ETV Bharat / sports

IND Vs PAK : भारत-पाक सामन्यासाठी चाहत्यांना मिळेना रूम, आता चक्क हॉस्पिटलमध्ये बुकींग सुरु!

author img

By

Published : Jul 22, 2023, 5:45 PM IST

भारत आणि पाकिस्तान यांच्यात 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे सामना होणार आहे. या सामन्याच्या दिवसाच्या आसपास अहमदाबादमधील हॉटेल्सच्या दरांमध्ये लक्षणीयरित्या वाढ झाली आहे. यामुळे आता चाहते हॉस्पिटलमध्ये बेड बुक करत आहेत.

IND Vs PAK
भारत विरुद्ध पाकिस्तान

अहमदाबाद : 15 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात वनडे विश्वचषकाचा सामना होणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या सामन्याची क्रेझ एवढी आहे की, अहमदाबादच्या हॉटेल्समध्ये बुकींगसाठी जागा उरलेली नाही. हॉटेलमध्ये जागा कमी पडत असल्यामुळे चाहते आता चक्क हॉस्पिटलमध्ये बेड बुक करत आहेत.

सामन्याच्या तारखेच्या आसपास बेड बुकिंगमध्ये असामान्य वाढ : विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा झाल्यानंतर सामन्याच्या दिवसाच्या आसपास अहमदाबादमधील हॉटेल्सच्या दरांमध्ये लक्षणीयरित्या वाढ झाली. यामुळे अनेक चाहत्यांना राहण्याची सोय शोधण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. अहमदाबादमधील हॉटेलच्या खोल्या आधीच पूर्ण बुक झालेल्या आहेत. आश्चर्य म्हणजे, यांच्या किमती दीड लाखांपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे आता क्रिकेटवेडे चाहते राहण्यासाठी हॉस्पिटलचे बेड बुक करत आहेत. रुग्णालय प्रशासकांना भारत-पाकिस्तान सामन्याच्या तारखेच्या आसपास बेड बुकिंगमध्ये असामान्य वाढ दिसून आली आहे.

लोक कोणत्याही प्रकारची हॉस्पिटल रूम बुक करण्यास तयार : अहमदाबादमधील हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका डॉक्टरने सांगितले की, लोक शारीरिक तपासणीसह एक रात्र राहण्यासाठी बेड बुक करत आहेत. डॉक्टर म्हणतात की, लोक कोणत्याही प्रकारची हॉस्पिटल रूम किंवा बेड बुक करण्यास तयार आहेत. ते म्हणतात की हॉस्पिटलमध्ये मर्यादित जागा आहेत. यामुळे रुग्णांना डोळ्यासमोर ठेवून बुकिंगचा विचार सुरू आहे. डॉक्टरांनी सांगितले की, 'माझ्या अमेरिकेतील एका मित्राने हॉस्पिटलमध्ये राहण्याची चौकशी केली होती. त्याला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहायचा आहे'.

हॉटेलचे भाडे सामान्य दरापेक्षा सहा ते सात पटीने वाढले : हॉटेलच्या खोल्यांची महागाई केवळ अहमदाबादपुरती मर्यादित नाही. शेजारच्या शहरांमध्येही हॉटेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. अहमदाबादपासून केवळ एक तासाच्या अंतरावर असलेल्या वडोदरामधील हॉटेल बुकिंगचे भाडे सामान्य दरापेक्षा सहा ते सात पटीने वाढले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हॉटेल्समध्ये एका रात्रीच्या मुक्कामासाठी 10 पट जास्त भाडे आकारले जात आहे. हॉटेलमध्ये एका रात्रीच्या मुक्कामासाठी एक लाख रुपयांपर्यंत पैसे घेतले जात आहेत.

  • Fans are booking hospital beds in Ahmedabad as hotel rooms hit record breaking rates for India Vs Pakistan match. (Ahmedabad Mirror). pic.twitter.com/RZnfIZOURz

    — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा :

  1. Virat Kohli : 500 व्या सामन्यात विराटने मोडले अनेक रेकॉर्ड्स, आता शतक झळकावताच मोडेल सचिनचा 'हा' विक्रम
  2. Wimbledon Logo Maharashtra : महाराष्ट्राच्या कलाकारांनी 100,000 चौरस फूट मैदानावर साकारला विम्बल्डनचा 'सर्वात मोठा' लोगो!
  3. Yashasvi Jaiswal : पाणीपुरी विकणाऱ्या पोराने कसोटी पदार्पणातच ठोकले शतक!
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.