ETV Bharat / sports

Sunil Gavaskar Birthday : भारतीय क्रिकेटचे पहिले सुपरस्टार...'लिटिल मास्टर' गावस्कर झाले 74 वर्षांचे!

author img

By

Published : Jul 10, 2023, 5:33 PM IST

भारतीय क्रिकेट संघाचे माजी सलामीवीर आणि एकेकाळचे दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर आज आपला 74 वा वाढदिवस साजरा करत आहेत. आपल्या अनोख्या फलंदाजीच्या शैलीमुळे ते आजही चाहत्यांच्या स्मरणात आहेत.

Sunil Gavaskar
सुनील गावस्कर

मुंबई : भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर आज (10 जुलै) 74 वर्षांचे झाले. क्रिकेट जगतात 'लिटिल मास्टर' म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुनील गावस्कर यांनी अनेक विक्रम रचले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावा आणि 34 शतकांचा आकडा गाठणारे गावस्कर जगातील पहिले फलंदाज होते. 5 फूट 5 इंच उंची असलेल्या सुनील गावस्कर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या आहेत, ज्या आजही चाहत्यांच्या आठवणीत आहेत.

  • 1️⃣9️⃣8️⃣3️⃣ World Cup-winner 🏆
    233 intl. games
    13,214 intl. runs 👌🏻
    First batter to score 1️⃣0️⃣,0️⃣0️⃣0️⃣ runs in Tests 👏🏻👏🏻

    Here's wishing Sunil Gavaskar - former #TeamIndia Captain & batting great - a very Happy Birthday. 👏🏻🎂 pic.twitter.com/WmZSyuu0Lj

    — BCCI (@BCCI) July 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

वेस्ट इंडिज विरुद्ध पदार्पण : सुनील गावस्कर यांनी 1971 साली वेस्ट इंडिज दौऱ्यावर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या त्या पदार्पणाच्या मालिकेत, गावस्करने 4 कसोटी सामन्यांमध्ये विक्रमी 774 धावा (दुहेरी शतक आणि तीन अर्धशतकांसह 4 शतके) केल्या. या दरम्यान गावस्कर यांची सरासरी 154.80 होती. पदार्पणाच्या मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा हा जागतिक विक्रम आहे.

  • Happy 74th birthday Sunil Gavaskar 🎉🎉Seen here in Marathi film 'Savli Premachi' and ‘Malaamaal’. pic.twitter.com/iEiVWrYoLV

    — Subhash Shirdhonkar (@4331Subhash) July 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

1971च्या वेस्ट इंडिज दौऱ्यातील गावस्कर यांची कामगिरी :

  • पोर्ट ऑफ स्पेन कसोटी - पहिला डाव 65 धावा, दुसरा डाव नाबाद 67 धावा
  • जॉर्जटाउन कसोटी – पहिला डाव 116 धावा, दुसरा डाव नाबाद 64 धावा
  • ब्रिजटाउन कसोटी – पहिला डाव 1 धाव, दुसरा डाव 117 धावा
  • पोर्ट ऑफ स्पेन कसोटी – पहिला डाव 124 धावा, दुसरा डाव 220 धावा

'ही' कामगिरी करणारे एकमेव भारतीय : सुनील गावस्कर यांनी तीनवेळा कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतक झळकावण्याची कामगिरी केली आहे. ही कामगिरी करणारे ते एकमेव भारतीय आहेत. 1971 मध्ये पदार्पणाच्या मालिकेत त्यांनी पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध 124 आणि 220 धावांची खेळी केली. यानंतर 1978 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कराची कसोटीत त्यांनी 111 आणि 137 धावांची खेळी खेळली, जी चाहत्यांच्या आजही लक्षात आहे. त्याचवर्षी, त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध कोलकाता कसोटीच्या दोन्ही डावांत शतके झळकावली होती. गावस्कर यांनी कोलकाता कसोटीत 107 आणि 182 धावांची खेळी खेळली होती.

कसोटीत 51.12 ची सरासरी : सुनील गावस्कर यांनी एकूण 125 कसोटी सामने खेळले. आपल्या 16 वर्षांच्या (1971-1987) कसोटी कारकिर्दीत त्यांनी 10,122 धावा केल्या, ज्यात 34 शतके आणि 45 अर्धशतकांचा समावेश आहे. गावस्कर यांची कसोटीतील फलंदाजीची सरासरी 51.12 होती. त्यांचा 34 शतकांचा विक्रम सचिन तेंडुलकरने 2005 मध्ये मोडला. गावस्करने 108 वनडेत 35.13 च्या सरासरीने 3092 धावा केल्या. त्यांनी एकदिवसीय सामन्यात फक्त एकच शतक झळकावले, तेही 107 व्या सामन्यात. सुनील गावस्कर 1983 चा विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे सदस्य होते.

गावस्कर यांचा कर्णधार म्हणून रेकॉर्ड : सुनील गावस्कर यांनी 47 कसोटी आणि 37 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले. गावस्कर यांच्या नेतृत्वाखाली कसोटी क्रिकेटमध्ये भारताने 9 सामने जिंकले आणि 8 गमावले, तर 30 कसोटी सामने अनिर्णित राहिले. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात गावस्कर यांच्या नेतृत्वाखाली भारताने 14 सामने जिंकले, तर संघाला 21 सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आणि दोन सामने अनिर्णित राहिले.

हेही वाचा :

  1. Sourav Ganguly Birthday : क्रिकेटचा 'दादा'...ज्याने टीम इंडियाला लावली जिंकण्याची सवय!
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.