ETV Bharat / sports

भारत-ऑस्ट्रेलिया टी २० सामन्यापूर्वी स्टेडियमची बत्ती गुल, ३ कोटी रुपयांचं वीज बिल थकलं!

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 1, 2023, 5:20 PM IST

Ind Vs Aus T20 Match : आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा टी २० सामना रंगणार आहे. मात्र ज्या स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे, त्या स्टेडियमचं विजेचं बिल अद्यापही थकीत आहे. यामुळे तेथील वीज कनेक्शन कापण्यात आलंय. वाचा पूर्ण बातमी..

Ind Vs Aus T20 Match
Ind Vs Aus T20 Match

रायपूर Ind Vs Aus T20 Match : वर्ल्डकप आटोपल्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ सामन्यांची टी २० मालिका सुरू आहे. मालिकेत भारत २-१ ने आघाडीवर असून, चौथा सामना आज (१ डिसेंबर) रायपुरच्या शहीद वीर नारायण सिंह स्टेडियमवर होईल. सायंकाळी ७ वाजता सामन्याची वेळ आहे. मात्र हा सामना वेळेवर सुरू होणार की नाही याबाबत शंका आहे.

स्टेडियमचं वीज बील थकीत : याला कारण असं की, शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवरील सामन्यापूर्वी वीज विभागानं स्टेडियमचा वीज पुरवठा खंडित केला. वीज बीलचा भरणा न झाल्यानं असं करण्यात आलं आहे. स्टेडियमचं तब्बल ३ कोटी १६ लाख रुपयांचं वीज बील थकीत असल्याचं सांगण्यात येत आहे. बिल तपासलं असता कनेक्शन आज तोडलं नसल्याचं आढळून आलं. प्रत्यक्षात ते पाच वर्षांपूर्वीच कापण्यात आलं होतं.

...अडचणींना सामोरं जावं लागू शकतं : पीडब्ल्यूडी विभागात क्रिकेट बांधकाम समितीच्या नावानं २०१० साली कनेक्शन घेण्यात आले होतं. बिलांची थकबाकी असतानाही वीज विभागानं तात्पुरती जोडणी दिली. यात फक्त पॅव्हेलियन बॉक्स आणि प्रेक्षक गॅलरी समाविष्ट आहे. आज या स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय सामना होणार आहे. यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येनं येतील. त्यासाठी फ्लड लाइट्सही लावण्यात येतील. मात्र यासाठी जबरदस्त पॉवर बॅकअप आवश्यक आहे. अशा परिस्थितीत वीज विभागानं दयामाया न दाखवल्यास अडचणींना सामोरं जावं लागू शकतं.

वीज विभागानं वारंवार नोटीस दिली होती : वीज विभागानं बिलाबाबत मौन बाळगलं होतं असं नाही. उलट वेळोवेळी नोटिसा देऊन माहिती दिली होते. मात्र संबंधित जबाबदार लोकांनी याकडे लक्ष दिलं नाही. त्याचा परिणाम आजच्या सामन्यावर होऊ शकतो. प्रलंबित बिल भरण्यासाठी आम्ही त्यांच्याशी सातत्यानं पत्रव्यवहार केला, मात्र ही रक्कम भरण्यात आली नाही. यानंतर कनेक्शन तोडण्यात आलं, असं असं विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यानं 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं. आता हा सामना जनरेटरच्या भरवशावर खेळवला जाणार आहे.

हेही वाचा :

  1. कांगारुंच्या दिग्गजांची घरवापसी, भारताला मालिका विजयाची संधी, सामना जिंकल्यास भारत रचणार इतिहास
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.