ETV Bharat / sports

Glenn Maxwell : दिल्लीत आलं 'मॅक्सवेल' नावाचं तुफान! विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक ठोकलं

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 25, 2023, 7:55 PM IST

Updated : Oct 25, 2023, 8:16 PM IST

Glenn Maxwell : ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलनं नेदरलँडविरुद्ध क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक ठोकलं. मॅक्सवेलनं दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करामचा ४९ चेंडूत केलेला विक्रम मोडला.

Glenn Maxwell
Glenn Maxwell

नवी दिल्ली Glenn Maxwell : ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलनं दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात धुमाकूळ घातला. मॅक्सवेलनं तुफानी फलंदाजी करत विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात जलद शतक ठोकलं. मॅक्सवेलनं अवघ्या ४० चेंडूत १०० धावा पूर्ण केल्या. यासह मॅक्सवेलनं दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करमचा विक्रम मोडीत काढला.

४० चेंडूत शतक झळकावलं : मार्नस लाबुशेन बाद झाल्यानंतर क्रीजवर आलेल्या ग्लेन मॅक्सवेलनं आज आपलं रौद्र रुप दाखवलं. मैदानावर पाऊल ठेवताच त्यानं चौकार आणि षटकारांची आतषबाजी सुरु केली. मॅक्सवेलनं २७ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. मात्र, अर्धशतक झाल्यानंतर तो खरा रंगात आला. त्यानं नेदरलॅंडच्या गोलंदाजांची एकापाठोपाठ एक पिटाई करण्यास सुरुवात केली. पुढच्या ५० धावा त्यानं अवघ्या १३ चेंडूत पूर्ण केल्या. अशाप्रकारने मॅक्सवेलनं ४० चेंडूत शतक झळकावलं.

केवळ चौकार आणि षटकारांच्या मदतीनं ८४ धावा : ग्लेन मॅक्सवेलनं ४४ चेंडूत १०६ धावांची खेळी केली. या दरम्यान त्यानं ९ चौकार आणि ८ गगनचुंबी षटकार ठोकले. म्हणजेच मॅक्सवेलनं केवळ चौकार आणि षटकारांच्या मदतीनं ८४ धावा केल्या. त्याच्या या झंझावाती खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ८ गडी गमावून ३९९ धावांचा डोंगर रचला.

  • - Glenn Maxwell has fastest Hundred in World Cups (40 balls).

    - Glenn Maxwell also has 4th fastest Hundreds (51 balls).

    - The Big show...!!! pic.twitter.com/tFwRpmSm7s

    — CricketMAN2 (@ImTanujSingh) October 25, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

एडन मार्करमचा विक्रम मोडला : ग्लेन मॅक्सवेलनं वर्ल्ड कपमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावण्याच्या बाबतीत दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करमला मागं टाकलं आहे. मार्करमनं या विश्वचषकात श्रीलंकेविरुद्ध खेळताना ४९ चेंडूत शतक झळकावलं होतं. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आयर्लंडच्या केविन ओब्रायनचं नाव आहे. त्यानं ५० चेंडूत ही कामगिरी केली. विशेष म्हणजे, मॅक्सवेलनं या आधी २०१५ च्या विश्वचषक स्पर्धेत ५१ चेंडूत शतक झळकावलं होतं.

  • •Glenn Maxwell scored fastest Hundred in World Cup history - In Delhi.

    •Aiden Markram scored 2nd Fastest Hundred in World Cup history - In Delhi.

    •Highest Total in World Cup history - In Delhi. pic.twitter.com/DVp3HXJ1h6

    — CricketMAN2 (@ImTanujSingh) October 25, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा :

  1. Shubman Gill : शुभमन गिल लवकरच बनेल जगातील नंबर १ फलंदाज, ICC ची ताजी क्रमवारी जाहीर
  2. Bishan Singh Bedi Life : 'या' गोलंदाजाला अवगत होती फिरकीची प्रत्येक कला, खराब पंचगिरीला विरोध करून गमावला सामना!
  3. Cricket World Cup २०२३ : दक्षिण आफ्रिकेचा बांग्लादेशवर दणदणीत विजय, महमुदुल्लाचं शतक व्यर्थ
Last Updated :Oct 25, 2023, 8:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.