ETV Bharat / sports

IND Vs AUS Final Live : ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वविजेता; भारताचा पराभव

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 19, 2023, 7:01 AM IST

Updated : Nov 19, 2023, 9:22 PM IST

India vs Australia cricket Live updates
India vs Australia cricket Live updates

21:21 November 19

ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वविजेता; भारताचा पराभव

ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वविजेता ठरला आहे. 241 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने सहज हे लक्ष्य गाठलं.

20:41 November 19

हेडचं शानदार शतक; ऑस्ट्रेलिया विजयाच्या उंबरठ्यावर

ऑस्ट्रेलियन फलंदाज हेडनं शानदार शतक झळकवलं. ऑस्ट्रेलिया विजयाच्या उंबरठ्यावर आहे.

20:26 November 19

ऑस्ट्रेलियाच्या दीडशे धावा पूर्ण; हेड-लाबुशेनची दमदार खेळी

ऑस्ट्रेलियाच्या दीडशे धावा पूर्ण झाल्या आहेत. हेड-लाबुशेनची दमदार खेळी केली. या दोघांनी चांगली भागेदारी करत संघाला सांभाळलं.

19:57 November 19

ऑस्ट्रेलियाची शंभरी; ट्रॅविस हेडचं अर्धशतक

ऑस्ट्रेलियाने शंभर धावा पूर्ण केल्या आहेत. संघाच्या पडत्या काळात ट्रॅविस हेडने चांगली खेळी करत अर्धशतक पूर्ण केले आहे.

19:19 November 19

भारतीय गोलंदाजांची धार शानदार; कांगारु अडखळले, सावध फलंदाजी

भारतीय गोलंदाजांची धार दिसून येत आहे. सुरुवातीलाचा ऑस्ट्रेलियाचे तीन विकेट घेतल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी कांगारुंना प्रेशरमध्ये टाकले आहे. त्यामुळं ऑस्ट्रेलियाचे फलंदाज सावध फलंदाजी करत आहेत.

18:59 November 19

ऑस्ट्रेलियाला तिसरा मोठा धक्का; स्टिव्ह स्मिथ चार धावांवर बाद

ऑस्ट्रेलियाला तिसरा सर्वात मोठा धक्का बसला आहे. स्टिव्ह स्मिथ चार धावांवर बाद झाला. बुमराहने ही विकेट घेतली आहे.

18:48 November 19

ऑस्ट्रेलियाची दुसरी विकेट; मिशेल मार्शला बुमराहने केले गेट आऊट

ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का बसला आहे. मिशेल मार्शला जसप्रीत बुमराहने गुमराह केले आहे. मिशेल मार्श 15 बॉलवर 15 धावा करुन बाद झाला.

18:31 November 19

शमीचा नाद करायचा नाय; दुसऱ्याच बॉलवर वॉर्नरची विकेट

ऑस्ट्रेलियाची चांगली सुरुवात झाली होती. पहिल्याच ओव्हरमध्ये तीन चौकार लगावण्यात आले होते. मात्र, नंतर शमीने ओव्हरच्या दुसऱ्याच बॉलवर वॉर्नर आऊट झाला.

18:29 November 19

ऑस्ट्रेलियाची चांगली सुरुवात; पहिल्याच ओव्हरमध्ये तीन चौकार

ऑस्ट्रेलियाची चांगली सुरुवात झाली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये तीन चौकार मारले आहेत.

17:57 November 19

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या सर्वबाद २४० धावा

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताच्या ५० षटकात सर्वबाद २४० धावा झाल्या आहेत. आता ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २४१ धावांचं माफक आव्हान आहे. भारताकडून केएल राहुलनं १०७ चेंडूत सर्वाधिक ६६ धावा केल्या, तर विराट कोहलीनं ६३ चेंडूत ५४ आणि कर्णधार रोहित शर्मानं ३१ चेंडूत ४७ धावांचं योगदान दिलं. ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्कनं ५५ धावा देत ३ बळी घेतले.

17:54 November 19

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या सर्वबाद २४० धावा

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताच्या ५० षटकात सर्वबाद २४० धावा झाल्या आहेत. आता ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २४१ धावांचं माफक आव्हान आहे.

17:40 November 19

भारताला ९ वा धक्का, सूर्यकुमार यादव तंबूत परतला

भारताला नववा धक्का बसला आहे. सूर्यकुमार यादव २८ चेंडूत १८ धावा करून बाद झाला.

17:27 November 19

भारताला आठवा धक्का; बुमराह आऊट

भारताला आठवा धक्का बसला आहे. बुमराह तीन बॉलमध्ये एक धाव करुन आऊट झाला आहे.

