ETV Bharat / sports

CRICKET WC : जसप्रीत बुमराह सुसाट..लंकेच्या कर्णधाराला बाद करत रचला 'हा' विक्रम

author img

By

Published : Jul 6, 2019, 8:06 PM IST

एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०० बळी मिळवणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

जसप्रीत बुमराह सुसाट..लंकेच्या कर्णधाराला बाद करत रचला 'हा' विक्रम

लीड्स - आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि श्रीलंका सामना चालू आहे. फलंदाज अँजेलो मॅथ्यूजच्या शतकाच्या जोरावर श्रींलेकेने भारताला २६५ धावांचे आव्हान दिले. या सामन्यात भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ३ बळी घेतले. बुमराने जेव्हा लंकेचा कर्णधार करुणारत्नेला माघारी धाडले तेव्हा त्याने एका खास विक्रमाला गवसणी घातली.

बुमराने करुणारत्नेला बाद करत एकदिवसीय क्रिकेटमध्ये बळींचे शतक पूर्ण केले. त्याने ही कामगिरी ५७ एकदिवसीय सामन्यांत केली आहे. शिवाय, एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०० बळी मिळवणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. पहिल्या क्रमांकावर त्याचा सोबती वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी विराजमान आहे.

या सामन्यात नाणेफेक जिंकून घेतलेला फलंदाजीचा निर्णय श्रीलंकेला महागात पडला. कर्णधार करुणारत्ने आणि कुशल परेरा यांची सलामीची जोडी सपशेल अपयशी ठरली. संघाच्या ५५ धावा फलकावर लागल्या असताना लंकेने ४ गडी गमावले होते. लंकेचा डाव लवकर आटोपणार असे वाटत असताना मथ्यूज- थिरीमाने जोडीने १२४ धावांची भागीदारी रचली. थिरीमानेने ५३ धावांची उपयुक्त खेळी केली. धंनंजय डी सिल्वाने शेवटी येऊन २९ धावांची खेळी केली.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.