ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 : विश्वचषकाचा भव्य उद्घाटन सोहळा रद्द, सर्व संघांच्या कर्णधारांचं फोटो सेशन होईल

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 4, 2023, 2:22 PM IST

Cricket World Cup 2023 : उद्या, ५ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषकाचा पहिला सामना खेळला जाईल. यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मात्र, या विश्वचषकाचा कोणताही भव्य उद्घाटन सोहळा होणार नाही.

Cricket World Cup 2023
Cricket World Cup 2023

अहमदाबाद (गुजरात) Cricket World Cup 2023 : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उद्यापासून (५ ऑक्टोबर) विश्वचषकाला सुरुवात होत आहे. बीसीसीआयच्या एका सूत्रानं सांगितलं की, यंदा कोणताही भव्य उद्घाटन सोहळा नियोजित नाही. मात्र, दुपारी २.३० वाजता नरेंद्र मोदी स्टेडियमवर सर्व संघाच्या कर्णधारांचं फोटो सेशन होणार आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशन (GCA) क्लब हाऊसच्या बँक्वेट हॉलमध्ये आज दुपारी 'कॅप्टन डे'चं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये सर्व क्रिकेट संघांचे कर्णधार उपस्थित राहून फोटो सेरेमनीमध्ये भाग घेतील.

नरेंद्र मोदी स्टेडियमवर त्रिस्तरीय सुरक्षा : आज सकाळपासूनच सर्व संघांचे कर्णधार नरेंद्र मोदी स्टेडियमवर यायला लागले आहेत. गुजरातचा गृह विभाग आणि अहमदाबाद पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १४ ऑक्टोबर रोजी यजमान भारत आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. प्रेक्षकांना पिण्याचं पाणी घेऊन जाण्यासही बंदी आहे. कारण बाटलीसारख्या गोष्टी मैदानावर सहज फेकल्या जाऊ शकतात. तसेच दोन्ही संघ ज्या हॉटेलमध्ये थांबणार आहेत, त्या हॉटेलमध्येही मोठा पोलीस बंदोबस्त असणार आहे.

मेट्रोच्या वेळेत बदल : विश्वचषकाचा पहिला सामना गुरुवारी खेळवला जाईल. नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्डकपचे पाच सामने होणार आहेत. स्टेडियमपर्यंत पोहोचण्यासाठी मेट्रो हे सर्वात सोपं वाहतुकीचं साधन आहे. या पार्श्वभूमीवर, गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशननं एक महत्त्वाचा निर्णय घेतला. विश्वचषक सामन्यांच्या दिवशी पहाटे एक वाजेपर्यंत मेट्रो ट्रेन धावतील. यासाठी ५० रुपयांचं फिक्स तिकीट घ्यावं लागेल.

खेळाडूंचं आगमन : अहमदाबाद विमानतळावर खेळाडूंचं आगमन होत आहे. विमानतळाकडून प्रेक्षकांसाठीही विशेष सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. प्रेक्षकांना कोणती गैरसोय होऊ नये, यासाठी विमानतळावरुन थेट स्टेडियमपर्यंत प्रेक्षकांना नेणाऱ्या खासगी कॅबसाठी सुविधा काउंटर उभारण्यात आलंय. ट्रॉफी टूरचा एक भाग म्हणून जगप्रसिद्ध 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'मध्ये वर्ल्ड कपची प्रतिकृती ठेवण्यात आली होती.

हेही वाचा :

  1. Cricket World Cup 2023 : लहानपणी अभ्यासाऐवजी केली क्रिकेटची निवड, आज विश्वचषक संघातील महत्वाचा खेळाडू आहे इशान किशन
  2. Cricket World Cup 2023 : हे आहे भारतातील सर्वात आधुनिक क्रिकेट स्टेडियम, कितीही पाऊस आला तरी मॅच होणार नाही रद्द!
  3. Cricket World Cup 2023 : 'भारत उपांत्य फेरीत नक्कीच प्रवेश करणार', किरण मोरेंची भविष्यवाणी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.