस्तान सामना खेळला जातो, तेव्हा संपूर्ण देशात कर्फ्यूसारखी परिस्थिती असते. सामना सुरू असताना तुम्हाला कोणी रस्त्यावर फिरताना सापडेल असं मला वाटत नाही, असं ते म्हणाले. (Ind Vs Pak)

हेही वाचा :

  1. Ind Vs Pak Asia Cup २०२३ : भारत-पाकिस्तान सामना, भारताचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय, पावसामुळे सामना थांबला
  2. Ind Vs Pak Asia Cup : पाकिस्तानचे 'हे' तीन गोलंदाज ठरू शकतात भारतासाठी डोकेदुखी, जाणून घ्या
  3. Ind Vs Pak Asia Cup २०२३ : पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोणाला फायदा? जाणून घ्या...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.