ETV Bharat / sports

19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकाचा आजपासून सुरू होणार 'महाकुंभ'; भारतीय 'यंग ब्रिगेड' मारणार विजेतपदाचा 'षटकार'?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 19, 2024, 10:27 AM IST

Updated : Jan 19, 2024, 10:57 AM IST

ICC Mens U19 Cricket World Cup
ICC Mens U19 Cricket World Cup

ICC Mens U19 World Cup : आजपासून आयसीसीच्या 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. दक्षिण आफ्रिकेत यंदाच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेत 16 संघ आमनेसामने येणार आहेत. या स्पर्धेत भारतीय संघ सर्वाधिक पाच वेळा विश्वविजेता झालाय.

हैदराबाद ICC Mens U19 World Cup : आयसीसीच्या 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक आजपासून सुरु होणार आहे. या विश्वचषकाचा हा 15वा हंगाम आहे. यंदाची स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळवली जाणार आहे. 50 षटकांच्या या स्पर्धेत 16 संघ आमनेसामने असतील. भारत सध्या 19 वर्षाखालील विश्वचषकाचा विजेता आहे. भारतीय संघानं आतापर्यंत 5 वेळा ही स्पर्धा जिंकलीय. त्याखालोखाल ऑस्ट्रेलियानं तीन वेळा चॅम्पियन होण्याचा मान मिळवला आहे, तर पाकिस्तानचा संघ दोन वेळा विजेता ठरलाय. ही विश्वचषक स्पर्धा दर दोन वर्षांनी होते. आयसीसीनं मोठा निर्णय घेत यावेळी श्रीलंकेऐवजी दक्षिण आफ्रिकेत 19 वर्षाखालील विश्वचषक आयोजित करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंका क्रिकेट बोर्डाला निलंबित केल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं हे पाऊल उचललंय.

स्पर्धेत 16 संघांचा समावेश : या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 16 संघांना चार गटात ठेवण्यात आलंय. प्रत्येक गटातील अव्वल तीन संघ 'सुपर सिक्स'मध्ये पोहोचतील. ज्यात 12 संघ दोन पूलमध्ये विभागले जातील. यातील प्रत्येकी दोन अव्वल संघ उपांत्य फेरीत खेळतील. हे सामने 6 आणि 8 फेब्रुवारी रोजी होतील. भारतीय संघाचा अ गटात समावेश करण्यात आला असून, भारतासह बांगलादेश, अमेरिका आणि आयर्लंड हेही संघ या गटात आहेत. ही स्पर्धा 11 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना बेनोनी इथं 11 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

कोणत्या संघाचा कोणत्या गटात समावेश :

  • अ गट: बांगलादेश, भारत, आयर्लंड, अमेरिका
  • ब गट: इंग्लंड, स्कॉटलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज
  • क गट: ऑस्ट्रेलिया, नामिबिया, श्रीलंका, झिम्बाब्वे
  • ड गट: अफगाणिस्तान, नेपाळ, न्यूझीलंड, पाकिस्तान

कोणता संघ किती वेळा विजेता : 19 वर्षाखालील विश्वचषकाची सुरुवात 1988 मध्ये झाली. तेव्हापासून भारतीय संघ सर्वाधिक 5 वेळा विजेता बनलाय. भारतीय संघ 2000 मध्ये पहिल्यांदा विजेता बनला होता आणि त्यानंतर 2008 मध्ये 8 वर्षांनी चॅम्पियन बनला होता. तिसऱ्यांदा, भारतानं 2012 मध्ये 19 वर्षाखालील विश्वचषक जिंकला, त्यानंतर 2018 आणि 2022 मध्येही भारतीय संघ विजेता झाला. भारतानंतर ऑस्ट्रेलियानं सर्वाधिक तीन वेळा हे विजेतेपद पटकावलंय. यंदाचंही विश्वचषक जिंकून भारतीय संघ विश्वविजयाचा षटकार मारण्याचा प्रयत्न करेल.

19 वर्षांखालील विश्वचषकासाठी भारतीय संघ :

  • अर्शीन कुलकर्णी, आदर्श सिंह, रुद्र मयूर पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), अरावेली अवनीश राव (यष्टीरक्षक), सौम्य कुमार पांडे (उपकर्णधार), मुरुगन अभिषेक, इनेश महाजन (यष्टीरक्षक), धनुष गौडा, आराध्या शुक्ला, राज लिंबानी आणि नमन तिवारी

आतापर्यंत झालेल्या 19 वर्षाखालील विश्वचषाकतील विजेते :

  • 1988 - ऑस्ट्रेलिया
  • 1998 - इंग्लंड
  • 2000 - भारत
  • 2002 - ऑस्ट्रेलिया
  • 2004 - पाकिस्तान
  • 2006 - पाकिस्तान
  • 2008 - भारत
  • 2010 - ऑस्ट्रेलिया
  • 2012 - भारत
  • 2014 - दक्षिण आफ्रिका
  • 2016 - वेस्ट इंडिज
  • 2018 - भारत
  • 2020 - बांगलादेश
  • 2022 - भारत

हेही वाचा :

  1. एकच वादा 'रोहित' दादा! विक्रमी शतकी खेळीसह रोहितची एकाच सामन्यात तीनदा फलंदाजी
  2. 'भारतीय संघा'चा 'सुपर' से 'उपर' विजय; बिश्नोईनं तीनच चेंडूत लावला लांबलेल्या सामन्याचा निकाल
Last Updated :Jan 19, 2024, 10:57 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.