ETV Bharat / sports

Shubman Gill : शुभमन गिल लवकरच बनेल जगातील नंबर १ फलंदाज, ICC ची ताजी क्रमवारी जाहीर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 25, 2023, 7:28 PM IST

Shubman Gill : आयसीसीनं बुधवारी जारी केलेल्या ताज्या वनडे क्रमवारीत भारताचा सलामीवीर शुभमन गिल दुसऱ्या स्थानी कायम आहे. तो अव्वल क्रमांकाचा फलंदाज बाबर आझमपेक्षा केवळ ६ रेटिंग गुणांनी मागे आहे.

Shubman Gill
Shubman Gill

हैदराबाद Shubman Gill : जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये 'प्रिन्स' म्हणून ओळखला जाणारा भारताचा स्टार सलामीवीर फलंदाज शुभमन गिल लवकरच एक नवा कीर्तिमान रचू शकतो. या २४ वर्षीय खेळाडूनं फार कमी वेळात अनेक मोठे विक्रम आपल्या नावे केले आहेत. क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये शतक, एकदिवसीय सामन्यात द्विशतक आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २००० धावा हे त्यापैकी काही विक्रम. गिलचं पुढील लक्ष्य आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये जगातील नंबर १ फलंदाज बनण्याचं आहे. बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीत गिल दुसऱ्या क्रमांकावर कायम असून, अव्वल क्रमांकावर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आहे.

अव्वल क्रमांकाच्या फलंदाजापेक्षा ६ गुण मागे : ताज्या एकदिवसीय क्रमवारीनुसार, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम ८२९ रेटिंग गुणांसह जगातील नंबर १ फलंदाज आहे. तर भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिल ८२३ रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. या दोघांमध्ये केवळ ६ रेटिंग गुणांचा फरक असून, हा फरक अत्यंत शुल्लक मानला जातो. या विश्वचषकात ५ सामन्यांमध्ये ३ शतकं झळकावणारा दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉक ७६९ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. आता शुभमन गिलला रॅंकिंगमध्ये अव्वल स्थान पटकवण्यासाठी काही चांगल्या खेळींची गरज आहे.

  • Babar Azam - 829 rating.

    Shubman Gill - 823 rating.

    The difference is just 6 points between No 1 & No 2 ODI batters in ICC ranking...!!!! pic.twitter.com/v5Of84OmCK

    — Johns. (@CricCrazyJohns) October 25, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • - Shubman Gill at No.2
    - Virat Kohli at No.6
    - Rohit Sharma at No.8

    Team India is the only team to have 3 Batters in the Top 10 list in the ICC ODI batting rankings - THE DOMINATION...!!!🇮🇳 pic.twitter.com/UNl71xGFYZ

    — CricketMAN2 (@ImTanujSingh) October 25, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

टॉप १० मध्ये ३ भारतीय : शुभमन गिल व्यतिरिक्त, आणखी दोन भारतीय फलंदाजांचा एकदिवसीय क्रमवारीत टॉप १० मध्ये समावेश आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली सहाव्या तर कर्णधार रोहित शर्मा आठव्या स्थानी आहे. विराट आणि रोहितचे अनुक्रमे ७४७ आणि ७२५ रेटिंग गुण आहेत.

हेही वाचा :

  1. Cricket World Cup २०२३ : दक्षिण आफ्रिकेचा बांग्लादेशवर दणदणीत विजय, महमुदुल्लाचं शतक व्यर्थ
  2. Cricket World Cup २०२३ : शुभमन गिलनं रचला इतिहास, दिग्गज हाशिम आमलाचा 'हा' विक्रम मोडला
  3. Bishan Singh Bedi Life : 'या' गोलंदाजाला अवगत होती फिरकीची प्रत्येक कला, खराब पंचगिरीला विरोध करून गमावला सामना!
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.