ETV Bharat / sports

World Cup 2023 : आयसीसीने जारी केला विश्वचषक 2023 चा लोगो, ही आहे स्पेशल थीम

author img

By

Published : Apr 3, 2023, 6:45 AM IST

आयसीसीने काल एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या अधिकृत लोगोचे अनावरण केले. या लोगोमध्ये नवरसांची थीम वापरली आहे. भारत 2023 च्या विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे.

WORLD CUP 2023 LOGO
विश्वचषक 2023 चा लोगो

नवी दिल्ली : काल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एकदिवसीय विश्वचषक 2023 चा लोगो जारी केला. यामध्ये क्रिकेट विश्वचषक 2023 ला 'नवरस' च्या रुपात दाखवले आहे. या लोगो मार्फत नवरसांची क्रिकेटच्या संदर्भात पुन: कल्पना केली गेली. विश्वचषकातील सामन्यांच्या फुल - ऑन ड्रामॅपासून चाहत्यांच्या उत्साहापर्यंत प्रत्येक भावना व्यक्त करण्यासाठी लोगोमध्ये वेगवेगळे रंग वापरले गेले आहेत. नवरसांमध्ये आनंद, सामर्थ्य, सन्मान, अभिमान, शौर्य, गौरव, आश्चर्य, दुःख आणि उत्कटता या सर्व भावनांचा समावेश होतो, ज्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान दिसतात.

भारत 2023 च्या विश्वचषकाचा यजमान : आजपासून बरोबर 12 वर्षांपूर्वी म्हणजेच 2 एप्रिल 2011 रोजी भारताने श्रीलंकेला हरवून तब्बल 28 वर्षांनी विश्वचषक जिंकला होता. 2011 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा 6 गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले होते. या सामन्यात कर्णधार महेंद्रसिंह धोनीने संस्मरणीय खेळी खेळताना षटकार ठोकून भारताला ऐतिहासिक विजेतेपद मिळवून दिले होते. भारतीय संघाने कर्णधार कपिल देवच्या नेतृत्वात 1983 मध्ये आपला पहिला वर्ल्डकप जिंकला होता. भारत आता यांदा तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. 2023 च्या विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आहे. 5 ऑक्टोबरला स्पर्धेतील पहिला सामना खेळवला जाणार आहे.

'विश्वचषकाची तयारी सुरु' : यावेळी बोलताना भारताचा कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023 साठी 6 महिने बाकी आहेत. मात्र आत्तापासूनच तयारी सुरु झाली आहे. मायदेशात विश्वचषक खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. भारतीय संघाचा कर्णधार म्हणून मी विश्वचषकाबाबत अधिक उत्सुक आहे. विश्वचषक 2023 मध्ये सहभागी झालेल्या सर्व लोकांसाठी ही खूप खास गोष्ट आहे. आम्ही सर्वजण मैदानावर आमचे 100 टक्के देण्यास तयार आहोत.

हे ही वाचा : ODI World Cup 2011 Champion : 12 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी भारतीय संघ ठरला विश्वचषक विजेता, भारत तिसऱ्या विश्वचषक विजेतेपदाच्या शोधात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.