17:21 November 19

भारताला सातवा धक्का; शमी सहा धावांवर बाद

भारताला सातवा धक्का बसला आहे. मोहम्मद शमी सहा धावांवर बाद झाला आहे.

17:11 November 19

भारताला सहावा धक्का; केएल राहुल 66 धावांवर बाद

भारताला सहावा धक्का बसला आहे. केएल राहुल 66 धावांवर बाद झाला आहे.

17:06 November 19

भारताच्या 200 धावा पूर्ण; केएल राहुलची उत्तम खेळी

भारताच्या 200 धावा पूर्ण झाल्या आहेत. केएल राहुलची उत्तम खेळी आणि त्याला सुर्याने दिलेली साथ यामुळं भारताने 200 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे.

16:43 November 19

भारताला पाचवा धक्का; जडेजा 9 धावांवर बाद

भारताला पाचवा धक्का बसलाय. रविंद्र जडेजाने 22 बॉलमध्ये 9 धावा करुन बाद झाला.

16:38 November 19

केएल राहुलचं अर्धशतक; रविंद्र जडेजासोबत ख्रिजवर

केएल राहुलनं अर्धशतक पूर्ण केले आहे. त्यानं 86 बॉलमध्ये अर्धशकत पूर्ण केले. संघाची सुरुवातीची बॅटिंग ऑर्डर पडत असताना केएल राहुलने डाव सांभाळला.

16:25 November 19

केएल राहुल-रविंद्र जडेजा ख्रिजवर

विराट कोहली आऊट झाल्यानंतर रविंद्र जडेजावर आता जबाबदारी आहे. केएल राहुल आणि रविंद्र जडेजा आता ख्रिजवर आहेत. भारतानं 150 धावा पूर्ण केल्या आहेत.

16:06 November 19

भारताला चौथा धक्का, विराट कोहली आऊट

भारताला चौथा धक्का बसलाय. विराट कोहली 56 धावा करुन आऊट झालाय. पॅट कमिन्सने विराटला बोल्ड केलंय.

15:54 November 19

विराट कोहलीचं 72 वं ODI अर्धशतक पूर्ण; केएलसोबत डाव सांभाळला

विराट कोहलीने आपले ODI 72 वं अर्धशतक पूर्ण केले आहे. त्यानं 56 बॉलमध्ये 50 धावा पूर्ण केल्या आहेत.

15:48 November 19

पॅलेस्टाईन समर्थक विराटला भेटण्यासाठी भर सामन्यात खेळपट्टीवर गेला

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आयसीसी विश्वचषक 2023 फायनल मॅच दरम्यान अहमदाबादमध्ये सुरक्षेत मोठी चूक झाली आहे. यावेळी एक पॅलेस्टाईन समर्थक प्रेक्षक विराट कोहलीला भेटण्यासाठी मैदानात उतरला होता.

15:20 November 19

भारताच्या शंभर धावा पूर्ण

भारताच्या शंभर धावा पूर्ण झाल्या आहेत. सुरुवातीला चांगली फलंदाजी करत असतानाचा मध्यंतरी भारताला तीन धक्के बसले होते. त्यानंतर विराट आणि केएल राहुलने हा डाव सांभाळलाय.

15:11 November 19

विराट कोहली-केएल राहुल ख्रिसवर

सुरुवातीला फटकेबाजी केल्यानंतर रोहित शर्मा आऊट झाला. त्यानंतर श्रेयसचीही विकेट पडली. आता सध्या विराट कोहली आणि केएल राहुल खेळत आहेत.

14:48 November 19

श्रेयस अय्यर ३ चेंडूत ४ धावा करून परतला. त्याला पॅट कमिन्सनं बाद केलं.

प्रथम फलंदाजी करताना भारताच्या १०.२ षटकात ८१-३ धावा झाल्या आहेत. सध्या विराट कोहली आणि केएल राहुल क्रिजवर आहेत.

14:42 November 19

रोहित शर्मा ३१ चेंडूत ४७ धावा करून परतला. त्याला मॅक्सवेलनं हेडच्या हाती झेलबाद केलं.

प्रथम फलंदाजी करताना भारताच्या ९.४ षटकात ७६-२ धावा झाल्या आहेत. सध्या विराट कोहली आणि श्रेयस अय्यर क्रिजवर आहेत.

14:22 November 19

भारतीय संघाला धक्का , शुभमन गिल ४ धावात तंबुत परत

भारतीय संघाला पहिला धक्का बसला आहे. शुभमन गिल ४ धावात तंबुत परतला आहे. ३० धावावर भारताची पहिली विकेट गेली आहे.

