ETV Bharat / sports

Cricket World Cup २०२३ : दक्षिण आफ्रिकेचा बांग्लादेशवर दणदणीत विजय, महमुदुल्लाचं शतक व्यर्थ

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 24, 2023, 3:01 PM IST

Updated : Oct 24, 2023, 10:52 PM IST

Cricket World Cup २०२३ : विश्वचषकात आज झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं बांग्लादेशचा १४९ धावांनी दणदणीत पराभव केला. आफ्रिकेनं दिलेल्या ३८३ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांग्लादेशची टीम ४६.४ षटकांत २३३ धावांवर ऑलआऊट झाली. १४० चेंडूत १७४ धावा करणारा डी कॉक सामनावीर ठरला.

Cricket World Cup २०२३
Cricket World Cup २०२३

मुंबई Cricket World Cup २०२३ : क्रिकेट विश्वचषकाच्या २३ व्या सामन्यात आज दक्षिण आफ्रिकेसमोर बांग्लादेशचं आव्हान होतं. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. बांग्लादेशविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेनं ५० षटकांत ३८२-५ धावा केल्या.

क्विंटन डी कॉकची तुफान फटकेबाजी : दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉक आज तुफान फार्मात होता. त्यानं बांग्लादेशची गोलंदाजी फोडून काढली. डी कॉकनं १४० चेंडूत १५ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीनं १७४ धावा ठोकल्या. हे वनडे क्रिकेटमधील त्याचं १९वे शतक आहे. विकेटकीपर हेनरिक क्लासेननं देखील तुफान फटकेबाजी केली. त्यानं फक्त ४९ चेंडूत २ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीनं ९० धावा कुटल्या. कर्णधार एडन मार्करमनं ६९ चेंडूत ६० धावांचं योगदान दिलं. बांग्लादेशकडून हसन महमूदनं ६७ धावा देत २ बळी घेतले.

महमुदुल्लाची एकाकी झुंज : धावांचा पाठलाग करताना बांग्लादेशच्या फलंदाजांना द. आफ्रिकेच्या गोलंदाजांनी स्थिर होऊचं दिलं नाही. नियमित अंतरानं विकेट पडत गेल्यानं बांग्लादेशवर दबाव वाढला. बांग्लादेशकडून महमुदुल्लानं एकाकी किल्ला लढवत शतक साजरं केलं. त्यानं १११ चेंडूत ११ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीनं १११ धावा केल्या. बांग्लादेशचे इतर फलंदाज मात्र २५ धावांचा आकडाही गाठू शकले नाही. ते ४६.४ षटकांत २३३ धावा करून ऑलआऊट झाले. दक्षिण आफ्रिकेकडून जेराल्ड कोएत्झीनं ६२ धावा देत ३ विकेट घेतल्या.

दोन्ही संघाची प्लेइंग ११ :

बांग्लादेश : तन्झिद हसन, लिट्टन दास, नजमुल हुसेन शांतो, शाकीब अल हसन (कर्णधार), मेहंदी हसन मिराज, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्ला, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद

दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्करम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा, लिझाद विल्यम्स

हेही वाचा :

  1. Cricket World Cup २०२३ : अफगाणिस्ताननं केला आणखी एक उलटफेर, पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव
  2. Bishan Singh Bedi Life : 'या' गोलंदाजाला अवगत होती फिरकीची प्रत्येक कला, खराब पंचगिरीला विरोध करून गमावला सामना!
  3. Bishan Singh Bedi Death : भल्याभल्यांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवणाऱ्या बिशन सिंग बेदी यांचं निधन
Last Updated : Oct 24, 2023, 10:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.