ETV Bharat / sports

'भारतीय संघा'चा 'सुपर' से 'उपर' विजय; बिश्नोईनं तीनच चेंडूत लावला लांबलेल्या सामन्याचा निकाल

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 18, 2024, 6:38 AM IST

IND vs AFG T20I : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा टी 20 सामना अत्यंत नाट्यमय झाला. सामना टाय झाल्यानंतर सुपरओव्हरही टाय झाली. सुपरओव्हरमध्ये अफगाणिस्तान संघाने भारताला विजयासाठी 17 धावांचं आव्हान दिलं होतं. भारतीय संघ 16 धावा करु शकला. त्यामुळं सुपरओव्हरही टाय झाली. शेवटी दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघानं विजय मिळवला.

IND vs AFG T20I
IND vs AFG T20I

बंगळुरु IND vs AFG T20I : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी 20 सामन्याचा निकाल एक नाही तर दोन सुपर ओव्हरमध्ये लागला. निर्धारित 20 षटकांत दोन्ही संघांनी 212 धावा केल्यानंतर सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर पहिला सुपर ओव्हर झाला. पहिल्या सुपर ओव्हरमध्येही दोन्ही संघांनी प्रत्येकी 16 धावा केल्या. पुन्हा एकदा सामना टाय झाला. त्यानंतर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारतानं 10 धावांनी विजय मिळवला. रवी बिश्नोईनं भारतासाठी दुसरे सुपर ओव्हर टाकत अवघ्या तीन चेंडूत भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

कर्णधार रोहितचं दमदार शतक : बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 20 षटकांत 4 गडी गमावून 212 धावांचा डोंगर उभारला. भारतीय कर्णधार रोहित शर्मानं 69 चेंडूत नाबाद 121 धावांची सर्वात मोठी खेळी केली. यात 11 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता. याशिवाय रिंकू सिंगनं 39 चेंडूत 2 चौकार आणि 6 षटकारांसह नाबाद 69 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून वेगवान गोलंदाज फरीद अहमदनं सर्वाधिक तीन बळी घेतले.

अफगाणिस्तानच्याही 212 धावा : त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या अफगाणिस्ताननं 20 षटकांत 6 विकेट गमावत 212 धावा करत सामना बरोबरीत सोडवला. अफगाणिस्तानकडून गुलबदिन नईबनं नाबाद 55 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. यात 4 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. याशिवाय सलामीला आलेल्या रहमानुल्ला गुरबाज आणि इब्राहिम झादरान यांनी 50-50 धावा केल्या. दरम्यान, भारताकडून वॉशिंग्टन सुंदरनं सर्वाधिक 3 बळी घेतले.

पहिला सुपर ओव्हर टाय : सामना बरोबरीत सुटल्यानंतर दोन्ही संघांमध्ये सामन्याचा निर्णय लावण्यासाठी सुपर ओव्हर खेळवण्यात आली. यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्ताननं 1 बाद 16 धावा केल्या. भारतासाठी मुकेश कुमारनं पहिलं सुपर ओव्हर टाकलं. 17 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघानंही 16 धावा केल्या. त्यामुळं पहिला सुपर ओव्हरही बरोबरीत सुटला.

दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारताचा तीन चेंडूत विजय : दुसऱ्या सुपरमध्ये प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघानं 2 बाद 11 धावा फलकावर लावल्या. त्यानंतर क्षणभर भारत हा सामना हरणार असं वाटत होतं, पण रवी बिश्नोईनं तसं होऊ दिलं नाही. लक्ष्याचा पाठलाग करताना बिश्नोईनं अवघ्या 3 चेंडूत 2 गडी बाद करत अफगाणिस्तानला रोखलं. 12 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला केवळ 1 धाव करता आली, अशा रितीनं या नाट्यमय सामन्याचा शेवट झाला.

हेही वाचा :

  1. यशस्वी, अक्षरची टी 20 क्रमवारीत मोठी झेप, हा भारतीय फलंदाज अजूनही अव्वल स्थानी
  2. टी-20 विश्वचषकापुर्वी भारतीय संघाला 'चाचपणी'ची शेवटची संधी; अफगाणिस्तानला व्हाईटवॉश देण्यासाठी 'रोहितसेना' तयार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.