14:18 November 19

रोहित शर्माकडून ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई, ४ षटकात ३० धावा

रोहित शर्माने जोश हेजलवूडच्या षटकात चौकार मारले. दोन षटकं संपल्यानंतर भारताची धावसंख्या १३ धावा राहिली. रोहित शर्मा १३ धावांवर तर शुभमन गिल शून्य धावांवर खेळत आहे. त्यानंतर चार षटकात भारतानं ३० धावा केल्या आहेत.

14:04 November 19

भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक संघानं केला एअर शो

आयसीसी विश्वचषक फायनल सुरू होण्यापूर्वी भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक संघानं नरेंद्र मोदी स्टेडियमवर एअर शो केला.

13:49 November 19

आशा भोसले सामना पाहण्यासाकरिता अहमदाबादमध्ये दाखल, विवेक ओबेरॉयनं ही केली प्रार्थना

भाररत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषक फायनलसाठी गायिका आशा भोसले या अहमदाबादला पोहोचल्या आहेत. अभिनेता विवेक ओबेरॉय हादेखील सामना पाहण्यासाठी अहमदाबादमध्ये पोहोचला. विवेक ओबेरॉयनं म्हटलं की, आम्ही आता तयार आहोत. मी व माझा लकी चार्म विश्वचषक सामना पाहणार आहोत. भारत जिंकणार आहे. रोहितनं शतक करावे अशी प्रार्थना आहे.

13:46 November 19

मोहम्मद सिराजसह इशान किशनच्या आईला भारतीय क्रिकेट संघ जिंकण्याचा विश्वास

भारतीय क्रिकेटपटू इशान किशनची आई सुचित्रा सिंग बिहारमध्ये माध्यमांशा बोलताना म्हणाल्या, भारतीय संघ विश्वचषक आणेल, अशी छठी मैयाकडं प्रार्थना आहे. भारतीय संघाकडून खूप अपेक्षा आहेत. आज छठ असून त्याच दिवशी सामना आहे. त्यामुळे आज धमाका होणारच आहे. भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद सिराजची आई शबाना बेगम हैदराबादमध्ये माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, टीम इंडियाला शुभेच्छा आहेत.

13:34 November 19

ऑस्ट्रेलियांन नाणेफेक जिंकली, हा घेतला निर्णय

भारत ऑस्ट्रेलिया संघात थोड्याच वेळात सामना सुरू होणार आहे. ऑस्टेलियानं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताला फलंदाजी करावी लागणार आहे. दोन्ही संघाच्या खेळाडूमध्ये कोणताच बदल होणार नाही.

13:18 November 19

भारत ऑस्ट्रेलियात थोड्याच वेळात नाणेफेक, भारत फलंदाजी करणार की गोलंदाजी?

भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पोहोचला आहे. थोड्याच वेळात नाणेफेक होणार आहे. ही नाणेफेक जिंकण्यावरून दोन्ही क्रिकेट संघाची रणनीती ठरणार आहे.

12:30 November 19

भारतानं ऑस्ट्रेलियाला 450 धावांचे लक्ष्य देऊन फायनल सहज जिंकावी-क्रिकेट चाहत्याची अपेक्षा

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये मोठ्या संख्येनं क्रिकेटप्रेमी पोहोचले आहेत. थोड्याच वेळापूर्वी भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमकडे रवाना झाला. टीम इंडियाचे समर्थक आणि सचिन तेंडुलकरचे चाहते सुधीर कुमार चौधरी म्हणाले की, टीम इंडिया 2011 च्या विजयाप्रमाणेच आज पुन्हा विजय मिळवेल. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी शतक पूर्ण करावं. भारतानं ऑस्ट्रेलियाला 450 धावांचे लक्ष्य देऊन फायनल सहज जिंकावी, अशी माझी इच्छा आहे.

10:30 November 19

मोहम्मद शामीच्या गावात ग्रामस्थांकडून भारताच्या विजयासाठी प्रार्थना

भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी हा उत्तर प्रदेशमधील अमरोहा या गावातील रहिवाशी आहे. त्यानं मागील सामन्यात दमदार कामगिरी केली आहे. अमरोहा गावातील मुस्लिम बांधवांनी टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना केली आहे.

10:29 November 19

नरेंद्र मोदी स्टेडियमच्या प्रवेशद्वाराबाहेर क्रिकेटप्रेमींची प्रचंड गर्दी

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या प्रवेशद्वाराबाहेर क्रिकेटप्रेमींची प्रचंड गर्दी जमली आहे. गर्दीला नियंत्रणाकरिता पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

09:22 November 19

पुण्यातील सिद्धिविनायक मंदिरात टीम इंडियाकरिता विशेष आरती

पुण्यातील श्री सिद्धिविनायक मंदिरात भारतीय क्रिकेट संघाच्या विजयासाठी विशेष आरती करण्यात आली आहे.

09:22 November 19

पहाटेपासून नरेंद्र मोदी स्टेडियमबाहेर चाहत्यांची गर्दी

गुजरात: अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमबाहेर चाहत्यांनी पहाटेपासूनच गर्दी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आयसीसी विश्वचषक फायनलमध्ये टीम इंडियानं जिंकण्यासाठी भारतीय क्रिकेटप्रेमींनी जल्लोष केला.

08:16 November 19

आज आपण विश्वचषक उचलू, अशी आशा आहे- सचिन तेंडुलकर

माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हा अहमदाबादला पोहोचला आहे. माध्यमाशी बोलताना सचिननं अंतिम सामन्याबाबत प्रतिक्रिया दिली. सचिन म्हणाला, मी शुभेच्छा देण्यासाठी येथे आलो आहे. आशा आहे की, आम्ही आज विश्वचषक उचलू. प्रत्येकजण या दिवसाची वाट पाहत आहेत.

07:56 November 19

भारत विश्वचषक जिंकेल, याची मला खात्री - अभिनेत्री उर्वशी रौतेला

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आयसीसी विश्वचषक फायनलच्या आधी अभिनेत्री उर्वशी रौतेलानं प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, मी खूप उत्साहित आहे. भारत विश्वचषक जिंकेल, याची मला खात्री आहे.

07:56 November 19

भारताच्या विजयासाठी उज्जैन महाकाल मंदिरात भस्म आरती

स्ट्रेलियाविरुद्धच्या आयसीसी विश्वचषक अंतिम सामन्यात भारताच्या विजयासाठी मध्य प्रदेशमधील उज्जैन महाकाल मंदिरात भस्म आरती करण्यात आली.

07:36 November 19

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भारतीय क्रिकेट संघाला जिंकण्याकरिता दिल्या शुभेच्छा

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भारतीय क्रिकेट संघाला अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले की, प्रिय टीम इंडिया, या विश्वचषक स्पर्धेतील तुमच्या अतुलनीय कामगिरीबद्दल आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल मी प्रथम तुमचे अभिनंदन करते. तुम्ही सातत्याने देशाचा सन्मान केला. जगज्जेते होण्यासाठी जे काही लागते ते तुमच्याकडे आहे. मी तुम्हाला माझ्या शुभेच्छा पाठवते.

07:35 November 19

रोहित शर्मा हा निस्वार्थीपणानं संघासाठी खेळतो- प्रशिक्षक दिनेश लाड

भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन रोहित शर्माचे बालपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड म्हणाले की, विश्वचषक सुरू झाल्यापासून आपण विश्वचषक जिंकणार आहोत, असं मी म्हटलेले आहे. आपले सर्व खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. निश्चितपणे, आपण विश्वचषक जिंकणार आहोत. रोहित शर्मा हा निस्वार्थीपणानं संघासाठी खेळतो. तो पहिल्या दहा षटकांचा सर्वाधिक चांगला उपयोग करण्याचा नेहमी विचार करतो.

07:11 November 19

भारतीय संघातील खेळाडुंची चांगली कामगिरी, हे चांगले चिन्ह- डायना एडुलजी

मुंबई: आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्याबद्दल माजी भारतीय क्रिकेटर डायना एडुलजी यांनी मत व्यक्त केलयं. त्या म्हणाल्या, आमच्यासाठी हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. 2011 नंतर आपण पुन्हा अंतिम सामन्यात प्रवेश मिळविलाय. भारतीय संघातील ११ खेळाडू फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही चांगली कामगिरी करत आहेत. हे खूप चांगले चिन्ह आहे.

06:38 November 19

आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा अंतिम सामन्यात महामुकाबला होणार

अहमदाबाद- जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा अंतिम सामन्यात महामुकाबला होणार आहे. ऑस्ट्रेलियन संघ यापूर्वी पाच वेळा विश्वचषकाचा विजेता ठरला आहे. तर भारताला केवळ दोन वेळा विश्वचषकावर दोन वेळा नाव कोरण्यात यश आलयं. असे असले तरी यंदा विश्वचषकात भारतानं एकही सामना गमावला नाही. तर ऑस्ट्रेलिया दोन सामन्यात पराभूत झाला आहे. घरच्या मैदानावर भारताचं मनोबल आधीच उंचावलयं. जगभरातील क्रिकेटप्रेमींचे आजच्या सामन्याकडं लक्ष लागलेलं आहे.

Last Updated : Nov 19, 2023, 9:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.